निलेश पानमंद
ठाणे : ठाणे लोकसभा मतदार संघातील उमेदवाराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने कमालीची गुप्तता पाळली असतानाच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने या मतदार संघातून राजन विचारे यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटात मोठी पडझड सुरू असताना राजन विचारेही शिंदे सेने सोबत जातील याविषयी गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र आपण मातोश्री शी निष्ठावान असल्याचे विचार यांनी दाखवून दिले असून सलग तिसऱ्यांदा त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याविरोधातील उमेदवार ठाकरे गटाने अद्याप जाहीर केलेला नसून या ठिकाणी ठाकरे गटाकडून उमेदवाराचा शोध सुरूच असल्याचे चित्र आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उठाव केला. यानंतर राज्यासह ठाणे जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधींनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांना समर्थन दिले होते. तर खासदार राजन विचारे यांनी मात्र उद्धव ठाकरे यांची साथ दिली होती. तेव्हापासूनच ठाणे लोकसभा मतदारसंघातून राजन विचारे हे ठाकरे गटाचे उमेदवार असणार हे जवळपास निश्चित झाले होते आणि तशा प्रकारचे संकेत पक्षाच्या नेत्यांकडून जाहीर सभांमध्ये देण्यात आले होते. असे असतानाच ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीसाठी १७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्या असून त्यात राजन विचारे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. ठाकरे घटना राजन विचारांचे उमेदवारी जाहीर केले असली तरी शिंदेंच्या शिवसेनेने मात्र या मतदारसंघातील उमेदवाराच्या जाहीर केलेला नाही.
आणखी वाचा-शिवसेनेच्या आक्रमकपणामुळे काँग्रेसची फरफट
ठाणे महापालिकेचे नगरसेवक सभागृहनिता महापौर अशी महत्त्वाची पदे राजन विचारे यांनीनी भूषविली आहेत. याशिवाय ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे ते आमदारही होते. २०१४ साली त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर लोकसभेची पहिली निवडणूक लढवली. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार संजीव नाईक यांचा त्यांनी पराभव केला होता. यानंतर २०१९ साली झालेल्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांचा पराभव केला होता. असे असले तरी दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत दोन गट पडले असून यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलले आहेत. त्यामुळे त्यामुळे राजन विचारांच्यासाठी यंदाची निवडणुकी कशी सोपी नसल्याचे बोलले जात आहे.
कल्याणमध्ये उमेदवाराचा शोध सुरू
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. ते या मतदारसंघातून दोनदा निवडून आले आहेत. शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर ठाकरे गटाने येथील मतदार संघावर लक्ष केंद्रित केल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे असले तरी ठाकरे गटाने मात्र अद्याप या मतदारसंघातून उमेदवार जाहीर केलेला नाही.