Rahul Gandhi : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबरला होणार आहे. तर विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबरला लागणार आहे. नेमकं या दिवशी काय घडणार? याकडे सगळ्या राज्याचे डोळे लागले आहेत. दरम्यान राहुल गांधींनी विदर्भातून प्रचाराला सुरुवात केली. विदर्भातल्या नागपूर या ठिकाणी त्यांनी संविधान बचाओ रॅली काढली होती. प्रचारासाठी राहुल गांधींनी विदर्भ का निवडला? हे आपण समजून घेऊन. राहुल गांधी नागपूरमध्ये होते त्यानंतर मुंबईतल्या बीकेसी या ठिकाणीही त्यांनी सभा घेतली. त्यावेळी त्यांनी महिलांना दरमहा ३ हजार रुपये देण्याची घोषणा करत महालक्ष्मी योजनेची घोषणा केली आहे. सरकार आल्यास ही योजना लागू करु असं आश्वासन राहुल गांधींनी ( Rahul Gandhi ) दिलं आहे.
राहुल गांधींनी नागपूरमधून प्रचार का सुरु केला?
नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आहे हे एकमेव कारण नाही तर नागपूर हे भाजपा आणि संघ विचारांचं शहर आहे. तसंच या ठिकाणी चैत्यभूमि आहे. ७६ मतदारसंघांत ज्या ठिकाणी काँग्रेस आणि भाजपाची थेट लढत आहे त्यातील ३६ मतदारसंघ विदर्भात आहेत. विदर्भातला हा कापूस पट्टा काँग्रेस आणि भाजपा दोन्हीसाठी महत्त्वाचा आहे. या सगळ्या कारणांमुळे राहुल गांधींनी विदर्भातून प्रचाराला सुरुवात केली असावी असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. या मतदारसंघांमध्ये विजय मिळवणं महत्त्वाचं आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं होतं. म्हणूनही राहुल गांधींनी ( Rahul Gandhi ) प्रचार सुरु केला आहे.
हे पण वाचा- भाजपला गोरगरिबांचा विसर-राहुल गांधी
विदर्भ हा काँग्रेसला बालेकिल्ला मानला जात असे
विदर्भ हा काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला होता. मात्र भाजपाने ६२ पैकी ४४ विधानसभा मतदारसंघ जिंकून या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला. त्यामुळे पक्ष १० वर घसरला होता. पाच वर्षांपूर्वी भाजपाची घसरण झाली. पण काँग्रेसला पुन्हा १५ जागांवर समाधान मानावं लागलं. या सगळ्या समीकरणांचा विचार करता विदर्भातलं नागपूर निवडून राहुल गांधींनी ( Rahul Gandhi ) प्रचार सुरु केला आहे. भाजपाने ४०० हून अधिक जागा मिळवल्या तर ते संविधान बदलणार असा प्रचार लोकसभेला करण्यात आला होता. आता त्या अजेंड्यावर राहायचं असेल तर नागपूरमध्ये दिक्षाभूमी उभारण्यात आली आहे. तसंच बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा एक मोठा वर्गही आहे त्यामुळे हेदेखील एक महत्त्वाचं कारण आहे.
नाना पटोले, विजय वडेट्टीवार विदर्भातलेच
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे दोघंही विदर्भातलेच आहेत. तसंच पक्षातले दुसऱ्या फळीचे जे नेते आहेत त्यातलेही अनेक लोक विदर्भातले आहेत. बुधवारी राहुल गांधी जेव्हा नागपूरमध्ये आले तेव्हा त्यांनी दीक्षाभूमीलाही भेट दिली. तसंच त्यानंतर ओबीसी युवा मंचच्या कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली होती. या सगळ्या कारणांवरुन हे लक्षात येतं की राहुल गांधींनी ( Rahul Gandhi ) प्रचाराची सुरुवात करायला विदर्भ का निवडला?