चंद्रपूर : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती, महाविकास आघाडीकडून चंद्रपूर जिल्ह्यात महिलांना संधी मिळणार का, असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. भाजप व काँग्रेसने यापूर्वी महिला उमेदवाराला संधी दिली आहे. यंदा हे पक्ष महिलांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवतील का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

जिल्ह्याच्या राजकारणात महिलांना प्रतिनिधित्व करण्याची संधी तशी कमीच मिळाली. काँग्रेसच्या विद्यमान खासदार प्रतिभा धानोरकर या जिल्ह्यातील दुसऱ्या महिला खासदार आहेत. त्यांच्यापूर्वी माजी मुख्यमंत्री मा.सा. कन्नमवार यांच्या पत्नी ताई कन्नमवार या महिला खासदार होत्या. याचबरोबर काँग्रेसच्या यशोधरा बजाज आणि भाजपच्या शोभा फडणवीस यांनी मंत्रीपदही भूषवले. प्रतिभा धानोरकर या २०१९ मध्ये वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघातून प्रथम आमदार झाल्या होत्या. त्यानंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत खासदार झाल्या.

maharashtra vidhan sabha election 2024 ajit pawar vs yugendra pawar baramati assembly constituency
बारामतीत अटीतटीचा सामना अजित पवार की युगेंद्र… मतदारांमध्ये संभ्रम; शरद पवार यांच्या सभेची चर्चा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : “…तर रक्तरंजित क्रांती करणार”, एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराची भरसभेत धमकी
158 parties in the 2086 independent candidate contest maharashtra assembly election 2024
१५८ पक्ष, २०८६ अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात
ajit pawar expressed about obc vote in an interview given to the indian express
ओबीसींची एकगठ्ठा मते मिळणे कठीणच; महायुतीबाबत अजित पवार यांचे मत
What Devendra Fadnavis Said?
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसला सवाल, “उलेमांच्या मागण्या…”
Vidhan Sabha Election 2024
Vidhan Sabha Election 2024 : राज्यातल्या निवडणुका कोणत्या मुद्यांभोवती फिरत आहेत?

हेही वाचा >>> Maharashtra Election 2024 : पुण्यात शिंदे यांच्या शिवसेनेला जागा सोडण्यास मित्रपक्षांचा विरोध

बल्लारपूर मतदारसंघातून डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी काँग्रेसकडून, तर चंद्रपूरच्या माजी नगराध्यक्ष सुनीता लोढिया यांनी वरोरा मतदारसंघातून उमेदवारी मागितली आहे. डॉ. आसावरी देवतळे यांनी वरोरा येथून दुसऱ्यांदा संधी द्यावी, अशी विनंती काँग्रेसकडे केली आहे. चिमूर मतदारसंघातून डॉ. वंदना दांडेकर यांनीही उमेदवारी मागितली आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव चंद्रपूर मतदारसंघातून अनुताई दहेगावकर इच्छुक आहेत. याशिवाय, काँग्रेस पक्षसंघटनेत सक्रिय असलेल्या अनेक महिला उमेदवारीसाठी प्रयत्नरत आहेत. मात्र, भाजपमध्ये एकही महिला उमेदवाराचे नाव सध्यातरी चर्चेत नाही. त्यामुळे यंदा भाजपकडून महिला उमेदवाराला संधी मिळण्याची शक्यता कमीच दिसत आहे.

हेही वाचा >>> शिरुरमध्ये ‘पवारां’च्या विरोधात कोण?

माजी मंत्री संजय देवतळे यांच्या पत्नीचे नाव वरोरा मतदारसंघातून आघाडीवर आहे. मात्र, भाजपकडून त्यांना संधी मिळते की नाही, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. बल्लारपूर, चिमूर, राजुरा, चंद्रपूर व ब्रह्मपुरी या पाच मतदारसंघांत भाजपमध्ये एकाही महिला उमेदवाराचे नाव चर्चेत नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून चंद्रपूर जिल्हा महिला अध्यक्ष व कार्याध्यक्ष बेबी उईके यांचे एकमेव नाव चर्चेत आहे. मनसे व इतर पक्षांकडूनही महिलांची नावे उमेदवारीसाठी चर्चेत नाहीत.