पंजाब राज्यात काँग्रेस पक्षातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. येथील काँग्रेसच्या काही आमदारांसह महत्त्वाच्या नेत्यांनी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे. नवज्योतसिंग सिद्धू यांच्यामुळे पक्षाचे नुकसान होत आहे, असा दावा या नेत्यांनी केला आहे. याआधी नवज्योतसिंग सिद्धू यांच्या गटातील पाच माजी आमदारांनी आम्हाला, तसेच नवज्योत यांना पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमाला बोलावले जात नाही, असा आरोप केला होता. या आरोपानंतर आता नवज्योतसिंग यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली जात आहे.

“त्यांनी काँग्रेसच्या कार्यक्रमांत सहभागी व्हावे”

काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते प्रतापसिंग बाजवा यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर उघड टीका केल्यानंतर पक्षातील ही दुफळी समोर आली आहे. सिद्धू यांनी स्वत:चा मंच उभारण्यापेक्षा काँग्रेस पक्षाच्या मंचावर येऊन त्यांची मतं मांडावीत. त्यांनी काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमांत सहभागी व्हावं, असे बाजवा म्हणाले होते. १७ डिसेंबर रोजी सिद्धू यांनी भटिंडा येथे एका सभेचे आयोजन केले होते. पंजाब काँग्रेसचा एकही वरिष्ठ नेता या सभेला उपस्थित नव्हता. या सभेत सिद्धू यांनी सत्ताधारी आम आदमी पार्टीवर सडकून टीका केली होती. याच सभेचा आधार घेत बाजवा यांनी ही टीका केली होती.

indian tectonic plate
तिबेट खालील भारतीय टेक्टोनिक प्लेट दुभंगणार? भूवैज्ञानिकांनी व्यक्त केली चिंता; याचा काय परिणाम होणार?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Wildlife scientists and animal researchers claim about the golden fox thane news
मानवी वस्तीत येणारे सोनेरी कोल्हे निवासीच! वन्यजीव शास्त्रज्ञ, प्राणी अभ्यासकांचा दावा
Global Warming, Chandrapur , International Conference on Climate Change-2025,
‘ग्लोबल वॉर्मिंग’विरोधात शंखनाद, चंद्रपुरात पर्यावरण बदलावर…
grand alliance government accelerate the shaktipeeth highway work after election victory
निवडणुकीत प्रचंड बहुमत… आता महायुती सरकारकडून शक्तिपीठ महामार्गाला गती?
Mahakumbh 2025 Grah Yog, subh yog horoscope
Mahakumbh 2025 : महाकुंभमेळ्याच्या मुहूर्तावर ११४ वर्षांनी जुळून आला अद्भुत योग; ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल, हाती लागणार पैशांचे घबाड
Meta x gets rid of fact checkers
अग्रलेख : फेकुचंदांचा फाल्गुनोत्सव!
Correlation between geological events and their time
कुतूहल : भूवैज्ञानिक कालमापन

“सिद्धू यांना आणखी काय हवं?”

“सिद्धू यांनी शहाणपणानं वागणं गरजेचं आहे. नवज्योतसिंग सिद्धू यांना पक्षानं खूप काही दिलं आहे. त्यामुळे त्यांनी अशा प्रकारे वागणं चुकीचं आहे. सिद्धू अगोदर पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यांनी काँग्रेसच्या आमदारांची संख्या ७८ वरून १८ पर्यंत आल्याचे पाहिलेले आहे. त्यांना आणखी काय हवं आहे,” असे बाजवा म्हणाले.

“स्वत:चा नवा मंच उभा करणं चुकीचं”

काँग्रेसकडून २१ व २२ डिसेंबर रोजी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात सिद्धू यांनी सहभागी व्हावं, असे आवाहनही बाजवा यांनी केले आहे. “सिद्धू यांनी पक्षाच्या मंचावर यावं. दोन दिवसांनी आम्ही जगराव आणि फगवाडा येथे आंदोलनाचे आयोजन केलेलं आहे. त्यांनी या आंदोलनात सहभागी होऊन मंचावर जे हवं ते बोलावं. स्वत:चा नवा मंच उभा करणं हे चुकीचं आहे. पंजाब काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याला हे योग्य वाटणार नाही,” असेही बाजवा म्हणाले.

बाजवा यांच्या या टीकेनंतर सिद्धू यांनी कोणतीही थेट प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, त्यांच्या गटातील काही नेत्यांच्या प्रतिक्रिया त्यांनी आपल्या एक्स खात्यावरून शेअर केल्या आहेत.

“… तर त्यात वावगं काय”

“आदरणीय बाजवासाहेब आम्हाला, तसेच नवज्योतसिंग सिद्धू अशा कोणालाच पंजाब काँग्रेसच्या कार्यक्रमाला बोलावण्यात येत नाही. पक्षाच्या भल्यासाठी आम्ही आठ हजार लोकांच्या सभेचं आयोजन करीत असू, तर त्यात वावगं काय आहे. आमच्या या कृत्याला वाईट म्हणण्याऐवजी आम्हाला प्रोत्साहन दिलं पाहिजे,” असे नवज्योतसिंग सिद्धू यांच्या गटातील नेत्यांनी म्हटले आहे.

“पक्षाच्या कार्यकर्त्यांना सन्मान मिळत नाही”

“सिद्धू यांच्या जवळचे असल्यामुळे आमच्यावर पक्षात अन्याय केला जात आहे का? तुम्ही जेवढे काँग्रेस पक्षावर प्रेम करता, पक्षाचा जेवढा सन्मान करता, तेवढेच प्रेम आम्हीदेखील काँग्रेस पक्षावर करतो,” असेदेखील हे नेते म्हणाले. तसेच गेल्या महिनाभरात पंजाब काँग्रेसच्या नेतृत्वानं कोणताही कार्यक्रम आयोजित केलेला नाही. पक्षाच्या कार्यकर्त्यांना योग्य सन्मान मिळत नाहीये. कार्यकर्त्यांना योग्य प्रतिनिधित्व दिलं जात नाहीये. याच कारणामुळे सिद्धू काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं समर्थन करीत आहेत, असेही सिद्धू यांच्या समर्थक आमदारांनी म्हटले आहे.

सिद्धू यांच्यावर नेमके आरोप काय?

पंजाब काँग्रेसने नवज्योतसिंग सिद्धू यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे. तशी मागणी करणारे एक संयुक्त निवेदन जारी करण्यात आले आहे. या निवेदनावर गुरुदासपूरचे आमदार बरिंदरमितसिंग पाहरा, माजी आमदार कुलबीरसिंग झिरा, इंदरबीरसिंग बोलारिया, लखवीरसिंग लाखा, दविंदरसिंग छुबाया, अमित विज, युवक काँग्रेसचे अध्यक्ष मोहित महिंद्र, नवज्योतसिंग दहिया, खुशबाजसिंग जट्टाना आदी नेत्यांच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

“सिद्धू यांची भूमिका पक्षाच्या हिताची नसते”

“नवज्योतसिंग सिद्धू यांना आता बाहेरचा रस्ता दाखवण्याची वेळ आली आहे. पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष म्हणून आम्ही त्यांचा सन्मान करतो; मात्र त्यांची कृती ही अनेकदा पक्षाच्या हिताची नसते. कोणत्याही प्रकरणाला बेशिस्तीनं हाताळण्याची त्यांची पद्धत ही काँग्रेसच्या सामूहिक प्रयत्नांच्या विरोधात असते. २०१७ साली काँग्रेसनं विधानसभेच्या निवडणुकीत एकूण ७८ जागांवर विजय मिळवला होता; मात्र त्यांच्याकडे नेतृत्व आल्यानंतर २०२२ सालच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या आमदारांची संख्या १८ पर्यंत खाली आली आहे. त्यांच्या अपयशाचा हा एक पुरावाच आहे,” असे या निवेदनात म्हटले आहे.

“सिद्धू यांची भूमिका काँग्रेसच्या सामूहिक भूमिकेच्या विरोधात”

“पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून २०२२ सालच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला चांगल्या स्थितीत नेऊन ठेवणे ही सिद्धू यांची जबाबदारी होती; मात्र त्यात त्यांना अपयश आले. सिद्धू यांची भूमिका काँग्रेसच्या सामूहिक भूमिकेच्या विरोधात असते. ते ज्या पद्धतीनं वागतात, त्यातून ते एका संघाचे सदस्य नसल्याचेच दिसून येते,” असा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.

“स्वत:चे उदात्तीकरण करण्याचा सिद्धू यांचा अजेंडा”

“२०२२ सालच्या विधानसभा निवडणुकीत चरणजितसिंग चन्नी यांची जेव्हा मुख्यमंत्री म्हणून घोषणा केली जात होती, तेव्हा सिद्धू पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बाजूलाच बसलेले होते. मात्र, पक्षासोबत उभे राहण्याऐवजी त्यांनी स्वत:चे उदात्तीकरण करण्याचाच अजेंडा राबवला. त्यामुळे पक्षाला मोठा धक्का बसला,” असेदेखील या निवेदनात म्हटले आहे.

काँग्रेस हायकमांड काय निर्णय घेणार?

दरम्यान, पंजाब काँग्रेसमधील ही दुफळी चव्हाट्यावर आल्यानंतर आता काँग्रेस हायकमांड नेमके काय करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच सिद्धू यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांबाबत काय निर्णय घेतले जाणार? हे पाहणेदेखील महत्त्वाचे असेल.

Story img Loader