काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचा आज (१९ जून) वाढदिवस आहे. ते ५३ वर्षाचे झाले आहेत. मागील काही दिवसांपासून राहुल गांधी चांगलेच सक्रिय झाले आहेत. भारत जोडो यात्रेपासून त्यांना देशाच्या राजकारणात महत्त्व प्राप्त झाले आहे. राहुल गांधी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरातील अनेक मोठ्या नेत्यांनी शुभेच्छा दिल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राहुल गांदी यांना कधीही हार न मानणारा नेता असे म्हणत सुभेच्छा दिल्या आहेत. “संवैधानिक मूल्यांप्रती तुम्ही बांधील आहात. प्रतिकूल परिस्थितीत तुमचे धैर्य वाखाणण्याजोगे आहे. दया आणि सौहार्दाचा संदेश देत तुम्ही सत्य बोलत राहावे आणि भारतातील कोट्यवधी लोकांचा आवाज व्हावे” अशा शब्दांत खरगे यांनी राहुल गांधी यांना शुभेच्छा दिल्या.

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनीदेखील राहुल गांधी यांनी शुभेच्छा दिल्या. ” लोकांच्या सेवेसाठी तुमचे समर्पण आणि वचनबद्धता खरंच प्रेरणादायी आहे. या वर्षात तुमच्या आयुष्यात खरंच आनंद येवो. तुम्हाला चांगले आरोग्य लाभो तसेच सकारत्मक बदल घडवण्यासाठी तुम्हाला आणखी बळ मिळो” अशा शब्दांत शिवकुमार यांनी राहुल गांधी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

विरोधकांना एकत्र करण्याचा जबाबदारी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी उचललेली आहे. त्यांनीदेखील राहुल गांधी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. “राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला निरोगी आयुष्य लाभो अशी प्रार्थना करतो,” अशा शब्दांत नितीश कुमार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

तमिळनाडूमध्ये काँग्रेस आणि डीएमके या दोन पक्षांमध्ये युती आहे. त्यामुळे तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनीदेखील राहुल गांधी यांना भाऊ म्हणत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. संवैधानिक मूल्ये जपण्यासाठी आपल्याला सोबत प्रवास करायचा आहे. सोबत लढुया, अशा सब्दांत स्टॅलिन म्हणाले.

डीएमकेचे खासदार कनिमोझी यांनीदेखील राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “फॅसिझमचा सामना करताना राहुल गांधी यांना आयुष्यात चांगले आरोग्य, आनंद, यश लाभो,” असे कनिमोझी म्हणाले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील राहुल गांधी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. “काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांना निरोगी आणि आनंदी आयुष्य लाभो. त्यांच्या प्रयत्नांना मिश मिळो,” असे शरद पवार म्हणाले.

राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनीही राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.