अलिबाग – रायगड जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे आमदार विजयी झाले आहे. प्रशांत ठाकूर, आणि भरत गोगावले सलग चौथ्यांदा विधानसभेवर निवडून आले आहेत. तर आदिती तटकरे दुसऱ्यांदा आमदार झाल्या आहेत. या तिघांनाही राज्याच्या मंत्रीमंडळात स्थान मिळेल अशी अपेक्षा रायगड जिल्ह्यातून व्यक्त केली जात आहे.

रायगड जिल्ह्यातून भाजपचे तीन, शिवसेना शिंदे गटाचे तीन, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा एक आमदार निवडून आला आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला रायगडमधून यंदातरी मंत्रीपद मिळावे अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. गेल्या महायुती सरकारमध्ये रायगड जिल्ह्यातून शिवसेना आणि भाजपच्या एकाही आमदाराची मंत्रीपदावर वर्णी लागली नव्हती. मात्र त्याचवेळी पहिल्यांदाच आमदार झालेल्या आदिती तटकरे यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले होते. त्यामुळे शिवसेना आणि भाजपच्या आमदारांमध्ये नाराजीचा सूर होता. मंत्रीपदाच्या आशेवर असलेले भरत गोगावले हे प्रतिक्षा यादीवरच राहिले होते. त्यामुळे नव्याने स्थापन होणाऱ्या सरकारमध्ये शिवसेनेकडून आमदार भरत गोगावले, तर भाजपकडून प्रशांत ठाकूर यांना मंत्रीमंडळात स्थान मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ठाकूर पनवेलमधून, तर गोगावले महाड मतदारसंघातून विधानसभेवर चौथ्यांदा निवडून आले आहेत. तर आदिती तटकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून पुन्हा एकदा मंत्रीमंडळावर वर्णी लागण्याची शक्यता आहे.

support for BJP leaders decision Eknath Shinde clarification regarding the Chief Minister post Print politics news
भाजप नेत्यांच्या निर्णयाला पाठिंबा; मुख्यमंत्रीपदाबाबत एकनाथ शिंदे यांचे स्पष्टीकरण, सरकार स्थापनेत अडसर नसल्याचा खुलासा
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Ajit Pawar on Maharashtra CM Oath Taking Ceremony Date’Time in Marathi
Maharashtra CM Oath Ceremony Date : महाराष्ट्राचा कारभारी कधी ठरणार? अजित पवारांनी थेट तारीखच सांगितली; म्हणाले, “शपथविधी..”
What is the role of Chief Minister Eknath Shinde regarding the post of Chief Minister print politics news
शिंदे यांची लवचिकता की अपरिहार्यता? माघार कुठपर्यंत ?
Amit Shah and Vinod Tawde meeting
Vinod Tawde Meeting with Amit Shah: “मराठा मुख्यमंत्री असेल तर…”, अमित शाह आणि विनोद तावडे यांच्यात ४० मिनिटं काय चर्चा झाली?
sharad pawar retirement (1)
Video: शरद पवारांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत, आता राज्यसभेतही जाणार नाही? भाषणात म्हणाले…
Manoj Jarange News
Manoj Jarange : “मराठे निवडणूक लढवणार नाहीत, कारण एका जातीवर…”; मनोज जरांगेंची मोठी घोषणा

हेही वाचा – भाजप नेत्यांच्या निर्णयाला पाठिंबा; मुख्यमंत्रीपदाबाबत एकनाथ शिंदे यांचे स्पष्टीकरण, सरकार स्थापनेत अडसर नसल्याचा खुलासा

हेही वाचा – शिंदे यांची लवचिकता की अपरिहार्यता? माघार कुठपर्यंत ?

आदिती तटकरे यांच्या मंत्रीमडळातील समावेशाला विरोध

दरम्यान शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी आदिती तटकरे यांच्या मंत्रीमडळातील समावेशाला विरोध केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत गद्दारी केल्याचा आरोप केला आहे. महायुती असूनही राष्ट्रवादी काँग्रेसने कर्जत मतदारसंघात अपक्ष उमेदवार दिला. छुप्या पद्धतीने मला पाडण्याचा प्रयत्न केला असल्याचेही थोरवे यांनी म्हटले आहे. तर मंत्री कोणी व्हायचे हे पक्षाचे नेते ठरवतात, काठावर पास झालेले आमदार ठरवत नाहीत, असे म्हणत आदिती तटकरे यांनी थोरवे यांना उत्तर दिले आहे.