मोहनीराज लहाडे

नगरः सात वर्षांच्या कालखंडानंतर होणाऱ्या जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी जिल्ह्यात चांगलीच उडालेली आहे. नगर जिल्ह्यात सहकारातील निवडणुका राजकीय पक्षांपेक्षा जिरवाजीवीचा राजकारणातून गटातटाची समीकरणे जुळवत लढवल्या जातात. त्याचाच पूनःप्रत्यय बाजार समितींच्या निवडणूक निमित्ताने येतो आहे. विशेष म्हणजे राधाकृष्ण विखे-पाटील आणि बाळासाहेब थोरात हे आजी-माजी महसूलमंत्री समोरासमोर आले आहेत.

57 lakh worth of goods seized in Nashik district in two days nashik news
नाशिक जिल्ह्यात दोन दिवसात ५७ लाखांचा मुद्देमाल जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
In politics of district Mamu factor implemented in Akot constituency once again come into discussion
‘मामु’ फॅक्टर चालणार?, दलितांसह इतरांचे एकगठ्ठा मतदान…
Rahul Gandhi ashok chavan nanded
नांदेडमध्ये राहुल गांधींकडून चव्हाण कुटुंबिय बेदखल !
Rajasthan By-Election Independent candidate assault SDM
Rajasthan By-Election : अपक्ष उमेदवाराची अधिकाऱ्याला मारहाण; कार्यकर्त्यांकडून पोलिसांवर दगडफेक, वाहनं पेटवली, जिल्ह्यात तणाव
rickshaw owners drivers Acche Din assembly election campaign
प्रचार मिरवणूकांमुळे रिक्षा चालकांना अच्छे दिन, तीन ते चार तासांसाठी रिक्षा चालकांना मिळतात ५०० ते १ हजार रुपये
Pune Voting Free Petrol, Pune Voting, Petrol,
पुणेकरांनो मतदान करा अन् मोफत पेट्रोलसोबत बरंच काही मिळवा! विविध संघटनांकडून मतदान वाढविण्यासाठी पाऊल

 आगामी विधानसभा निवडणुकीचा वेध घेत अनेक ठिकाणी पारंपारिक सामने रंगले आहेत. पूर्वी काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते स्वपक्षातील आपल्या विरोधी गटाची जिरवण्यासाठी भाजप व शिवसेनेला बरोबर घेत होती. आता ती भूमिका भाजप पार पाडू लागला आहे. या निवडणूकीमुळे जिल्ह्यातील मातब्बरांचा कस लागला आहे.

हेही वाचा >>> उद्धव ठाकरेंसाठी सहानुभूती पण स्थानिक पातळीवर नेतृत्वाची पोकळी

महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे व त्यांचे पारंपरिक विरोधक काँग्रेस नेते माजीमंत्री बाळासाहेब थोरात या दोघांनीही परस्परांच्या ताब्यातील बाजार समित्यांमध्ये लक्ष घातल्याने निवडणुकांमध्ये चुरस निर्माण केली आहे. विखे यांचे प्राबल्य असलेल्या राहतामध्ये यापूर्वी निवडणूक बिनविरोध होत होती. परंतु आता थोरात यांनी विशेष लक्ष घातल्याने तेथे निवडणूक होत आहे. जिल्ह्यात सर्वाधिक उलाढाल असलेली नगर बाजार समिती आहे. तेथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष भाजप नेते शिवाजी कर्डिले यांच्या विरोधात महाविकास आघाडी एकत्र आली आहे. राज्यात ‘मविआ’ स्थापन होण्यापूर्वी नगर तालुक्यात कर्डिले यांच्या विरोधात महाविकास आघाडी स्थापन झालेली आहे.

हेही वाचा >>> कर्नाटकातील भाजपच्या उत्साही नेत्यांना अमित शहा यांनी लावला चाप

माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या विरोधात विखे-कर्डिले असा पारंपारिक सामना राहुरीत रंगला आहे. पारनेरमध्ये मात्र आश्चर्यकारकरीत्या राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके व त्यांच्याकडून पराभूत झालेले माजी आमदार विजय औटी (ठाकरे गट) एकत्र आले आहेत. त्याचा विखे गटाला मोठा धक्का बसला आहे. अकोल्यात भाजपचे जेष्ठ नेते, माजीमंत्री मधुकर पिचड यांची ‘मविआ’ने साखर कारखान्यासह इतर सहकारी संस्थात पिछेहाट केली, मात्र आता ‘मविआ’ खिळखिळी झाल्याचा पिचड यांना किती फायदा मिळतो, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. भाजपाच्या आमदार मोनिका राजळे यांच्या पाथर्डी-शेवगावमध्ये ‘मविआ’ची फटाफुट झाली आहे.

कोपरगावमध्ये राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे व भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांची ‘सहमती एक्सप्रेस’ कोणत्या रुळावरून कधी धावेल व कधी घसरेल, हा जिल्ह्यासाठी चर्चेचा विषय असतो. मागील पिढीपासून ‘सहमती एक्सप्रेस’ची घसरण्याची आणि धावण्याची परंपरा नव्या पिढीने पुढे सुरू ठेवली आहे. तेथे काळे-कोल्हे-औताडे-परजणे या वेगवेगळ्या पक्षातील गटांचा निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न यंदा मात्र यशस्वी होऊ शकला नाही. माजीमंत्री आमदार शंकरराव गडाख व भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे नेवासा बाजार समितीच्या निवडणूक निमित्ताने पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत.

हेही वाचा >>> माजी आमदार आशीष देशमुख यांचे तळ्यात-मळ्यात

विखे विरुद्ध शिंदे ?

बाजार समितीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दोन दिवस आधी अचानक भाजप नेते, माजीमंत्री आमदार राम शिंदे यांनी आपण लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे जाहीर करत खळबळ उडवून दिली होती. विखे गटासाठी हा धक्का होता, जो भाजपमधून प्रथमच दिला गेला होता. आ. शिंदे पूर्वी प्रतिनिधित्व करत असलेल्या कर्जत-जामखेडमध्ये विखे समर्थकांनी बाजार समितीसाठी केलेल्या जुळवाजुळवीतूनच शिंदे यांनी हे दबावतंत्राचे अस्त्र उपसल्याचा होरा जिल्ह्यात व्यक्त केला जातो. त्यामुळे तेथे पुन्हा एकदा भाजपचे आ. शिंदे विरुद्ध राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार समर्थकांत सामना रंगला आहे. विखे समर्थक या सामन्यात ऐनवेळी कोणती भूमिका बजावतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष वेधलेले आहे.

काँग्रेसच्या गटांचा भाजपशी घरोबा

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे व माजी जिल्हाध्यक्ष करण ससाणे या दोघांनीही भाजपाशी घरोबा केला आहे. श्रीगोंद्यात नागवडे व भाजपा आमदार बबनराव पाचपुते हे दोघे राष्ट्रवादीचे माजी आमदार राहूल जगताप यांच्य  विरोधात एकत्र आले आहेत. काही विखे समर्थक मात्र जगताप यांच्या समवेत आहेत तर श्रीरामपूरमध्ये भाजप नेते विखे यांची संगत माजी जिल्हाध्यक्ष ससाणे व माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी धरली आहे. त्यांची लढत काँग्रेसचे आमदार लहू कानडे व राष्ट्रवादीचे अविनाश आदिक यांच्या आघाडीशी होत आहे. विशेष म्हणजे भाजपशी घरोबा करणारे काँग्रेसचे आजी-माजी अध्यक्ष हे दोघेही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते थोरात यांचे समर्थक आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी बाजार समिती व खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘मविआ’ मधील घटक पक्षांसमवेतच राहावे, भाजपशी युती करू नये, युती केली असल्यास ती तोडावी असे जाहीर केले होते. नगरमधील काँग्रेसच्या आजी-माजी जिल्हाध्यक्षांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे.