Rajinikanth meets Yogi Adityanath : दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांचा ‘जेलर’ चित्रपट प्रदर्शित झाला असून रजनीकांत यांच्या चाहत्यांचा त्याला उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने पहिल्या काही दिवसांतच ५०० कोटींचा गल्ला जमवला आहे. अभिनेते रजनीकांत चित्रपटामुळे चर्चेत होतेच, मात्र शनिवारी त्यांनी केलेली एक कृती सध्या वादाचा विषय ठरलेली आहे. रजनीकांत यांनी नुकताच उत्तर प्रदेशचा दौरा केला असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तर प्रदेशच्या राजकारणातील बहुढंगी राजकारणी राजाभैया यांची भेट घेतली. तसेच अयोध्या येथे राम मंदिराचे दर्शन घेऊन लखनऊ येथील आर्मी कमांड सेंटरलाही भेट दिली. दरम्यान योगी आदित्यनाथ यांची भेट घेत असताना रजनीकांत यांनी योगी आदित्यनाथ यांचे पाया पडून अभिवादन केले. या पदस्पर्शाचा फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रजनीकांतच्या चाहत्यांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

तमिळनाडूमध्ये योगी आदित्यनाथ यांची प्रतिमा फारशी चांगली नाही. त्यामुळे रजनीकांत यांनी त्यांचे पदस्पर्श करून तमिळनाडूच्या संस्कृतीशी दगाबाजी केली असल्याचा आरोप काही चाहत्यांनी केला आहे. हे चाहते रजनीकांत यांना आतापर्यंत देव मानत आले आहेत. तर रजनीकांत हे आज ना उद्या राजकारणात उडी घेतील, अशी आशंका काही लोकांना वाटत होती, त्यांच्या शंकेला रजनीकांत यांच्या कृतीमुळे बळ मिळाले आहे.

Nitin Gadkari Kothrud , Chandrakant Patil,
विकासासाठी महायुतीची गरज, नितीन गडकरी यांचे आवाहन
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
jharkhand assembly election 2024 amit shah attack at rahul gandhi
झारखंडमध्ये ‘राहुल विमान’ कोसळणार! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका
two kerala ias officers suspended over hindu muslim whatsapp group
अन्वयार्थ : ‘कर्त्यां’चा बेभानपणा!
sunetra pawar dhairyasheel mane on central textile committee
केंद्रीय वस्त्रोद्योग समितीवर धैर्यशील माने, सुनेत्रा पवार
udayanraje bhosale attack rahul gandhi while talking to media
सातारा: राहुल गांधी यांच्याकडून शिवाजी महाराजांची बदनामी; उदयनराजे यांचा हल्लाबोल
maharashtra vidhan sabha election 2024 shahapur assembly constituency sharad pawar ncp vs ajit pawar ncp
अजित पवारांचे दरोडा शिवसैनिकांना नकोसे
kalyan east shinde shiv sena city chief mahesh gaikwad including nine expelled from shiv sena
कल्याण पूर्वेतील बंडखोर शहरप्रमुख महेश गायकवाड; यांच्यासह नऊ जणांची शिवसेनेतून हकालपट्टी

लखनऊमधील रजनीकांत यांचा फोटो व्हायरल होण्यापूर्वी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी नुकताच जेलर चित्रपट पाहून त्याचे कौतुक केले होते. दोन्ही मुख्यमंत्री भाजपाविरोधक आहेत.

उत्तर प्रदेश दौऱ्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर तमिळनाडूचे राजकारणी आणि माजी अभिनेता कमल हासन यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला. ज्यात ते स्वतःला नास्तिक म्हणवून घेत आहेत. ते म्हणतात, “मी कधीही कुणाच्या पाया पडलो नाही, देवाच्याही नाही” केरळचे शिक्षण मंत्री व्ही. सिवनकुट्टी यांनीही रजनीकांत यांच्या कृतीची थट्टा केली. ते म्हणाले, “स्ट्रेचिंग करणे आणि पाठितून वाकणे बरे असते. पण ते (रजनीकांत) ज्याप्रकारे वाकले त्याप्रकारे त्यांच्या पाठीचे दोन तुकडे झाल्यासारखे वाटते.”

तमिळनाडूमधील एका गटाला मात्र या कृतीची चिंता वाटते. त्यांच्यामते खुद्द रजनीकांत यांनी योगी आदित्यनाथ यांना वाकून नमस्कार केल्यामुळे तमिळनाडूमध्ये त्यांच्या प्रतिमेला उंचावण्याचे काम रजनीकांत यांच्या हातून झाले आहे. ज्याचा फायदा भाजपाकडून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत घेतला जाऊ शकतो.

तथापि, जे रजनीकांत यांना जवळून ओळखतात त्यांच्यामते हे पेल्यातले वादळ आहे. रजनीकांत यांनी आपले स्टारडम आणि वैयक्तीक आयुष्य यांच्यामध्ये काही नियम पाळले आहेत आणि म्हणूनच त्यांच्याबद्दल अनेकदा गैरजसमज निर्माण होतात. हे जवळचे लोक सांगतात की, पुरोगामित्व आणि अध्यात्म, राजकीय आणि वैयक्तिक आयुष्य, सुपरस्टार आणि नम्र व्यक्ती यांच्यात सरमिसळ करता कामा नये. रजनीकांत ज्यांचे नाव शिवाजीराव गायकवाड होते, जे सुरुवातीच्या काळात बस कंडक्टर म्हणून काम करत होते. रजनीकांत यांनी नेहमीच नशीबाला प्रमुख स्थान दिले आहे. त्यांच्या स्टारडमच्या पलीकडेही एक आध्यात्मिक माणूस आहे. योगी आदित्यनाथ यांच्या पाया पडल्यानंतरही त्यांनी हेच सांगितले, “संन्याशी किंवा योगी व्यक्ती असेल तर वयाचा विचार न करता, ते त्यांचा आशीर्वाद घेतात”

रजनीकांत यांचे जवळचे मित्र आणि ज्यांनी रजनीकांत यांच्या राजकीय जीवनात उतरण्याच्या निर्णयामध्ये महत्वाची भूमिका बजावली होती ते एस. शंकर म्हणाले, “रजनीकांत यांनी जर लहान मुलावर श्रद्धा असेल तर ते त्याच्याही पाया पडतील. उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी आदित्यनाथ यांचा योगी म्हणून सन्मान केला. मात्र जे लोक सर्वच गोष्टींना राजकीय चष्म्यातून पाहतात, त्यांना ही बाब खटकणे स्वाभाविक आहे”.

एस. शंकर पुढे म्हणाले की, रजनीकांत यांनी ही कृती कुणाला प्रभावित करण्यासाठी केलेली नाही. याआधी त्यांनी पंतप्रधान नरेंद्रम मोदी किंवा दिवंगत एमजी रामचंद्रन, जे. जयललिता आणि एम. करुणानिधी यांचीही भेट घेतलेली आहे. एवढेच नाही तर माजी पंतप्रधान नरसिंहराव आणि अटल बिहारी वाजपेयी यांनाही ते भेटले. पण त्यांच्या ते कधीही पाया पडलेले नाहीत.

रजनीकांत यांचे मोठे भाऊ सत्यनारायण राव गायकवाड यांनी द इंडियन एक्सप्रेस दैनिकाला २०१८ साली मुलाखत दिली होती. त्यावेळी ते म्हणाले, रजनीकांत नम्र स्वभावाचे आहेत. वयाच्या १८ व्या वर्षापर्यंत ते आमच्या बंगळुरूनजीक असलेल्या घराजवळील रामकृष्ण मठात रोज जात होते.