विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजस्थानमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. येथे सध्या काँग्रेसची सत्ता आहे. ही सत्ता कायम राखण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करत आहे. तर काँग्रेसला सत्तेतून खाली खेचण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जात आहे. या राज्यात भाजपा आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत होणार आहे. मात्र ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुसलमीन (एआयएमआयएम) पक्षानेदेखील या निवडणुकीत उडी घेतली आहे. एआयएमआयएम पक्ष ही निवडणूक लढवत असल्यामुळे त्याचा काँग्रेसला तोटा होण्याची शक्यता आहे.

एआयएमआयएम पक्षाने तीन जागांवर दिले उमेदवार

एआयएमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी हे राजस्थानमध्ये काँग्रेस तसेच भाजपा या दोन्ही पक्षांवर टीका करत आहेत. काँग्रेस आणि भाजपा हे दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. देशातील अल्पसंख्याकांना त्यांना शक्तीशाली होऊ द्यायचे नाही, अशी टीका ओवैसी करत आहेत. एआयएमआयएमने राजस्थानच्या तीन जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. हा पक्ष लवकरच आपल्या आणखी उमेदवारांची घोषणा करण्याची शक्यता आहे.

BJP state president MLA Chandrasekhar Bawankule appeal to Uddhav Thackeray regarding election
“उद्धव ठाकरेंनी कोणत्याही मतदारसंघातून जिंकून दाखवावे,” भाजप प्रदेशाध्यक्षांचे आवाहन
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Congress leader met Uddhav Thackeray on his nagpur
नागपूर: काँग्रेस नेते उद्धव ठाकरेंना भेटले, जागा वाटपावर चर्चा?
Congress manifesto announced for Haryana print politics news
शेतकरी कल्याण, रोजगारनिर्मितीवर भर; हरियाणासाठी काँग्रेसचा जाहीरनामा जाहीर
akola west vidhan sabha
अकोला: उमेदवारीसाठी काँग्रेसमध्येच संघर्ष…इच्छुकांमधील तब्बल १५ जणांचा गट…
sharad pawar loyalist jayant patil criticized amit shah narendra modi
मोदी व शहा यांचे आम्ही आभार मानतो, त्यांनी आमच्या पक्षातील सर्व दोष त्यांच्याकडे  घेतले – प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे प्रतिपादन
uttar pradesh bypoll
UP Bypoll 2024 : समाजवादी पक्षाकडून काँग्रेसला दोन जागांचा प्रस्ताव; काँग्रेस पाचवर ठाम; जागावाटपावरून दोन्ही पक्षांत मतभेद?
Shetkari Sangharsh Kruti Samiti, Dhananjay Munde,
कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात सर्वपक्षीय ‘शेतकरी संघर्ष कृती समिती’ची मोट

मुस्लीम समाजाला ओवैसी यांचे आवाहन

राजस्थानच्या निवडणुकीची घोषणा झाल्यापासून ओवैसी हे सातत्याने राजस्थानचा दौरा करत आहेत. येथे ते वेगवेगळ्या ठिकाणी सभांना संबोधित करत आहेत. अशाच एका सभेत बोलताना त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर काँग्रेस आणि भाजपाला लक्ष्य केले. तसेच आपल्या भाषणांत ते मुस्लीम समाजाने एकत्र व्हावे. आपल्या राजकीय नेतृत्वाला विधानसभेत पाठवण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहनही ते करत आहेत.

AIMIM ने कोणाला तिकीट दिले?

एआयएमआयएमने घोषित केलेल्या आपल्या तीन उमेदवारांत राजस्थान एआयएमआयएमचे प्रदेशाध्यक्ष जमील खान यांचा समावेश आहे. त्यांना जयपूरमधील हवामहल मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. जावेद अली खान यांना सिकरमधील फतेहपूर येथून उमेदवारी देण्यात आली आहे. इम्रान नवाब यांना भरतपूरमधील कामन या मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे.

तिन्ही मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात

हे तिन्ही मतदारसंघ सध्या काँग्रेसच्या ताब्यात आहेत. हवामहल मतदारसंघाचे आमदार महेश जोशी आहेत. सध्या ते मंत्री आहेत. कामन मतदारसंघाचे आमदार जहिदा खान आहेत. फतेहपूर मतदारसंघाचे आमदार हकाम अली खान आहेत. २०१८ सालच्या विधानसभा निवडणुकीत एकूण मतांपैकी ५० टक्के मते ही जोशी यांना मिळाली होती. त्यांनी भाजपाचे उमेदवार सुरेंद्र पारिक यांना ९२०० मतांच्या फरकाने पराभूत केले होते. कामन मतदाररसंघात जहिदा यांनी भाजपाच्या जवाहर सिंह यांना ३९ हजार ६३० मतांनी पराभूत केले होते. तर फतेहपूर येथे हकाम यांनी भाजपाच्या सुनिता कुमारी यांच्यावर अवघ्या ८६० मतांनी विजय मिळवला होता.

हवामहल मतदारसंघात १.३५ लाख मुस्लीम

जमील खान यांच्या राजस्थानमध्ये अनेक शिक्षणसंस्था आहेत. ते “We Can” या शाळेचे संचालक आहेत. खान यांच्या नातेवाईकांत आएएस, आरएएस अधिकारी आहेत. ओबीसी आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायधीश भंवरू खान हेदेखील जमील खान यांचे नातेवाईक आहेत. खान यांचे आजोबा जबोदी खान यांनी १९७७ साली भाजपाच्या तिकिटावर विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराने त्यांचा २६०० मतांनी पराभव केला होता. हवामहल मतदारसंघात एकूण २.५ लाख मतदार आहेत. यातील १.३५ लाख मुस्लीम मतदार आहेत. भाजपा आणि काँग्रेसने अद्याप हवामहल या मतदाररसंघासाठी उमेदवार जाहीर केलेले नाहीत.

कामन मतदारसंघात एकूण २.५ लाख मतदार

इम्रान नवाब हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. गेल्या दोन वर्षांपासून ते एआयएमआयएम पक्षाशी संबंधित आहेत. त्यांच्यावर एआयएमआयएमने चार जिल्ह्यांच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपवलेली आहे. कामन मतदारसंघात एकूण २.५ लाख मतदार आहेत. यातील १.५ लाख मतदार हे मुस्लीम आहेत. या जागेसाठीदेखील भाजपा आणि काँग्रेसने आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत.

फतेहपूर मतदारसंघात जाट, मुस्लीम समुदायाचे प्रमाण अधिक

फतेहपूर मतदारसंघात जाट आणि मुस्लीम मतदारांचे प्रमाण जास्त आहे. येथील एआयएमआयएमचे उमेदवार जावेद अली खान हे वकील आहेत. काँग्रेसने या जागेवर आमदार हकम अली खान तसेच भाजपाने श्रवण चौधरी यांना उमेदवारी दिली आहे.

काँग्रेसला फटका बसणार का?

दरम्यान, राजस्थानमध्ये एकूण लोकसंख्येमध्ये ९ टक्के मुस्लीम आहेत. राजस्थानच्या एकूण २०० जागांपैकी साधारण ३५-४० जागांवर मुस्लीम मतदारांचा प्रभाव आहे. त्यामुळे या निवडणुकीत एआयएमआयएम किती उमेदवार जाहीर करणार? एआयएमआयएममुळे काँग्रेसला किती फटका बसणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.