हृषिकेश देशपांडे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
परषोत्तम रुपाला हे वीस वर्षांनंतर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वासू अशी ६८ वर्षीय रुपाला यांची ओळख. मात्र आता एका वक्तव्याने रजपूत समाजाचा रोष त्यांना सहन करावा लागत आहे.
परषोत्तम खोडाभाई रुपाला हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अत्यंत विश्वासू समजले जातात. केंद्रीय मंत्र्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याच्या पक्षाच्या योजनेनुसार ६८ वर्षीय रुपाला गुजरातच्या राजकोट मतदारसंघातून रिंगणात उतरले आहेत. अमरेली जिल्हा हे त्यांचे कार्यक्षेत्र. मात्र २००२ नंतर त्यांनी एकही निवडणूक लढवलेली नाही. राज्यात अमरेली मतदारसंघातून तीन वेळा आमदार, गुजरातमध्ये नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना मंत्रिमंडळात महत्त्वाची खाती त्यांनी सांभाळली. २००२ मध्ये काँग्रेसच्या परेश धनानी यांनी पराभूत केले होते. गुजरातमधील २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपसाठी मोठे योगदान दिले. पाटीदार आंदोलन भरात असताना भाजपसाठी त्यांनी राज्यभर प्रचार करून पक्षाला यश मिळवून दिले. त्या वेळी भाजपला सत्ता राखणे कठीण होईल असे वातावरण असताना रुपाला यांचे संघटनकौशल्य कामी आले. अमरेलीतील कडवा पाटीदार ट्रस्टचे विश्वस्त म्हणूनही त्यांनी काम पाहिले. गुजरात औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. काही काळ ते भाजपचे प्रदेशाध्यक्षही होते. राजकारणात येण्यापूर्वी ते प्राचार्य होते. राजकारणात मिळेल ती जबाबदारी उत्तमपणे पार पाडल्याने केंद्रातही त्यांना संधी मिळाली. आता राजकोट या भाजपचा प्रभाव असलेल्या मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळाली आहे.
मात्र राजपूत समाजाबाबतच्या एका वक्तव्याने ते अडचणीत सापडले आहेत. २२ मार्च रोजी राजकोट येथे एका कार्यक्रमात राजघराण्यांबाबत अपशब्द वापरल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यावरून रजपूत संघटना आक्रमक आहेत. जवळपास ९० संघटनांनी त्यांची उमेदवारी बदलण्याची मागणी केली आहे. हे प्रकरण न्यायालयातही गेले आहे. रुपाला यांनी माफी मागितली असली, तरी त्यांची उमेदवारीच मागे घ्यावी असा या संघटनांचा आग्रह आहे. त्यांच्या पुतळय़ाचे प्रतीकात्मक दहनही करण्यात आले. या साऱ्यात भाजपची कोंडी झाली असून, पक्षाला तोडगा काढावा लागेल. अन्यथा राज्यभर त्याचे परिणाम होतील अशी धास्ती आहे. उत्तम वक्ते अशी रूपाला यांची ओळख, मात्र रजपूत समाजाबाबतच्या वक्तव्याने वाद वाढत आहे. आता भाजपच्या वरिष्ठांनाच यात हस्तक्षेप करावा लागेल. अन्यथा दोन दशकांनंतर निवडणूक लढवणाऱ्या रुपाला यांना जिंकण्यासाठी पराकाष्टा करावी लागेल.