परभणी : एक वर्षांपूर्वी तानाजी सावंत यांच्याकडून संजय बनसोडे यांच्या रूपाने राष्ट्रवादीने स्वतःच्या पक्षाकडे परभणीचे पालकमंत्रीपद घेतले होते. हे पद घेऊन जिल्ह्यात राजकीय गुंतवणूक करू पाहणाऱ्या अजीत पवारांच्या राष्ट्रवादीला महायुतीच्या समीकरणात लोकसभेच्या जागेवर पाणी सोडावे लागले पण विधानसभा निवडणुकीत पाथरी मतदारसंघातून राजेश विटेकर यांना यश मिळाल्याने राष्ट्रवादीला या गुंतवणुकीचा चांगला परतावा मिळाला आहे.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा अनुभव असलेल्या राजेश विटेकर यांनी राष्ट्रवादीमार्फत २०१९ ची लोकसभा निवडणूक खासदार संजय जाधव यांच्या विरोधात लढवली होती. या निवडणुकीत विटेकर यांचा पराभव झाला तरी त्यांनी चांगली लढत दिली होती. पुढे राष्ट्रवादीतल्या पक्षफुटीनंतर विटेकर यांनी अजीत पवारांच्या गोटात प्रवेश केला. जिल्ह्यातले राष्ट्रवादीचे सर्व ज्येष्ठ नेते हे शरद पवारांसोबत गेल्याने अजीत पवारांच्या पक्षाला विटेकर यांच्या रूपाने एक तरुण चेहरा मिळाला. त्यांनाच लोकसभेला परभणीतून रिंगणात उतरवावयाचे पक्षनेतृत्वाने ठरवले. त्यादृष्टीने विटेकर कामालाही लागले होते पण ऐनवेळी परभणीची जागा महायुतीच्या समीकरणात राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांना देण्यात आली. सर्व तयारी करूनही विटेकर यांना थांबवावे लागले. त्यांच्या या त्यागाची दखल पक्ष घेईल आणि तीन महिन्याच्या आत त्यांना विधान परिषदेवर संधी दिली जाईल असा शब्द अजीत पवार यांनी परभणीच्या जाहीर सभेत दिला होता. ठरल्याप्रमाणे विधान परिषदेच्या अकरा जागांची निवडणूक जुलै महिन्यात झाली तेव्हा विटेकर यांना संधी देण्यात आली.

Kangana Ranaut criticism that Priyanka Gandhi has no respect for democracy
प्रियंका गांधीना लोकशाहीचा आदर नाही,कंगना रानौतची टीका..
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Prakash Ambedkar, Vanchit Bahujan Aghadi Candidate pune, Vanchit Bahujan Aghadi,
“भाजपचा आरक्षण संपविण्याचा मोठा डाव”, कोणी केला हा गंभीर आरोप ?
Rajnath Singh, Shivajinagar candidate Siddharth Shirole,
महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षांना घेऊन काँग्रेस बुडणार, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची टीका
nana patole replied to devendra fadnavis
“आरएसएससुद्धा धार्मिक संघटना, मग त्यांनी…”; देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला नाना पटोले यांचे प्रत्युत्तर!
dcm devendra fadnavis in loksatta loksamvad
लोकसभेतील अपयशानंतर ‘भारत जोडो’सारख्या शक्तींवर मात; विधानसभेत प्रभाव नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
jharkhand assembly election 2024 amit shah attack at rahul gandhi
झारखंडमध्ये ‘राहुल विमान’ कोसळणार! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका

आणखी वाचा-भंडारा जिल्ह्यात भाजपची अधोगती; तीन विधानसभा मतदारसंघ, पण एकही आमदार नाही

विधान परिषदेची आमदारकी प्राप्त झाल्यानंतरही विटेकर यांना पुन्हा पाथरी विधानसभेची उमेदवारी देण्यात आली. पाथरीची जागा महायुतीत अजीत पवारांच्या राष्ट्रवादीने प्रतिष्ठेची करून स्वतःकडे घेतली, जिल्ह्यात चार जागांपैकी एक तरी जागा स्वतःच्या पक्षाकडे असलीच पाहिजे असा आग्रह त्यासाठी धरण्यात आला होता. विधानसभेच्या निवडणुकीआधी राष्ट्रवादीने जनसन्मान यात्रा काढली होती. ज्या जागा लढवायच्या आहेत किंवा ज्या ठिकाणी स्वतःच्या पक्षाचे आमदार आहेत अशा ठिकाणी या यात्रेदरम्यान पवारांनी सभा घेतल्या. परभणीच्या शेजारच्या जिल्ह्यांमध्ये या यात्रेच्या सभा पार पडल्या पण जिल्ह्यात मात्र जनसन्मान यात्रा आलीच नाही. ही गोष्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही खटकली. खऱ्या अर्थाने आपल्या पक्षाचे हातपाय पसरवायचे असतील आणि पक्षाची पाळीमुळे रुजवायची असतील तर जिल्ह्यात पक्षाचा जनतेतून आलेला एक तरी आमदार असलाच पाहिजे म्हणून अजीत पवारांच्या राष्ट्रवादीने पाथरीसाठी जोर लावला. विटेकर हे या मतदारसंघातून निवडून आल्यानंतर आता राष्ट्रवादीकडे जिल्ह्यात एक तरुण चेहरा पक्षाकडे उपलब्ध झाला आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच अन्यही छोट्या मोठ्या सत्तास्थानी पक्षाची ताकद वाढवायची असेल तर आता विटेकर यांना मंत्रीपदाची संधी मिळाली पाहिजे अशी अपेक्षा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व्यक्त करू लागले आहेत. जिल्ह्यात पक्षाच्या विस्तारासाठी विटेकर यांना राजकीय बळ नक्कीच मिळेल अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची भावना आहे.

आणखी वाचा-विदर्भातून निवडून आलेल्यांपैकी ३७ आमदार ओबीसी, विधानसभा निवडणूक निकालाचे चित्र

वडिलांच्या पराभवाचा हिशोब चुकता

राजेश यांचे वडील उत्तमराव विटेकर हे सिंगणापूर विधानसभा मतदारसंघातून पुलोद सरकारच्या काळात आमदार झाले होते. त्यानंतर १९८५ च्या सिंगणापूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत एस. काँग्रेसच्या वतीने उत्तमराव विटेकर यांना २४०१९ तर सुरेश वरपूडकर यांना २४३३१ एवढी मते मिळाली. अवघ्या ३०० मतांनी या निवडणुकीत विटेकर यांचा पराभव झाला. राजेश विटेकर यांनी तब्बल तीन दशकानंतर आपल्या वडिलांच्या पराभवाचा हिशेब चुकता केला. विशेष म्हणजे उत्तमराव विटेकर यांच्या स्मृतिदिनीच या विधानसभेचा निकाल लागला. ‘विजयाचा आनंद नक्कीच आहे पण आज ‘भाऊ’ असायला हवे होते अशी भावना विटेकर यांनी व्यक्त केली. राजेश यांनी यापूर्वी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवलेले आहे. त्यांच्या मातोश्री निर्मलाताई आणि वडील उत्तमराव हे दोघेही परभणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिलेले आहेत. एकाच कुटुंबातील तिघांनीही जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवण्याची कदाचित ही अपवादात्मक घटना असावी.