राहुल गांधी यांच्या भारत न्याय यात्रेचा समारोप २० मार्चला मुंबईत होणार असल्याने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबई व राज्यात वातावरणनिर्मितीसाठी काँग्रेसला या यात्रेचा चांगला वापर करता येऊ शकेल. वर्धापनदिनासाठी नागपूर ते यात्रेच्या समारोपाकरिता मुंबईची निवड करण्यात आल्याने काँग्रेस पक्षाचा लोकसभेच्या ४८ जागा असलेल्या महाराष्ट्रावर अधिक भर असल्याचे दिसते.
कर्नाटक आणि तेलंगणा या दक्षिणेकडील दोन राज्यांमधील विजयानंतर काँग्रेसच्या राज्यातही आशा पल्लवीत झाल्या आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर काँग्रेसला राज्यात संधी दिसत आहे. राहुल गांधी यांच्या मणिपूर ते मुंबई या यात्रेचा समारोप २० मार्चला मुंबईत होणार आहे. याच दरम्यान लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झालेली असेल. २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीची घोषणा १० मार्चला झाली होती. यंदाही मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात धोषणा होऊ शकते. कदाचित राहुल गांधी यांच्या यात्रेचा प्रभाव पडत असल्यास सत्ताधारी भाजपचा निवडणुकीचा कार्यक्रम लवकर जाहीर करण्यासाठी दबाव वाढण्याचीही शक्यता काँग्रेसच्या वर्तुळात व्यक्त केली जाते.
गुजरातमधून राहुल गांधी यांची बस यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. गुजरातची हद्द ते मुंबईपर्यंत राज्यात यात्रेचा मार्ग असेल. सूरतमार्गे तलासरीतून यात्रा दाखल झाल्यास पालघर, ठाणे, मुंबई असा प्रवास होईल. नंदुरबार-नवापूरमार्गे राज्यात यात्रेने प्रवेश केल्यास नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिकहून ठाणेमार्गे यात्रा मुंबईत येईल. राहुल गांधी यांच्या यात्रेचा मुंबईत जास्तीत जास्त फायदा करून घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असेल. १९९९, २००४ आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकीत मुंबईने काँग्रेसला साथ दिली होती. गेल्या दोन लोकसभा निवडणुकींमध्ये युतीचा वरचष्मा राहिला. यंदा राहुल गांधी यांच्या यात्रेच्या माध्यमातून मुंबईत अधिक वातावरणनिर्मिती करण्याचा पक्षाचा प्रयत्न असेल.
मुंबईतील सहाही मतदारसंघातून यात्रेचा प्रवास झाल्यास त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. या दृष्टीने मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली नियोजन करण्यात येणार आहे. काँग्रेसची पक्षाची स्थापना मुंबईत झाली. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा समारोप या शहरात होत असल्याने त्याचा नक्कीच परिणाम होईल, असा विश्वास गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा : पुणे आठवले गटाच्या आरपीआयचा नक्की अध्यक्ष कोण ?
नागपूर आणि मुंबईचे महत्त्व अधोरेखित
काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या नागपूरमध्ये साजरा होत आहे. यासाठी सोनिया गांधी, पक्षाध्यक्ष मल्लीकार्जुन खरगे, राहुल गांधी आदी सारे नेते उपस्थित राहणार आहेत. यापाठोपाठ राहुल गांधी यांच्या यात्रेचा समारोप मार्चमध्ये मुंबईत होईल. यावरून काँग्रेस पक्षाने महाराष्ट्राचे महत्त्व अधोरेखित केले आहे. लोकसभेच्या ४८ जागा असलेल्या राज्यातून जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा काँग्रेस व इंडिया आघाडीचा प्रयत्न आहे.
हेही वाचा : कर्नाटक : गोहत्या, धर्मांतरविरोधी कायदे रद्द करण्याच्या आश्वासनाचे काय झाले? लोकसभा निवडणुकीमुळे टाळाटाळ?
“राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या पहिल्या टप्प्यात राज्यात चांगला प्रतिसाद मिळाला होता. दुसऱ्या टप्प्यात मुंबईत यात्रेचा समारोप होत असल्याने त्याचा नक्कीच राजकीय फायदा होईल. राज्यातील जनता फाटाफुटीच्या राजकारणाला वैतागली आहे. लोकांची बदलाची मानसिकता दिसते. राहुल गांधी यांच्या यात्रेमुंळे मुंबई तसेच राज्याच्या अन्य भागांमध्ये काँग्रेसला चांगले यश मिळेल.” – अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री व सदस्य, अ. भा. काँग्रेस कार्यकारिणी