लोकसभा निवडणूक दृष्टिपथात असताना काँग्रेसकडून विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला जात आहे. छत्तीसगड, मध्य प्रदेश तसेच राजस्थान या राज्यांची विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आल्यामुळे भाजपाच्या पराभवासाठी विरोधकांना सोबत घेण्यासाठी काँग्रेसकडून सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली जात आहे. असे असतानाच राजस्थान काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा बाहेर आला आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते सचिन पायलट यांनी स्वपक्षाच्या सरकारविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. राजस्थानमधील ही अस्थिरता संपविण्यात काँग्रेस नेतृत्वाचा चांगलाच कस लागणार आहे.

पायलट यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे काँग्रेसचे लक्ष विचलित होण्याची शक्यता

सचिन पायलट यांनी राजस्थानचे विद्यमान मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक गेहलोत यांच्या विरोधात नव्याने आघाडी उघडली आहे. भाजपाच्या राजवटीत भ्रष्टाचार झालेला आहे. या भ्रष्टाचाराविरोधात गेहलोत यांनी कारवाई करावी, अशी मागणी पायलट यांनी केली आहे. त्यासाठी पायलट एक दिवसीय लाक्षणिक उपोषणही करणार आहेत. पायलट यांच्या या भूमिकेमुळे काँग्रेस अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. कारण राहुल गांधी यांचे लोकसभेचे सदस्यत्व रद्द झाल्यानंतर काँग्रेसकडून भाजपावर सडकून टीका केली जात आहे. अदाणी प्रकरण आणि राहुल गांधी यांचे निलंबन या मुद्द्यांवरून भाजपाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न कॉंग्रेस करत आहे. तसेच सध्या कर्नाटक राज्याच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झालेली आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेसमधील हायकमांडपासून सर्व महत्त्वाचे नेते पूर्ण ताकदीने प्रयत्न करत आहेत. या सर्व घडामोडींमध्ये काँग्रेस व्यस्त असतानाच पायलट यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे काँग्रेसचे लक्ष विचलित होण्याची शक्यता आहे.

Yogendra Yadav, Bharat Jodo Andolan,
‘भारत जोडो’ आंदोलनातील सहभागी शहरी नक्षलवादी संघटनांची नावे जाहीर करा, योगेंद्र यादव यांचे देवेंद्र फडणवीस यांना आव्हान
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Devendra Fadnavis Dharni, Chikhaldara Skywalk Work,
‘चिखलदरा स्‍कायवॉकचे काम महाविकास आघाडीने थांबविले’, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणीसांचा आरोप
Devendra fadnavis mim
‘एमआयएम’वर उद्धव ठाकरेंपेक्षा देवेंद्र फडणवीस यांची अधिक प्रखर टीका
Rs 700 crore was recovered from liquor sellers pm Narendra Modi alleged
“काँग्रेसच्या सत्तेतील राज्य शाही परिवाराचे ‘एटीएम’, मद्यविक्रेत्यांकडून ७०० कोटी रुपयांची वसुली,” पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात
devendra fadnavis, public rally, nagpur west assembly constituency
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही पाकिस्तानमधून उमेदवार…”
Devendra Fadnavis applauded by Narendra Modi Amit Shah print politics news
मोदी, शहांकडून फडणवीस यांच्यावर कौतुकाची थाप! मुख्यमंत्री पदाचे संकेत
Devendra Fadnavis , Ravi Rana, Mahavikas Aghadi,
विरोधकांच्या डोक्‍याचे नट कसण्‍यासाठी मी राणांचा पाना… फडणवीसांकडून जोरदार….

हेही वाचा >> Karnataka : तिकीटवाटपात काँग्रेस-भाजपाकडून लिंगायत समाजाला मानाचे स्थान; लिंगायत नेत्यांना तिकीट देण्यात चढाओढ

भाजपाच्या कथित भ्रष्टाचाराबाबत मला याआधी सांगितलेले नाही

सचिन पायलट यांच्या भूमिकेबद्दल राजस्थान काँग्रेसचे प्रभारी सुखजिंदरसिंग रंधावा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सचिन पायलट यांनी भाजपाच्या कथित भ्रष्टाचाराबाबत मला याआधी सांगितलेले नाही. अशी भूमिका घेण्याची ही योग्य वेळ नाही, असे रंधावा म्हणाले आहेत. “राजस्थान काँग्रेसचा प्रभारी झालो तेव्हापासून मी सचिन पायलट यांना आतापर्यंत १० ते १५ वेळा भेटलेलो आहे. मात्र भाजपाच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा त्यांनी माझ्यासमोर एकदाही काढलेला नाही. त्यांनी माझ्यासोबत इतर मुद्द्यांवर चर्चा केलेली आहे. ते दीड वर्ष उपमुख्यमंत्री होते. मात्र पदावर असताना त्यांनी या काळात कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माझ्याशी चर्चा केल्याचे सांगितले. मात्र त्यांनी माझ्यासोबत या प्रकरणावर कधीही, कोणतीही चर्चा केलेली नाही,” असे रंधावा यांनी सांगितले.

हेही वाचा >> महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा यशस्वी करण्याचे काँग्रेसपुढे आव्हान

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी चर्चा करणार

“आम्ही सध्या अदाणी गैरव्यवहार, अदाणी आणि मोदी यांच्यातील संबंध हा मुद्दा लावून धरलेला आहे. सचिन पायलट यांनीदेखील भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. त्यामुळे त्यांनी उपस्थित केलेल्या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. मी याबाबत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी चर्चा करणार आहे. गेहलोत यांना भाजपाच्या भ्रष्टाचाराबाबत दोन पत्रे लिहिली आहेत, असे पायलट यांनी सांगितलेले आहे. या पत्रांबाबतही मी गेहलोत यांच्याशी चर्चा करणार आहे. या कथित भ्रष्टाचारावर अद्यापि कारवाई का झालेली नाही, हेदेखील मी गेहलोत यांना विचारणार आहे,” असे रंधावा यांनी सांगितले.

मुद्दा उपस्थित करण्याची ही योग्य वेळ नव्हती

सचिन पायलट यांच्या पत्रकार परिषदेची ही योग्य वेळ नाही, असे मतही रंधावा यांनी व्यक्त केले. “सध्या काँग्रेस पक्षाने राहुल गांधी यांच्यावरील कारवाईचा मुद्दा लावून धरलेला आहे. सध्या काँग्रेस पक्ष यामध्ये व्यस्त आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी आम्ही रोज पत्रकार परिषदा घेत आहोत. असे असताना सचिन पायलट यांनी हा मुद्दा उपस्थित करण्याची ही योग्य वेळ नव्हती, असे मला वाटते. त्यांनी या प्रकरणाबद्दल माझ्याशी चर्चा केलेली नाही. माझ्याव्यतिरिक्त काँग्रेसमध्ये अन्य महत्त्वाचे नेते आहेत. त्यांच्याशीही पायलट चर्चा करू शकत होते. तरीदेखील पायलट यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर मी मुख्यमंत्री गेहलोत आणि खुद्द पायलट यांच्याशी चर्चा करणार आहे,” असेही रंधावा म्हणाले.

हेही वाचा >> “हिंदू अध्यात्मिक गुरूंनी मिशनरींपेक्षाही अधिक समाजसेवा केली”, सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन

काँग्रेस येथील जनतेला पुन्हा एकदा पाठिंबा मागणार

दरम्यान, सचिन पायलट यांनी भाजपाच्या राजवटीत झालेल्या कथित भ्रष्टाचारावर कोणतीही कारवाई न केल्याचा दावा केल्यानंतर दिल्ली काँग्रेसने एक निवेदन जारी केले आहे. सचिन पायलट यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याचा यामध्ये उल्लेख नाही. मात्र काँग्रेसने गेहलोत सरकारची वाहवा केली आहे. “अशोक गेहलोत मुख्यमंत्री असलेल्या राजस्थान सरकारने अनेक चांगल्या योजना राबवलेल्या आहेत. या सरकारने नव्या कल्पना राबवल्या असून, त्याचा चांगला परिणाम येथील जनतेवर झालेला आहे,” असे काँग्रेसचे संपर्कप्रमुख जयराम रमेश म्हणाले आहेत. “राजस्थानमध्ये भारत जोडो यात्रेचे उत्तम पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. राजस्थान काँग्रेसमधील समर्पण आणि निश्चयामुळे ते शक्य झाले. काँग्रेस येथील जनतेला पुन्हा एकदा पाठिंबा मागणार आहे,” असे काँग्रेसने जारी केलेल्या निवेदनात म्हटलेले आहे.

हेही वाचा >>किच्चा सुदीपच्या राजकीय भूमिकेने कर्नाटकच्या प्रचारात रंगत

काँग्रेसने येथील नेतृत्वात बदल केल्यास काय होणार?

दरम्यान, सचिन पायलट यांच्या या भूमिकेमुळे राजस्थान काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे. राजस्थानमध्ये विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना ही अस्थिरता काँग्रेसला परवडणारी नाही. राजस्थान काँग्रेसमधील नेतृत्वात बदल करावा, अशी मागणी पायलट यांच्याकडून सातत्याने केली जात आहे. पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना काँग्रेसने नेतृत्वात बदल केला होता. परिणामी काँग्रेसला येथे सत्ता गमवावी लागली. राजस्थानमध्ये विधानसभा निवडणूक अवघ्या आठ महिन्यांवर आली आहे. असे असताना काँग्रेसने येथील नेतृत्वात बदल केल्यास, काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.