Pattern Of BJP To Attack Rahul Gandhi : काही दिवसांपूर्वी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल यांनी यांनी, काँग्रेस अनेक वर्षांपासून भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आणि देशातील राज्यांशी लढत असल्याचे म्हटले होते. आता राहुल गांधींच्या या विधानावर भाजपाने प्रतिक्रिया दिली असून, लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर टीका करण्याची भाजपाने ही एक नवी पद्धत पुढे आणली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून, भाजपने राहुल गांधींना राष्ट्रीय हिताच्या विरोधातील व्यक्ती म्हणून चित्रित करत, त्यांना वारंवार लक्ष्य केले आहे. “भारताविरुद्ध कट रचणाऱ्या परदेशी घटकांशी” त्यांचे संबंध असल्याने गांधी राष्ट्रीय हितासाठी हानिकारक आहेत असा युक्तिवाद भाजपाकडून सातत्याने केला जात आहे. भाजपा करत असलेल्या युक्तीवादांमधील काही मुद्दे असे आहेत की, राहुल गांधी परदेशात भारताबद्दल वाईट बोलतात, त्यांचे अब्जाधीश उद्योगपती जॉर्ज सोरोस यांच्याशी संबंधित संघटनांशी संबंध आहेत आणि ते कट्टरपंथी डाव्यांच्या प्रभावाखाली गेले आहेत.
बुधवारी काँग्रेसच्या नवीन मुख्यालयाच्या उद्घाटनानंतर पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांसमोर बोलताना राहुल गांधी म्हणाले, “आपण निष्पक्ष लढाई लढत आहोत. असे समजू नका की भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशातील प्रत्येक संस्था ताब्यात घेतली आहे. आता आपण भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय राज्याशीच लढत आहोत.”
…हा काँग्रेसचा इतिहास आहे
राहुल गांधी यांनी कलेल्या या विधानाला त्याच दिवशी, भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय जे.पी. नड्डा यांनी एक्सवर पोस्ट करत उत्तर दिले. ते आपल्या पोस्टमध्ये म्हणाले, “देशाला जे माहित आहे, ते स्पष्टपणे सांगितले त्यासाठी मी राहुल गांधी यांचे कौतुक करतो. त्यांनी मान्य केले की, ते भारतीयांशीच लढत आहेत. हे गुपित नाही की, राहुल गांधी आणि त्यांच्या लोकांचे शहरी नक्षलवाद्यांशी जवळचे संबंध आहेत.”
नड्डा यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले की, “भारत कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असलेल्या सर्व शक्तींना प्रोत्साहन देण्याचा काँग्रेसचा इतिहास आहे. त्यांचा सत्तेचा लोभमुळे त्यांनी देशाच्या अखंडतेशी आणि लोकांच्या विश्वासाशी तडजोड केली आहे. परंतु, भारतातील जनता सुज्ञ आहे. त्यांनी राहुल गांधी आणि त्यांच्या कुजलेल्या विचारसरणीला कायमचे नाकारण्याचा निर्णय घेतला आहे.”
राहुल गांधींची हिंडेनबर्गशी आंतरराष्ट्रीय युती
नड्डा यांनी राहुल गांधींवर टीका केल्यानंतर एका दिवसाने, भाजपाचे प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले की, “अदाणी समूहावर गैरव्यवहाराचे आरोप करणारी आणि आता बंद होत असलेल्या हिंडेनबर्ग रिसर्च या शॉर्ट-सेलर कंपनीशी काँग्रेस नेत्याची आंतरराष्ट्रीय युती आहे. गांधींसह ही संस्था भारतीय अर्थव्यवस्थेचे नुकसान करण्याचा प्रयत्न करत आहे.”
डाव्या विचारसरणीचे लोक राहुल गांधींचे कान आणि डोळे
नाव न सांगण्याच्या अटीवर एका वरिष्ठ भाजपा नेत्याने आरोप केला की, “डाव्या विचारसरणीने काँग्रेस ताब्यात घेतली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या विधानांना त्यांच्यावर अशा प्रकारे हल्ला करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. जेव्हा ते म्हणतात की, ते भारतीय राज्याविरुद्ध लढत आहेत, तेव्हा हे स्पष्ट होते की, ते कट्टरपंथी डाव्यांच्या प्रभावाखाली आहेत, ज्यांना भारतातील राज्यावर टीका करण्याची सवय आहे.”
या भाजपाने नेत्याने पुढे असा आरोप केला की, “काँग्रेसने १९६० च्या दशकाच्या उत्तरार्धापासून डाव्या विचारसरणीला प्रोत्साहन देत आहे. गेल्या दशकात डाव्या विचारसरणीला उतरती कळा लागल्यामुळे त्यांच्या अनेक नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ते आता राहुल गांधींचे डोळे आणि कान बनले आहेत. म्हणून, काँग्रेस डळमळीत असताना, डाव्यांनी त्यांचे मन जिंकले आहे.”