दिल्लीत प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी केजरीवाल सरकारने फटाक्यांवर बंदी घातली आहे. पर्यावरमंत्री गोपाल राय यांनी जनतेला फटाके न फोडण्याचे आवाहन केलं आहे. तसेच, फटाके फोडल्यास कारवाईसाठी दिल्ली पोलीस आणि महसूल विभागाची पथकेही तयार करण्यात आली आहे. फटाके फोडल्यास सहा महिन्यांचा तुरुंगवास आणि २०० रुपयांचा दंडही होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मात्र, सरकारच्या या आदेशाचे केजरीवाल सरकारमधील नवनिर्वाचित मंत्र्याकडून भंग झाला आहे. त्यामुळे केजरीवाल सरकारवर विरोधकांनी हल्लाबोल केला आहे. झालं असं की, पटेल नगरमधील आपचे आमदार राजकुमार आनंद यांची दिल्ली सरकारमध्ये मंत्रीपदी वर्णी लागली आहे. त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी राजकुमार आनंद यांच्या घराजवळ जल्लोष साजरा करत फटाक्यांची आतिषबाजी केली. यावरून भाजपाने आपवर टीका केली आहे.

हेही वाचा : जयललिता मृत्यू चौकशी अहवाल : कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार, शशिकला यांनी सर्व आरोप फेटाळले

भाजपाचे प्रवक्ते हरिश खुराना यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यावर लिहलं की, “हिंदूंनी फटाके फोडले तर प्रदूषण होते. मात्र, आपच्या मंत्र्यांनी फटाके फोडले तर प्रदूषण होत नाही का? सर्व कायदे हिंदूंच्या सणांसाठीच असतात का?,” असा सवालही खुराना यांनी उपस्थित केला.

तर, भाजपाचे दुसरे प्रवक्त तेजिंदरपाल सिंग बग्गा यांनी केजरीवाल यांना ‘हिंदू विरोधी’ म्हटलं आहे. “मला त्यांना विचारायचे आहे की, तुम्ही हिंदूचा द्वेष का करता,” असा प्रश्न बग्गा यांनी उपस्थित केला. दरम्यान, आपने अद्याप याप्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj kumar anand supporters burning firecrackers flashpoint between bjp aap ssa