कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपाला धूळ चारली. या निवडणुकीत काँग्रेसने १३५ जागांवर दणदणीत विजय मिळवून येथे एकहाती सत्ता स्थापन केली. या विजयानंतर काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. आगामी काही महिन्यांत राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. याच कारणामुळे येथे काँग्रेसने आपली तयारी सुरू केली आहे. राजस्थानमध्ये ज्या प्रदेशांमध्ये काँग्रेसची ताकद तुलनेने कमी आहे, अशा भागात काँग्रेस जनसंपर्क वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे. महाराणा प्रताप यांना मानणारा मोठा वर्ग असलेल्या मेवाड या प्रदेशाकडे या वेळी काँग्रेसने विशेष लक्ष दिले आहे. याच पार्श्वभूमीवर मेवाड या प्रांतात काँग्रेस आणि भाजपाचे प्राबल्य किती आहे? मेवाडमधील मतदारांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेस नेमकी कोणती मोहीम राबवत आहे? हे जाणून घेऊ या…
मेवाडमध्ये शक्ती वाढवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न
१६ व्या शतकात मेवाड राज्याचे राजा राहिलेले महाराणा प्रताप यांना मानणारा मोठा वर्ग राजस्थानमध्ये आहे. याच कारणामुळे राजस्थानमधील विधानसभेच्या निवडणुकीला काही महिने बाकी असले तरी आतापासूनच काँग्रेस मेवाड या प्रदेशात आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे. मेवाड हा प्रांत अगोदरपासूनच भाजपाचा बालेकिल्ला आहे. येथे काँग्रेसला पहिल्यापासूनच समाधानकारक यश मिळालेले नाही. मात्र मेवाड प्रांतातील उदयपूर या भागात मोठा जनसंपर्क आणि जनाधार असलेले भाजपाचे नेते गुलाबचंद कटारिया यांची आसामचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना एक प्रकारे राजस्थानच्या राजकारणातून बाहेर काढण्यात आलेले आहे. याच कारणामुळे उदयपूर, मेवाड या भागात भाजपाची ताकद सध्या कमी झालेली आहे. काँग्रेस पक्ष याच गोष्टीचा फायदा उचलण्याच्या प्रयत्नात आहेत.
हेही वाचा >> लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांची महाआघाडी होणार का? ‘नितीश कुमार फॅक्टर’चे महत्त्व काय?
सरकारकडून वीर शिरोमणी महाराणा प्रताप मंडळाची स्थापना
मागील अनेक वर्षांपासून महाराणा प्रताप, त्यांचा वारसा, त्यांचा इतिहास हा भाजपा आणि काँग्रेस यांच्यातील संघर्षाचे कारण ठरलेला आहे. महाराणा प्रताप यांनी हल्दिघाटी येथे मुघल शासक अकबर यांच्याशी युद्ध केले होते आणि म्हणूनच महाराणा प्रताप यांना राजस्थानमध्ये आदराचे स्थान आहे. महाराणा प्रताप यांचे राजकीय महत्त्व ओळखून काँग्रेस पक्ष मतदारांना आकर्षित करण्याच्या प्रयत्नात आहे. त्याचाच एक भाग म्हणून राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी महाराणा प्रताप यांच्या जयंतीचे औचित्य साधून मोठी घोषणा केली. राजस्थान सरकारकडून वीर शिरोमणी महाराणा प्रताप मंडळाची स्थापना केली जाईल असे त्यांनी जाहीर केले आहे. महाराणा प्रताप यांचै शौर्य नव्या पिढीला समजावे, महाराणा प्रताप यांच्या पराक्रमाची माहिती तरुणांना समजावी यासाठी या मंडळाची स्थापना करण्यात आल्याचे, गेहलोत यांनी सांगितले आहे.
राजपूत समाजाची कायम भाजपाला मते
“या महामंडळाच्या माध्यमातून महाराणा प्रताप यांच्या शौर्याची तरुणांना माहिती दिली जाईल. हे मंडळ अभ्यासक्रम तयार करेल, ऐतिहासिक वास्तू, गोष्टींचे संवर्धन, नवीन बांधकाम, वेगवेगळ्या भाषांवर संशोधन, प्रकाशनाचा प्रचार, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कार, व्याख्याने, कवी संमेलने आदी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करेल. यामुळे राज्यातील तरुण पिढीसाठी पोषक वातावरण निर्माण होईल,” असे मुख्यमंत्री कार्यालयाच्या निवेदनात सांगण्यात आले आहे. राजपूत समाज हा कायम भाजपाला मतदान करीत आला आहे. हा समाज महाराणा प्रताप यांना आदर्श मानतो. मात्र मंडळ स्थापन करण्याची घोषणा करून आम्हीदेखील राजपूत समाजाचे अधिकार जपणारे आहोत, असा संदेश काँग्रेस पक्ष देऊ पाहात आहे.
हेही वाचा >> धुळे लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीचा दावा
भाजपाची अशोक गेहलोत, काँग्रेसवर सडकून टीका
मेवाड क्षत्रिय महासभेने एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात बोलत असताना अशोक गेहलोत यांनी हे महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केली. या वेळी बोलताना महाराणा प्रताप यांची गौरवगाथा आगामी पिढीला सुपूर्द करण्याची जबाबदारी सध्याच्या पिढीवर आहे, असे गेहलोत म्हणाले. एकीकडे गेहलोत एका कार्यक्रमात बोलत असताना दुसरीकडे अशाच एका कार्यक्रमात भाजपाकडून त्यांना लक्ष्य केले जात होते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी यांनी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त मेवाड येथील एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या वेळी “काँग्रेसचे सरकार हे मुघलप्रेमी सरकार आहे. ते अकबराचा गौरव करतात,” अशी टीका जोशी यांनी केली. तसेच काँग्रेसकडून महाराणा प्रताप यांचा इतिहास पाठ्यपुस्तकांतून काढून टाकला जात आहे, असा आरोपही भाजपाकडून केला जातो.
मेवाडमध्ये काँग्रेसचा फक्त दोन जागांवर विजय
मेवाड हा प्रदेश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चित्तोड प्रांतामध्ये येतो. हा भाग मागील अनेक वर्षांपासून भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या भागात संघ परिवाराच्या विचारांचा प्रभाव तुलनेने अधिक आहे. याच कारणामुळे २०१८ साली काँग्रेसने निवडणूक जिंकूनही या भागात काँग्रेसचा फक्त दोन जागांवर विजय होऊ शकला. उर्वरित ८ जागांवर भाजपाच्या उमेदवारांचा विजय झाल्याचे पाहायला मिळाले.
हेही वाचा >> महाविकास आघाडीत दबावतंत्राचा खेळ!
राजपूत समाजाचा वसुंधराराजे सरकारवर राग, काँग्रेसला फायदा
राजस्थानमध्ये एकूण लोकसंख्येपैकी राजपूत समाज ११ ते १२ टक्के असल्याचे म्हटले जाते. मेवाड यासह राजस्थानमधील अन्य भागांत या समाजाचे प्राबल्य अधिक आहे आणि म्हणूनच येथे राजपूत समाजाला राजकीय दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे. २०१८ सालच्या निवडणुकीत काँग्रेसला मेवाड हा भाग वगळता उर्वरित प्रदेशात राजपूत समाजाची चांगली मते मिळाली होती. या समाजाचा तत्कालीन वसुंधराराजे म्हणजेच भाजपाच्या सरकारवर राग होता. कारण या सरकारने राजपूत समाजाच्या अनेकांवर कारवाई केली होती. वसुंधराराजे सरकारच्या काळात कुख्यात गुंड आनंदपाल सिंग यांचे एन्काउंटर करण्यात आले. तसेच भाजपा नेते जसवंत सिंह यांना मुख्य राजकारणातून बाजूला सारण्यात आले. राजपूत समाजाच्या नेत्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. परिणामी राजपूत समाज भाजपावर नाराज होता. याचा फायदा काँग्रेसला झाला.
पाठ्यपुस्तके, अभ्यासक्रमावरून काँग्रेस-भाजपा यांच्यात वाद
साधारण दशकभरापासून काँग्रेस आणि भाजपामध्ये महाराणा प्रताप यांचा इतिहास आणि पाठ्यपुस्तकांत महाराणा प्रताप यांच्याबद्दल देण्यात आलेली माहिती या यावरून वाद सुरू आहे. याआधीच्या सरकारने शालेय पाठ्यपुस्तकांत बदल करून महाराणा प्रताप यांनी १५७६ साली हल्दीघाटीत झालेल्या युद्धात अकबराला पराभूत केल्याचे नमूद केले होते. तसेच भाजपाच्या सरकारने मुघल शासकांच्या नावासमोरील ‘द ग्रेट’ हा शब्द काढून टाकला होता. मात्र २०१८ साली काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यानंतर गेहलोत सरकारने शालेय पाठ्यपुस्तकांत बदल केला. बदललेल्या अभ्यासक्रमात हल्दीघाटीच्या युद्धाबाबत दिलेल्या तपशिलामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण झाला होता. इयत्ता दहावीच्या पाठ्यपुस्तकात महाराणा प्रताप रणांगण सोडून गेले. या युद्धात त्यांचा ‘चेतक’ हा घोडा ठार झाला. तसेच महाराणा प्रताप आणि अकबर यांच्यात धार्मिक युद्ध नव्हते, तर राजकीय वर्चस्वासाठी हे युद्ध झाले होते, असे पाठ्यपुस्तकात नमूद करण्यात आले. या युद्धात कोणाचा विजय झाला, हे न सांगताच महारणा प्रताप यांच्या गनिमी काव्याविषयी माहिती देण्यात आली. याच कारणामुळे भाजपा आणि काँग्रेस यांच्यात वाद रंगलेला पाहायला मिळतो.
हेही वाचा >> जयदत्त क्षीरसागर यांची राजकीय वाटचाल कोणत्या दिशेने ?
राजपूत समाज काँग्रेसला मतदान करणार का?
काँग्रेसकडून महाराणा प्रताप यांचा अपमान केला जात आहे, असा आरोप भाजपाकडून केला जातो. तर भाजपाकडून महाराणा प्रताप यांचा राजकीय पोळी शेकण्यासाठी वापर केला जातो, असा प्रत्यारोप काँग्रेसकडून केला जातो. असे असतानाच आगामी निवडणूक लक्षात घेता काँग्रेसने राजपूत समाजाच्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोहीम आखली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात राजपूत समाज कोणाच्या बाजूने उभा ठाकणार? काँग्रेसला राजपूत समाजाची मते मिळणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.