विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजस्थानच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. राजस्थानच्या जनतेने गेल्या तीन दशकांपासून कोणत्याही एका पक्षाला सलग सत्ता दिलेली नाही. मात्र, ही परंपरा मोडीत काढण्याचा प्रयत्न राजस्थानचे मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे नेते अशोक गहलोत यांच्याकडून होत आहे. याच कारणामुळे येथे काँग्रेसकडून पूर्ण तकादीने प्रचार केला जातोय. दरम्यान, सध्या राजस्थान काँग्रेसमध्ये असे एकूण चार नेते आहेत, जे राजस्थानमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसची सत्ता आणू शकतात.

अशोक गहलोत

अशोक गहलोत हे सध्या राजस्थानचे मुख्यमंत्री आहेत. विद्यार्थी दशेत असताना ते विद्यार्थी काँग्रेसमध्ये सक्रिय होते. पुढे ते १९७४-७९ या काळात विद्यार्थी काँग्रेसचे राज्य अध्यक्ष झाले. १९७९ साली ते जोधपूर जिल्ह्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष झाले. तसेच १९८५ साली राजस्थान काँग्रेसचे ते प्रदेशाध्यक्ष होते. १९८० ते १९९९ या काळात गहलोत पाच वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. खासदारकीच्या निवडणुकीत ते फक्त एकदा १९८९ साली भाजपाचे उमेदवार जसवंत सिंह यांच्याकडून पराभूत झाले. खासदार असताना ते इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंहराव यांच्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्री होते.

Nitin Gadkari Kothrud , Chandrakant Patil,
विकासासाठी महायुतीची गरज, नितीन गडकरी यांचे आवाहन
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
BJP leader Navneet Rana launched open campaign against mahayuti in Daryapur heating up atmosphere
कमळ म्हणजेच पाना…नवनीत राणाच्या नवीन डावाने महायुतीत ठिणगी…,
jharkhand assembly election 2024 amit shah attack at rahul gandhi
झारखंडमध्ये ‘राहुल विमान’ कोसळणार! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका
Revanth Reddy : “ते भारताचे पंतप्रधान आहेत, पण…”; तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची नरेंद्र मोदींवर गंभीर टीका!
What Justice Chandiwal Said About Sachin Waze?
Justice Chandiwal : जस्टिस चांदिवाल यांचं वक्तव्य, “सचिन वाझेंकडे भरपूर मटेरियल होतं, त्यांनी मला समित देशमुखांचा मेसेज..”
Justice Chandiwal Said This Thing About Devendra Fadnavis
Justice Chandiwal : “सचिन वाझे आणि अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीसांना गुंतवण्याचा प्रयत्न केला, मी..”, जस्टिस चांदिवाल यांचा खुलासा

गहलोत तिसऱ्यांदा मुख्यमंत्री

गहलोत यांंनी १९९९ साली सरदारपुरा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जिंकून राज्याच्या राजकारणात पाय ठेवला. १९९८ साली ते पहिल्यांदा राजस्थानचे मुख्यमंत्री झाले. पुढे २००८ साली पुन्हा एकदा ते मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. सध्या गहलोत तिसऱ्यांदा मुख्यमंत्री आहेत. आपल्या राजकीय कारकिर्दीत गहलोत यांच्यापुढे अनेक संकटं आली. करोना काळात त्यांनी राज्याचे नेतृत्व केले. तसेच सचिन पायलट यांनी बंड केल्यानंतर सरकार शाबूत ठेवण्यात ते यशस्वी ठरले. आपल्या कार्यकाळात राबवलेल्या योजनांमुळे ते अद्याप राजस्थानच्या जनतेत प्रसिद्ध आहेत.

सचिन पायलट

सचिन पायलट हे राजस्थान काँग्रेसमधील तरुण नेते आहेत. त्यांनी परदेशात शिक्षण घेतलेले आहे. ते राजस्थानमधील राजकारणापेक्षा दिल्लीच्या राजकाणातच अधिक रमलेले दिसतात. २०१८ साली त्यांच्याकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद आले होते. या संधीचे सोने करून त्यांनी त्यांची क्षमता काँग्रेसच्या नेतृत्वाला दाखवून दिली होती. त्यांच्याच नेतृत्वात काँग्रेसने २०१८ सालची विधानसभा निवडणूक जिंकली होती. गेल्या अनेक वर्षांपासून ते मुख्यमंत्रिपद मिळावे यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, प्रत्येक वेळी त्यांना या पदाने हुलकावणी दिली आहे. पायलट यांचे वडील राजेश पायलट यांचा २००० सालातील जून महिन्यात अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर सचिन पायलट राजकारणात आले. २००४ साली सचिन पायलट अवघ्या २६ व्या वर्षी खासदार झाले होते. २००९ साली ते पुन्हा एकदा अजमेर या मतदारसंघातून निवडून आले. २०१३ साली काँग्रेस पक्षाचा जनाधार फारच कमी झाला होता. तेव्हा एकूण २०० पैकी काँग्रेसचे फक्त २१ आमदार होते. अशा कठीण काळात २०१३ साली सचिन पायलट यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष करण्यात आले होते.

गेल्या पाच वर्षांपासून ते राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदासाठी प्रयत्न करत आहेत. या एका मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांत पायलट आणि अशोक गहलोत यांच्यात संघर्ष पाहायला मिळालेला आहे. २०२० साली पायलट यांच्याच नेतृत्वात काँग्रेसच्या काही आमदारांनी बंड केले होते. मात्र, हे बंड अपयशी ठरल्यानंतर सचिन पायलट यांच्याकडील सर्व पदं काढून घेण्यात आली होती. पुढे सचिन पायलट अशोक गहलोत सरकारवर उघड टीका करताना दिसत होते. सध्या मात्र या दोन्ही नेत्यांमधील वाद काहीसा शमला आहे.

गोविंद सिंह दोतसारा

गोविंद सिंह चांगले वकील आहेत. विद्यार्थीदशेत असताना ते विद्यार्थी काँग्रेसचे सदस्य होते. त्यानंतर युवक काँग्रेस आणि नंतर काँग्रेस पक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास राहिलेला आहे. वयाच्या ४१ व्या वर्षी २००५ साली ते आपल्या राजकीय कारकिर्दीतील पहिली निवडणूक जिंकले. त्यांना या निवडणुकीत पंचायत समितीचे प्रधान करण्यात आले होते. त्यानंतर २००८ साली त्यांनी लक्ष्मणगड येथून विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत ते विजयी झाले होते. २०१३ साली राजस्थानमध्ये काँग्रेसची चांगलीच पडझड झाली होती. या काळातही गोविंद सिंह यांनी निवडणूक जिंकली होती. आमदारकीच्या आपल्या दुसऱ्या कार्यकाळात ते जाट समाजाचे नेतृत्व करणारे नेते म्हणून समोर आले. जातीय समतोल साधण्यासाठी काँग्रेसला त्यांचा फार उपयोग झाला. २०१८ साली ते गहलोत सरकारमध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण, पर्यटनमंत्री होते. सचिन पायलट यांनी बंडखोरी केल्यानंतर जुलै २०२० मध्य दोतसारा यांच्याकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद सोपवण्यात आले. त्यानंतर नोव्हेंबर २०२१ मध्ये त्यांनी ‘एक व्यक्ती एक पद’ या नियमाप्रमाणे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला.

सी पी जोशी

सी पी जोशी यांना काँग्रेस पक्षात आदराने प्रोफेसर म्हटले जाते. ते उच्चविद्याविभूषित असून त्यांनी काही काळ उदयपूर महाविद्यालयात मानसशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केलेले आहे. १९७३ साली जोशी राजकारणात आले. १९८०, १९८५, १९९८, २००३ आणि २०१८ अशा एकूण पाच वेळा ते नाथद्वारा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. १९९८ साली ते गहलोत सरकारमध्ये राज्यमंत्री होते. २००८ साली राजस्थानमध्ये काँग्रेसने सरकारची स्थापना केली होती. मात्र, या निवडणुकीत जोशी अवघ्या एका मताने पराभूत झाले होते. २००९ साली ते पहिल्यांदा खासदार झाले. त्यानंतर जोशी यांना लगेच केंद्रीय मंत्रिपद देण्यात आले. २००९ ते २०१३ या काळात त्यांनी वेगवेगळ्या पदांवर काम केले. २०१९ साली ते राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष झाले होते. सध्या ते पक्षाच्या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष आहेत.