Raj Thackeray Maharashtra Assembly Election 2024 Amit Thackeray For Mahim Constituency : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतंच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, “२० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक होऊन राज्यात भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार येईल. मनसेच्या पाठिंब्यावर राज्याला भाजपाचा मुख्यमंत्री मिळेल. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेच्या विपरित भूमिका त्यांनी यावेळी घेतली आहे. राज ठाकरे यांनी यावेळी त्यांची रणनीती बदलली असल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असणारे राज ठाकरे गेल्या काही वर्षांपासून बाजूला फेकले गेले आहेत. गमावलेलं राजकीय स्थान पुन्हा मिळवण्यासाठी त्यांची सध्या धडपड चालू आहे. त्यासाठीच त्यांनी त्यांची रणनीती बदलली आहे.

राज ठाकरे यांच्यासाठी व मनसेसाठी ही विधानसभा निवडणूक खूप महत्त्वाची आहे. त्यांच्या पक्षाने लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. विधानसभेत त्यांचा केवळ एकच आमदार आहे. गेल्या काही वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. अशा स्थितीत ही निवडणूक राज ठाकरे यांच्या अस्तित्वाची लढाई बनली आहे. यासह त्यांचा मुलगा अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे, त्यामुळे मुलाला निवडून आणणं हे देखील त्यांच्यासमोरचं मोठ आव्हान आहे. मनसे यावेळी राज्यात १६५ जागा लढवत आहे. यापैकी काही जागा निवडून आणण्यासाठी त्यांनी महायुतीतील पक्षांशी वाटाघाटी सुरू केल्या आहेत.

Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Satej Patil On Madhurima Raje
Satej Patil : “दम नव्हता तर उभं राहायचंच नव्हतं ना…”, काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने सतेज पाटील संतापले
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Rashmi SHukla on Sharad Pawar
Rashmi Shukla Transferred : रश्मी शुक्लांच्या बदलीवर शरद पवारांची प्रतिक्रया, म्हणाले, “आता त्या…”
devendra fadnavis on amit thackeray
अमित ठाकरेंच्या उमेदवारीवर देवेंद्र फडणवीस म्हणतात, “राज ठाकरेंनी या एका जागेवर…”
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 Updates in Marathi
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : ‘जे बाळासाहेबांचे झाले नाहीत, ते राज ठाकरेंचे काय होणार?’, राजू पाटलांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

मनसेची घसरण

मराठी स्वाभिमान व प्रादेशिक अस्मितेचे पुरस्कर्ते असणारे राज ठाकरे नोव्हेंबर २००५ मध्ये शिवसेनेतून बाहेर पडले. त्यानंतर चार महिन्यांनी त्यांनी स्वतःचा पक्ष (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) काढला. या पक्षाने पहिल्याच विधानसभा निवडणुकीत सर्वांना मोठा धक्का दिला. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत या पक्षाचे १३ आमदार निवडून आले होते. त्यापाठोपाठ या पक्षाला नाशिक महापालिकेची सत्तादेखील मिळाली. मात्र, अशी कामगिरी या पक्षाला परत कधीच करता आली नाही. गेल्या काही वर्षांमध्ये या पक्षाची पिछेहाट झाली आहे. तसेच राज ठाकरे यांच्या भूमिका सातत्याने बदलत गेल्या आहेत, त्यामुळे लोकांचा विश्वास संपादन करणं त्यांच्या पक्षासाठी व उमेदवारांसाठी कठीण जातंय. २००९ च्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला राज्यात ५.७५ टक्के मतं मिळाली होती, तर २०१९ मध्ये त्यांच्या पक्षाला २.२५ टक्के मतं मिळाली होती.

हे ही वाचा >> निवडणुकीपूर्वी बदली झालेल्या रश्मी शुक्ला कोण आहेत? विरोधकांनी त्यांच्या बदलीची मागणी का केली होती?

पाच वर्षांत भूमिका बदलली

२०१४ च्या निवडणुकीआधी राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं (तेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते) कौतुक केलं होतं. मात्र, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी राज ठाकरे म्हणाले, “मोदी आणि अमित शाह (केंद्रीय गृहमंत्री व मोदींचे निकटवर्तीय) ही दोन नावं भारताच्या राजकीय क्षितीजावरून हटवायला हवीत.” तेव्हा राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात मोदी व भाजपाविरोधात प्रचार केला होता. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थनार्थ १० प्रचारसभादेखील त्यावेळी राज ठाकरे यांनी घेतल्या होत्या. त्याच राज ठाकरे यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीवेळी नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता.

ईडीच्या चौकशीनंतर राज ठाकरेंचा सूर बदलला?

इन्फ्रास्टक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेसशी (आयएल अँड एफएस) संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाच्या (मनी लॉन्डरिंग) तपासादरम्यान सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राज ठाकरे यांचीदेखील चौकशी केली होती. त्या चौकशीनंतर राज ठाकरे यांच्या भूमिका बदलत गेल्याचं पाहायला मिळालं आहे.

हे ही वाचा >> भाजप नेत्याच्या ‘दिवाळी मिलन’ सोहळ्याचे जोरगेवार, अहीर यांना निमंत्रण, मुनगंटीवारांना डावलले

भाजपाशी जवळीक

राज ठाकरे अलीकडेच एका मुलाखतीत म्हणाले होते की, “शिवसेनेव्यतिरिक्त इतर कुठल्या पक्षात माझे जवळचे संबंध असलेले सर्वाधिक नेते असतील तर ते भाजपात आहेत.” ?प्रमोद महाजनांपासून ते इतर अनेक नेत्यांबरोबर राज ठाकरे यांचे चांगले संबंध आहेत. आताचे देवेंद्र फडणवीस, आशीष शेलार हे राज ठाकरे यांना नेहमी भेटत असतात, त्यावरून त्यांची राजकारणाबाहेरील मैत्रीदेखील पाहायला मिळते.

मनसेमुळे नवी राजकीय समीकरणं तयार होणार?

राज ठाकरे हे राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असणाऱ्या नेत्यांपैकी एक आहेत. तसेच भाजपाचे सध्याचे सर्वात मोठे प्रतिस्पर्धी उद्धव ठाकरे यांचे राज ठाकरे हे देखील प्रतिस्पर्धी आहेत. दोघेही एकमेकांची विश्वासार्हता कमी करण्याचे प्रयत्न करताना दिसतात. तसेच, त्यांचं राजकीय वैर जगजाहीर आहे. राज ठाकरे यांनी अलीकडेच उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केला की, त्यांनी शिवसेनेचा मूळ विचार व तत्त्वे सोडली आहेत. हीच भूमिका घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केली होती. या विचारावर शिवसेना (शिंदे) व मनसे नेत्यांचं एकमत आहे. मुख्यमंत्री शिंदे व राज ठाकरे यांच्या गाठीभेटीदेखील अलीकडच्या काळात वाढल्या आहेत. या भेटींद्वारे राज्याच्या राजकारणात नवी समीकरणं पाहायला मिळू शकतात.

हे ही वाचा >> Thane Vidhan Sabha Constituency : राजन विचारेंच्या उमेदवारीने ठाण्यात संजय केळकर यांना बळ

राज ठाकरेंमुळे उद्धव ठाकरेंइतकंच एकनाथ शिंदेंचंही नुकसान होण्याची शक्यता

शिवसेना (ठाकरे), शिवसेना (शिंदे) व मनसे हे मूळ एकाच पक्षाचे तीन भाग आहेत. यांचा मतदारवर्ग एकच आहे. शहरी भागात यांचा प्रचाराचा मुद्दादेखील सारखाच आहे, त्यामुळे राज ठाकरे यांची उपस्थिती उद्धव ठाकरे यांच्याइतकीच एकनाथ शिंदेंसाठीदेखील घातक आहे.

टोलमाफीच्या निर्णयाचा मनसेला फायदा होणार?

महाराष्ट्र सरकारने निवडणुकीच्या आधी मुंबईत येणाऱ्या लहान वाहनांना टोलमाफी जाहीर केली. हाच मुद्दा घेऊन राज ठाकरे यांची मनसे गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलनं करत आली आहे. त्यामुळे या टोलमाफीचं श्रेय शिंदेंच्या शिवसेनेइतकंच मनसेचंदेखील असल्याचं मनसे नेते व कार्यकर्त्यांनी वेळोवेळी ठणकावून सांगितलं आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मनसेची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली.