Tamil Nadu : तामिळनाडू भाजपा अध्यक्ष अन्नामलाई यांच्या विशेष ‘राफेल’ मनगटी घड्याळावरुन नवा वाद निर्माण झाला आहे. या घड्याळावरून तामिळनाडूचे मंत्री सेंथिल बालाजी यांनी दावा केला आहे की, या घड्याळाची किंमत पाच लाख रुपये होती. त्यांच्या या दाव्याला उत्तर देताना तामिळनाडू भाजपा प्रदेशाध्यक्ष अन्नामलाई यांनी सांगितले की, बँक खात्याच्या व्यवहाराच्या तपशीलासह प्राप्तिकराचा तपशील व घड्याळाची पावती सादर करण्यास तयार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुमच्याकडे तर केवळ चारच बकऱ्या होत्या? –

तामिळनाडूचे उर्जामंत्री व्ही सेंथिल बालाजी यांनी प्रश्न उपस्थित केला की, अन्नामलाई यांच्याकडे केवळ चार बकऱ्या होत्या, तर मग त्यांनी एवढे महागडे घड्याळ कसे काय खरेदी केले? याशिवाय, घड्याळ फ्रान्स बनावटीचे असल्याने त्यांच्या देशभक्तीवरही प्रश्न उपस्थित केला आहे.
यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष अन्नामलाई यावर ट्वीटद्वारे उत्तर देताना सांगितलं की, सत्तारुढ द्रमुक भ्रष्टाचाराच्या मुद्य्यावरून त्यांच्याशी लढू इच्छिते आणि ते यासाठी पूर्णपणे तयार होते. याशिवाय त्यांनी हेही सांगितले की, जोपर्यंत ते जिवंत राहतील तोपर्यंत हे घड्याळ वापरत राहतील.

हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार भाजपा नेत्याने म्हटले आहे की, “या घड्याळाची किंमत साडेतीन लाख रुपये आहे आणि हे तेव्हा बनवले गेले होते, जेव्हा भारताने राफेल विमानांची ऑर्डर दिली होती आणि त्याचे काही भागही आहेत. मला राफेल विमान उडवण्याची संधी मिळाली नाही, म्हणून मी एका राष्ट्रवादीच्या रुपाने ही घड्याळ घातली आहे. ”

ट्वीटद्वारे दिली संपूर्ण माहिती –

या वादावर उत्तर देण्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष अन्नामलाईंनी ट्वीटद्वारे म्हटले की, “माझ्यासोबत ते भ्रष्टाचाराच्या मुद्यावर लढू इच्छित आहेत, मी त्यासाठी तयार आहे. माझ्या राफेल घड्याळाची माहिती, जे मी २०२१ मध्ये खरेदी केले होते. त्याच्या बिलासह, माझ्या आय़ुष्यभरातील प्राप्तिकरांच तपशील आणि माझ्या सर्व बँक खांत्यांचे दहा वर्षांचे स्टेटेमेंट ऑगस्ट २०११पासून एका आयपीएस अधिकाऱअयाच्या रुपात माझी सर्व कमाई आणि जोपर्यंत मी राजीनामा दिला नाही, माझ्याकडे एक लाखांहून अधिकच्या सर्व अचल संपत्तीचे विवरण आहे.”

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rafale watch controversy over the expensive rafale watch of bjp state president in tamil nadu msr
Show comments