अलिबाग- रायगड जिल्ह्यात पालकमंत्रीपदाचा वाद थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत. पालकमंत्रीपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. त्यामुळे अल्हाददायक थंडीच्या मोसमातही जिल्ह्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

शिवसेना आमदारांच्या आक्रमक भूमिकेनंतर आदिती तटकरे यांच्या रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली. मात्र या निर्णयानंतर महायुतीमधील शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद विकोपाला गेले आहेत. शिवसेनेच्या तिनही आमदारांकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना लक्ष्य केले जाऊ लागले आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना तटकरे यांनी पाडण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप या तिघांनी केला आहे.

Shatrughan Sinha Campaign for AAP
शत्रुघ्न सिन्हा दिल्लीत ‘आप’चा प्रचार करणार; तृणमूलकडून काँग्रेसला ‘खामोश’ करण्याची रणनीती
Buddha head Ratnagiri
Buddha head Ratnagiri: भव्य बुद्धशीर्ष व मोठा तळहात…
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये ठिकठिकाणी अनोखे फलक
Delhi Assembly Election 2025
मविआचा ईव्हीएमविरोधी आंदोलनाचा चेहरा केजरीवालांच्या मदतीला, दिल्लीच्या निवडणुकीत ‘आप’ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार
MLA Satej Patil On Madhurima Raje
Satej Patil : Video : मधुरिमाराजे यांची निवडणुकीतून माघार; कार्यकर्त्यांशी बोलताना सतेज पाटलांना अश्रू अनावर; म्हणाले, “उद्या योग्य तो निर्णय…”
devendra fadnavis on amit thackeray
अमित ठाकरेंच्या उमेदवारीवर देवेंद्र फडणवीस म्हणतात, “राज ठाकरेंनी या एका जागेवर…”
Manoj Jarange News
Manoj Jarange : “मराठे निवडणूक लढवणार नाहीत, कारण एका जातीवर…”; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेनी प्रामाणिकपणे सुनील तटकरेंचे काम केले. मात्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने मदत केली नाही. सुधाकर घारे यांना निवडून आणण्यासाठी महेंद्र दळवी यांना पाडण्याचे प्रयत्न केले गेले. तर गोगावले निवडून आले तर पालकमंत्री होतील म्हणून त्यांना पाडा अशा सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या होत्या, असा आरोप राज्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी केला आहे. आम्ही करतोय ते आरोप चुकीचे आहेत. हे सिद्ध करा मंत्रीपदासह आमदारकीचाही राजीमाना देईन असे थेट आव्हान गोगावले यांनी दिले आहे.

तटकरेंचे राजकारण नेहमीच घातकी राहिले आहे. विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा एकदा समोर आले. लोकसभा निवडणुकीत तटकरेंबद्दल नाराजी होती. मात्र वरिष्ठांचा आदेश पाळून शिवसेना, भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केले आणि त्यंना निवडून आणले. पण विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या तिनही उमेदवारांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले. पण त्यांची रणनीती फसली आणि आम्ही तिघेही निवडून आलो. त्यामुळे आता तटकरेंच्या बाबतीत कुठलीही तडजोड आम्ही स्वीकारणार नाही, असा इशारा आमदार महेंद्र दळवी यांनी दिला. आमदार महेंद्र थोरवेही तटकरे यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. आदिती तटकरे यांच्यापेक्षा सुनील तटकरेंवर तिनही आमदारांचा रोष असल्याचे दिसून येत आहे.

या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसनेही उत्तर दिले आहे. आम्ही सुसंस्कृत आहोत. आघाडी, युतीच्या राजकारणात सर्वांनाच सर्वकाही मिळेल असे होत नाही. काही बाबतीत राजकीय मतभेद असू शकतात. पण त्याची चर्चा होऊ शकते. आयुष्यभर मी अशाच संघर्षाला तोंड देत आलो आहे. माझ्यावरती ज्यावेळला निराधार पद्धतीचे आरोप, राजकीय हेतू समोर ठेऊन झाले त्यांचे राजकारणात नंतर काय झाले हे सर्वांनी पाहिले आहे, असे म्हणत सुनील तटकरे यांनी शिवसेना आमदारांच्या या टीकेला उत्तर दिले आहे.

तर पालकमंत्रीपदाबाबतचा निर्णय हा मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री एकत्र बसून घेतील. पदाची अपेक्षा बाळगण्यात काही गैर नाही. पण आपण ती कशा पद्धतीने व्यक्त करतो याचे भान जपले पाहिजे, कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही ही सर्वांची जबाबदारी आहे. असा खोचक टोला महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी शिवसेना आमदारांना त्यांचे नाव न घेता लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते यांनी तिनही आमदारांवर अतिशय शेलक्या शब्दात टीका केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या तिघांना आवरावे असे आवाहन केले आहे.

पालकमंत्रीपदावरून सुरू झालेला हा वाद आता विकोपाला जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. एकमेकांची उणीदुणी काढताना दोन्ही पक्षांच्या नेत्यांची भाषा खालावत चालली आहे. त्यामुळे महायुतीमधील दोन प्रमुख पक्षांतील हा वाद थांबणार की विकोपाला जाणार हे पाहणे आता महत्वाचे असणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यावर नेमका काय तोडगा काढणार याकडे रायगडकरांचे लक्ष लागले आहे.

Story img Loader