पंजाब विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर सहा दिवसांनी म्हणजेच १६ मार्च रोजी भगवंत मान यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर १९ मार्च रोची इतर १० जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, गेल्या सहा महिन्याच पंजाबमधील ‘आप’ सरकारला मोठ्या अडचणींचा आणि टीकेचा सामना करावा लागला. मंत्र्यांच्या ऑडिओ-व्हिडीओ क्लिपपासून ते भष्ट्राचारापर्यंत अनेक वादग्रस्त प्रकरणं पुढे आले. दरम्यान, मान सरकारच्या काळातले सहा वादग्रस्त प्रकरणं कोणती राहिली आहेत, एक नजर टाकूया.
हेही वाचा – विदर्भ चळवळीला पूर्वीचे दिवस येतील?
२४ मे रोजी मान यांनी तत्कालीन आरोग्यमंत्री विजय सिंगला यांची भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने मंत्रीपदावरून हकालपट्टी करत सर्वांनाच धक्का दिला. सिंगला यांनी आरोग्य विभागाने काढलेल्या निविदांमध्ये १ टक्के कमिशनची देण्याची मागणी कंत्राटदाराकडे केली होती. त्याचे ऑडिओ पुरावेही समोर आले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच सिंगलाने यांनी गुन्ह्याची कबुलीही दिली असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, यासंदर्भात गुन्हा दाखल झाल्यानंतर सिंगला यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.
4 जुलै रोजी मान सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर चेतनसिंग जौरामाजरा यांनी आरोग्य विभागाचा पदभार देण्यात आला. मात्र, आपचे नऊ आमदार डॉक्टर असताना १२वी पास आमदाराला आरोग्यमंत्री का केलं? असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित करण्यात आला. तसेच बाबा फरीद युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस (BFUHS) चे तत्कालीन कुलगुरू डॉ. राज बहादूर यांना गुरू गोविंद सिंग मेडिकलच्या भेटीदरम्यान अपमानास्पद वागणूक दिल्याने जौरामाजरा हे वादात सापडले होते.
११ सप्टेंबर रोजी अन्न-प्रक्रिया मंत्री फौजा सिंग सरारी आणि त्यांचे ओएसडी तरसेम लाल कपूर यांच्यातील कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर ते वादात सापडले होते. या ऑडिओ क्लिपमध्ये दोघेही काही कंत्राटदारांकडून पैसै उकळण्यासंदर्भात बोलत होते. दरम्यान, ही ऑडियो क्लिप खोटी असल्याचे सरारी यांनी सांगितले होते. तर पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे प्रमुख वकील एचसी अरोरा यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहत सरारी यांना दहा दिवसांत बडतर्फ करावे, अन्यथा ते सीबीआय चौकशीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करतील, असे म्हटले होते.
सनौरचे आमदार हरमीत सिंग पठाणमाजरा यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतरही वाद निर्माण झाला होता. तसेच त्यांच्या दोन पत्नी असल्याने त्यावरूनही अनेकांनी टीका केली होती. यापूर्वी पठाणमाजरा हे अकाली दल आणि काँग्रेसमध्ये होते. तसेच माझ्या दोन्ही पत्नींबाबत केजरीवाल यांनाही माहिती असल्याचे त्यांनी सांगितले होते. पठाणमाजरा यांनी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये दुसरे लग्न केले होते. दरम्यान, त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आपकडूनही स्पष्टीकरण देण्यात आले. हा त्यांचा वयक्तिक विषय असला तरी आम्ही पक्षाकडून त्यांना स्पष्टीकरण मागितले आहे, असे पक्षातर्फे सांगण्यात आले होते.
हेही वाचा – ज्युनियर एनटीआर ते प्रभास; आंध्र प्रदेश, तेलंगणात ताकद वाढवण्यासाठी भाजपाला ‘स्टार पॉवर’ची मदत होणार का?
भटिंडाच्या तलवंडी साबो मतदारसंघाच्या आमदार बलजिंदर कौर यांना त्यांच्या पतीने मारहाण केल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. १० जुलै रोजी सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर कौर यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला होता. तसेच आप पक्षाकडून हा त्यांचा वयक्तिक विषय असल्याचे सांगण्यात आले होते.
८ सप्टेंबर रोजी ईडीने आम आदमी पार्टीचे अमरगढचे आमदार जसवंत सिंह गज्जन माजरा यांच्या घरावर छापा टाकला होता. त्यांच्या कंपन्यांवर ७६ कोटींचे कर्ज थकीत असल्याचे सांगण्यात येत होते. या वर्षी मे महिन्यात सीबीआयनेही त्यांची चौकशी केली होती. दरम्यान, यासंदर्भात बोलताना ही राजकीय सुडापोटी केलेली कारवाई असल्याचे म्हटले होते.