काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेपासून माजी खासदार राहुल गांधी लोकांना भेटून त्यांच्या अडचणी समजून घेण्याला प्राधान्य देत आहेत. सभेमध्ये भाषण करण्यापेक्षा प्रत्यक्ष शेतकरी, मजूर, कामगारांची भेट घेऊन राहुल गांधी त्यांच्याशी संवाद साधत आहेत. ८ जुलै रोजी राहुल गांधी यांनी हरियाणातील मदिना गावातील शेतकरी आणि शेतमजुरांशी संवाद साधला होता. तसेच शेतात काम करणाऱ्या महिला शेतकऱ्यांना दिल्लीमध्ये घरी बोलावले होते. विशेष म्हणजे राहुल गांधी यांनी हे आश्वासन पूर्ण केले असून त्या संपूर्ण महिलांसोबत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी तसेच काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी जेवण केले आहे. हे खास क्षण कॅमेऱ्यात टिपण्यात आले असून सोनिया गांधी यांनी या महिला शेतकऱ्यांसोबत नृत्यदेखील केले.

राहुल गांधींनी साधला शेतकऱ्यांशी संवाद

मागील काही दिवसांपासून राहुल गांधी समाजातील वेगवेगळ्या स्तरातील लोकांची भेट घेत आहेत. या लोकांच्या अडचणी समजून घेण्याचा ते प्रयत्न करत आहेत. ते ८ जुलै रोजी हरियाणाच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मदिना गावातील शेतकरी आणि शेतात काम करणाऱ्या महिलांशी संवाद साधला. विशेष म्हणजे राहुल गांधी यांनी शेतात भातलावणी केली; तसेच ट्रॅक्टरने शेतीची मशागतही केली. राहुल गांधी यांनी आपल्या युट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

dhotar culture wardha
धोतर वस्त्र प्रसार अभियान; धोतर घाला, संस्कृती पाळा
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
epileptic attack, youth epileptic attack, Pune,
पुणे : अपघातानंतर तरुणाला अपस्माराचा झटका, पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरेंच्या तत्परतेमुळे वैद्यकीय मदत
aditi tatkare ladki bahin yojana
Ladki Bahin Yojana: आता ‘या’ महिलांनाही मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ, संख्या १२ लाखांच्या घरात!
Nano Fertilisers loksatta marathi news
लोकशिवार : नॅनो खते; पिकांच्या अन्नद्रव्य व्यवस्थापनातील आविष्कार
Mumbai Local Birthday Celebration
‘बार बार दिन ये आए…’ दणक्यात साजरा केला रेल्वे ग्रुपमधील सदस्याचा वाढदिवस; पाहा मुंबई लोकलचा खास Viral Video
Maharashtra Breaking News Live Updates
Maharashtra News : “छगन भुजबळांची समजूत कशामुळे काढायची?”, माणिकराव कोकाटे यांचा सवाल
Devendra Fadnavis On Kalyan Ajmera Society Dispute
Kalyan Society Scuffle : मराठी माणसाला कल्याणमध्ये मारहाण, मुख्यमंत्री फडणवीस आक्रमक; म्हणाले, “कधी-कधी काही नमूने…”

राहुल गांधी म्हणाले, “मला तर घरच नाही”

मदिना गावात राहुल गांधी यांनी शेतात काम करणाऱ्या महिलांशी संवाद साधला. या संवादादरम्यान महिलांनी ‘आम्हाला तुमचे दिल्लीतील घर दाखवा,’ अशी विनंती केली. त्यानंतर ‘मला तर घरच नाही, माझे घर सरकारने घेतले,’ असे राहुल गांधी या महिलांना म्हणाले होते.

राहुल गांधींनी दिले होते जेवणाचे आमंत्रण

या संवादानंतर राहुल गांधींनी आपली बहीण प्रियांका गांधी यांना फोन केला. तसेच प्रियांका गांधी यांचे या शेतकरी महिलांसोबत बोलणे करून दिले. विशेष म्हणजे राहुल गांधी यांनी या महिलांना थेट दिल्लीत येण्याचे तसेच सोबत जेवण्याचे आमंत्रण दिले, हा सर्व संवाद अगदी खेळीमेळीत आणि आत्मियतेने ओतप्रोत होता.

राहुल गांधींनी केले आश्वासन पूर्ण

दरम्यान, ८ जुलै रोजी राहुल गांधी यांनी शेतकरी महिलांना जेवणाचे आमंत्रण दिले होते. हे आश्वासन त्यांनी पूर्णही केले. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी त्यांच्या समाजमाध्यम खात्यावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मदिना येथील महिला शेतकरी राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्या दिल्लीमधील घरी आल्याचे दिसत आहे. या सर्वांचीच राहुल गांधी आत्मियतेने विचारपूस करत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

गांधी परिवाराची नेटकऱ्यांकडून वाहवा

विशेष म्हणजे राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियांका गांधी या सर्वांनीच सोनिपतमधील महिला शेतकऱ्यांसोबत जेवण केले. जेवणानंतर सोनिया गांधी, प्रियांका गांधी यांनी महिला शेतकऱ्यांसोबत पारंपरिक नृत्यदेखील केले. यावेळी महिला शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. शेतकऱ्यांना थेट दिल्लीला बोलावून त्यांच्यासोबत जेवण केल्यामुळे गांधी परिवाराची सोशल मीडियावर वाहवा होत आहे. अनेक नेटकऱ्यांनी आपल्या समाजमाध्यमांच्या खात्यावर व्हिडीओ शेअर केला आहे.

Story img Loader