छत्रपती संभाजीनगर : लोकसभा आणि विशेषत: विधानसभा निवडणुकीमध्ये मराठवाड्यातून देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधाचा लंबक आता त्यांच्या बाजूने झुकल्याचे चित्र आष्टीमधील सभेमुळे निर्माण झाले आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये निवडक दोनच सभा फडणवीस यांनी घेतल्या होत्या. आरक्षण मागणीच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या जातीय ध्रुवीकरणामुळे फडणवीस विरोधाने टोक गाठले होते. मात्र, आष्टीतील सभेनंतर हा लंबक देवेंद्र फडणवीस यांना बाहुबली चित्रपटातील नायक ठरविण्यापर्यंत त्यांच्या बाजूने झुकला असल्याचे दिसून येत असल्याची चर्चा राजकीय वतुर्ळात सुरू झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या राजकीय स्थित्यंतराबाबत बोलताना माजी मुख्यमंत्री व भाजपचे राज्यसभेतील खासदार अशोक चव्हाण म्हणाले, ‘ देवेंद्र फडणवीस हे निर्णय घेणारे नेते आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपची वाढलेली लोकप्रियता हेच सांगत आहे. दुर्दैवाने मराठवाड्यात कामापेक्षा इतरच काही बाबींकडे लक्ष वळवले जाते. नाहक गैरसमज निर्माण करुन दिले जातात. बऱ्याचदा अर्धवट माहितीवर लोक मत प्रदर्शित करतात. त्याचा फटका मीही सहन केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याविषयीही असे गैरसमज निर्माण करुन देण्यात विरोधकांना यश आले होते. पण आता ती मते बदलू लागली आहेत. ही चांगली बाब आहे.’

लोकसभा निवडणुकीमध्ये मराठवाडयात ‘ मराठा आरक्षण ’ हा मुद्दा अधिक चर्चेत होता. त्यामुळे मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर वळगता महायुतीला एकही जागा मिळाली नाही. भाजपचे नेत्यांनाही हा मोठा धक्का होता. २०१९ मध्ये भाजपचे १६ आमदार होते. आठ लोकसभा मतदारसंघात चार एवढे खासदार होते. विधानसभा निवडणुकीमध्ये हे चित्र बदलविण्यात भाजप नेत्यांना मोठे यश मिळाले. लोकसभेतील पराभवानंतर मराठवाड्यात ४६ पैकी २१ आमदार भाजपचे आहेत. निकालानंतर ‘ आरक्षणाचा’ आवाज कमी होत गेला. याच काळात संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आमदार सुरेश धस हे चर्चेत येत गेले. त्यांच्या मतदारसंघातील कार्यक्रमास देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी हजेरी लावली. तेव्हा दिल्या जाणाऱ्या घोषणांमुळे देवेंद्र फडणवीस यांच्या लोकप्रियतेचा लंबक त्यांच्या बाजूने झुकल्याचे दिसून आले. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील धागेदाेरे उलगडावेत कोणत्याही आरोपीस पाठिशी घातले जाऊ नये धनंजय देशमुख आणि कुटुंबियांची फडणवीस यांची भेट घेतली. या प्रकरणात आम्ही जातीयवाद करणारे नाहीत असा संदेशही भाजपच्या नेत्यांनी आवर्जून दिला.

औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी बीड येथील सभेत हजेरी लावून हे प्रकरणात सरकार सकारात्मक लक्ष घालेल असे सांगितले. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले. विरोधक मात्र फडणवीस यांच्या विषयी सकारात्मकता वाढल्याचे नाकारातात. विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे म्हणाले, ‘व्यक्तिगत कोणाच विषयी रोष असूच नये. पण सरकार म्हणून रोष कमी झाला आहे, असे मला वाटत नाहीत. परभणीच्या प्रकरणातील रोष कायम आहे. सोयाबीन, कापूस उत्पादकांमध्ये रोष कायम आहे. काही नेत्यांनी काही भूमिका घेतल्या असतील पण त्यामुळे मराठवाड्याचा लंबक बदलला आहे, असे आपल्याला वाटत नाही.’