दयानंद लिपारे

कोल्हापूर : पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी मनसे नेते राज ठाकरे उद्या मंगळवारी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आह. पक्ष पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांना ताकद देत असताना तळातील कार्यकर्त्यांनी उमेद जागवण्याचे काम त्यांना करावे लागेल. कोल्हापूर जिल्ह्यातील मनसे निस्तेज झाली असताना त्यामध्ये चैतन्य जागवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.

Atul Save, chandrakant khaire
ठाकरेंच्या बंडखोराची माघार, काँग्रेसऐवजी भाजपा सुखावली, अतुल सावेंनी थेंट खैरेंचे पाय धरले; औरंगाबादमध्ये काय घडतंय?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
loksatta readers feedback
लोकमानस: विकासापेक्षा भावनांचे राजकारण सोपे
Nagpur video
“उठा उठा दिवाळी झाली, पुणे मुंबईला जाण्याची वेळ आली” नागपूरचा VIDEO होतोय व्हायरल
nagpur pollution increased on diwali due to use of firecrackers
प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्पना हवेत ,कोट्यवधींच्या फटाक्यांचा आवाज व धूर
pune video
वाढीव पुणेकर! एवढे उत्साही लोक फक्त पुण्यातच भेटतात, पठ्ठ्याने कारला केली लायटिंग, Video Viral
Pune air, bad air, Pune air at hazardous levels
पुण्याची हवा धोकादायक पातळीवर, बिघडलेल्या हवेचे परिणाम काय?
horrifying video of soan papadi making in this diwali went viral on social media
बापरे! इमारतीच्या भिंतीवर आपटून नंतर पायाने…, पाहा कशी बनवली जाते सोनपापडी, VIDEO होतोय व्हायरल

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना राज ठाकरे यांनी केल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला होता. कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात मनसे रुजवण्यासाठी त्यांनी २०१३ मध्ये झंझावती दौरा केला होता. तेव्हा कोल्हापुरातील राज ठाकरे यांची सभा दणकेबाज झाली होती. याचवेळी कोल्हापूर जिल्ह्यात पक्ष विस्तार मोठ्या जोमाने करणार असल्याचे संपर्क नेते यशवंत किल्लेदार यांनी मोठ्या आत्म – विश्वासाने सांगितले होते. पुढे पक्ष नेतृत्वाकडून कसल्याही हालचाली झाल्या नाहीत. स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्येही फारसा उत्साह राहिला नाही. लहान सहान आंदोलने, निवेदन इतपतच मनसेचे काम मर्यादित राहिले.

हेही वाचा: मुलाच्या विवाह सोहळ्यात दिसली जयंत पाटील यांची राजकीय शक्ती; प्रतीक पाटील यांच्यासाठी तयारी सुरू

मरगळ झटकणार का ?

गेल्या लोकसभा निवडणुकी वेळी राज ठाकरे यांचा राजकीय सूरही बदललेला होता. कोल्हापूर व इचलकरंजी या जिल्ह्यातील दोन्ही मोठ्या शहरातील त्यांच्या सभांना मोठी गर्दी झाली होती. ’ लाव रे तो व्हिडिओ ‘ या त्यांच्या वाक्यावर तरुणाई फिदा झाली होती. तरीही जिल्ह्यातील दोन्ही लोकसभेच्या जागा शिवसेनेने जिंकल्या. २०१९ सालच्या महापुरा वेळी शर्मिला राज ठाकरे यांनी कोल्हापूर – सांगली भागाचा दौरा केला. अडचणीच्या वेळी मनसे मदतीसाठी धावल्याने पूरग्रस्तांना दिलासा मिळाला होता. त्यानंतर पुन्हा जिल्ह्यातील मनसेमध्ये मरगळ निर्माण झाली.

हेही वाचा: कुस्तीगीर परिषदेतही राजकीय आखाडा

मनसेचे मुक्तद्वार

फेब्रुवारी २०२० मध्ये राज ठाकरे राज्याच्या दौऱ्याच्या निमित्ताने कोल्हापूर येणार होते. तथापि, करोना टाळेबंदी, राज ठाकरे यांचे आजारपण यामुळे दौरा पुढे गेला. आता संघटनात्मक बांधणीसाठी ठाकरे मंगळवारी करवीरनगरीत येत आहे. दरम्यानच्या काळात मनसेचे चित्रही आमूलाग्र बदललेले आहे. मनसेचे जिल्हा अध्यक्ष गजानन जाधव यांच्यावर हद्दपारची कारवाई झाली. मनसेमध्ये कोणी यावे-जावे याला काही धरबंद उरला नसल्याचा परिणाम संघटना विस्कळीत होण्यावर झाला आहे. विद्यमान जिल्हा नेते पुंडलिक जाधव यांनी शिवसेनेप्रमाणे (भाजप, जनशक्ती, जनसुराज्य शक्ती व्हाया) मनसेमध्ये दुसऱ्यांदा प्रवेश केला आहे. सोयीसाठी पक्षाचा वापर करून घेणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा वावर वाढतो आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या विषयी आकर्षण असणारा तरुण वर्ग मनसेपासून फटकून राहिला आहे.

हेही वाचा: ‘भारत जोडो’चे पडद्यामागील किस्से आणि व्यवस्थापन यंत्रणेचे अनुभव

रणनीतीतील बदलाची अपेक्षा

मनसेच्या जिल्हा पातळीवर गेल्यावेळची सदस्य नोंदणी ४७ हजार असल्याचे सांगितले जाते. ती एक लाख करण्याचा निर्धारही व्यक्त केला जात आहे. मात्र फुगीर आकडेवारी आणि फुटकळ आंदोलने याद्वारे मनसे कोल्हापूर सारख्या भागात रुजण्याची शक्यता अंधुक आहे. यासाठी राज ठाकरे यांनीच रणनीती मध्ये बदल केला पाहिजे. पदाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावून सक्रिय होण्यास भाग पाडण्याची गरज व्यक्त होत आहे. शिवाय, किमान महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद अशा निवडणुकांमध्येही उमेदवारांना उभे करून त्यांची आणि पक्षाची ताकदही आजमावून पाहावी, अशीही अपेक्षा तळातील कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.