पालघर : लोकसभा निवडणुकीत अखेरच्या क्षणी उमेदवारी नाकारलेल्या राजेंद्र गावित यांच्या पुनर्वसनसाठी अनेक पर्याय उपलब्ध असताना आपल्याला पालघर विधानसभा क्षेत्रातून उमेदवारी मिळावी यासाठी आपण आग्रही असल्याचे त्यांनी पक्षश्रेष्ठी व कार्यकर्त्यांकडे स्पष्ट केले आहे. त्यामुळे शिवसेनेकडे असणारा पालघर विधानसभा मतदारसंघ भाजपकडे जाणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पालघर लोकसभा मतदारसंघात २०१८ साली झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या राजेंद्र गावित यांना २०१९ मध्ये महायुतीतर्फे शिवसेनेतून निवडणूक लढवणे भाग पडले होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ते एकनाथ शिंदे यांच्याशी संलग्न राहिले होते. २०२४ या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपातर्फे केलेल्या सर्वेक्षणात गावित यांना उमेदवारी देणे अनुकूल नसल्याचे ठरवून त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. मात्र तसे करताना राज्य मंत्रिमंडळात स्थान व आगामी विधानसभा निवडणुकीची उमेदवारी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी निश्चित केल्याचे सांगितले जात होते.
सद्यस्थितीत डहाणू, विक्रमगड, नालासोपारा व बोईसर या चार जागांवर भाजपने दावा केला असला तरी भाजपाचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत हे नियमितपणे भाजपा सर्व सहा विधानसभा जागा लढवणार असे सांगत आले आहे. पालघरची जागा शिवसेनेकडे परंपरागत असल्याने राजेंद्र गावित यांनी प्रथम विक्रमगड मतदारसंघात उमेदवारी मिळण्याबाबत चाचपणी केली होती. त्या ठिकाणी भाजपाकडून गेल्या निवडणुकीत बंड पुकारलेले तीन ते चार स्थानीय नेते इच्छुकांच्या स्पर्धेत असून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी देखील या मतदारसंघात मोर्चे बांधणी सुरू केल्याने त्यांनी पालघरकडे लक्ष वळविले आहे.

Is America Ready for Female Leadership Kamala Harris Hillary Clinton
स्त्री नेतृत्वासाठी अमेरिका तयार आहे का ?
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
On Friday Rahul Gandhi spoke with Prakash Ambedkar he said he will campaign against his candidate
‘तुमच्या उमेदवाराच्या…’ॲड. प्रकाश आंबेडकर व राहुल गांधींमध्ये नेमकी काय चर्चा
woman voters chatura article
तू मात्र या फुकट योजनांच्या अमिषाला बळी पडू नकोस…
Manoj Jarange Patil onMaharashtra Assembly Election 2024
मनोज जरांगे पाटील कुणाच्या बाजूने? उमेदवार मागे घेण्याचे कारण सांगताना म्हणाले…
Fear of division in Teli community due to the candidates given by sharad pawar and ajit pawar
पवार काका पुतण्यांनी दिलेल्या उमेदवारांमुळे तेली समाजात फूट पडण्याची भीती
Kishore Jorgewar expressed his displeasure with Sudhir Mungantiwar front of Devendra Fadnavis
थेट फडणवीसांसमोरच जोरगेवारांनी व्यक्त केली मुनगंटीवारांवर जाहीर नाराजी… म्हणाले, “मला उमेदवारी मिळू नये म्हणून…”
Mankhurd  Shivajinagar Muslim community in confusion print politics news
मानखुर्द- शिवाजीनगरात मुस्लीम समाज संभ्रमात

हेही वाचा – मराठवाड्यात भाजपकडून छत्तीसगडमधील कायर्कर्त्यांची कुमक

विक्रमगड पाठोपाठ भाजपासाठी पालघर विधानसभा क्षेत्र सुरक्षित मानले जात असल्याने राजेंद्र गावित यांनी या मतदारसंघात देखील संपर्क दौऱ्यांचे आयोजन केले होते. मात्र विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा तसेच शिवसेनेतून इच्छुक असणाऱ्या वैदेही वाढाण व अन्य मंडळींनी आपला इरादा स्पष्टपणे मांडला असून राजेंद्र गावित यांना भाजपा उमेदवार म्हणून स्वीकारणार नाही अशी भूमिका शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी घेतली आहे.
गावित यांनी बोईसर विधानसभा क्षेत्रात देखील चाचपणी करीत असून त्या ठिकाणी माजी आमदार विलास तरे हे भाजपातर्फे बाशिंग बांधून तयार असल्याचे दिसून आले आहे. तर बोईसरमधून शिवसेनातर्फे (शिंदे गट) जगदीश धोडी हे देखील उमेदवारीसाठी दावा करीत आहेत. नालासोपारा या खुल्या प्रवर्गातील मतदारसंघात भाजपाचे जिल्हाध्यक्ष खुद्द इच्छुक असल्याने राजेंद्र गावित यांची उमेदवारीसाठी काही प्रमाणात कोंडी झाल्याचे चित्र आहे.

आगामी निवडणुकीत महायुतीचे कार्यकर्ते युतीचा धर्म पाळतील तसेच आमदार निवडून येणे राज्यात सत्तास्थापनेसाठी महत्त्वपूर्ण असल्याकडे राजेंद्र गावित यांनी लक्ष वेधले. गेल्या १८-२० वर्षांपासून आपण पालघर व परिसरातील सामान्य जनतेसोबत राहिलो असून बंदरपट्टीच्या भागात आपल्याला अजूनही मोठा प्रतिसाद मिळत असल्याचा राजेंद्र गावित यांचा दावा आहे. त्यामुळे इतर विधानसभा क्षेत्रांचा पर्याय उपलब्ध असला तरीही आपण पालघर विधानसभेसाठीच आग्रही असू असे त्यांनी ‘लोकसत्ता‘शी बोलताना स्पष्ट केले.

हेही वाचा – विधिमंडळातील आश्वासने हवेत विरली !

राजेंद्र गावित यांचे पालघरमधून पुनर्वसन करण्याचे भाजपाचे पदाधिकारी यांनी निश्चित केल्यास शिवसेनेकडे असलेली महायुतीची जागा भाजपकडे देणे अपरिहार्य ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेला पालघर जिल्ह्यातील इतर काही जागांवर तडजोड करावी लागेल अशी शक्यता आहे. एकीकडे शिवसेनेत शिंदे गटात असणारे अनेक इच्छुक उमेदवार शिवसेनेच्या ठाकरे गटाशी संपर्कात असून वरिष्ठांवर दबाव टाकण्यासाठी पक्षांतर करण्याची धमकावणी दिली जात आहे. अशा परिस्थितीत राजेंद्र गावित यांना महायुतीची उमेदवारी मिळण्यासाठी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून अनुकूलता मिळवण्यासोबत शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये त्यांच्याविषयी असलेली नाराजी दूर करून एकदिलाने निवडणूक लढवण्यासाठी कसोशीचे प्रयत्न करावे लागणार आहेत.