१२ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री निवडण्यासाठी विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीसाठी राजस्थान भाजपाचे आमदार जयपूरमधील पक्षीय कार्यालयात गेले, तेव्हा प्रत्यक्षात मुख्यमंत्री कोण होणार? याबद्दल काही निवडक लोकांना सोडल्यास कुणालाच याबद्दल कल्पना नव्हती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही व्हायरल व्हिडीओंपैकी एका व्हिडीओमध्ये, भजनलाल शर्मा जवळून जात असताना, कोणीतरी “भाईसाहेब” हाक मारताच शर्मा आवाजाच्या दिशेने वळून कॅमेराकडे पाहतात. तेवढ्यात शर्मांचा पाठलाग करणारा एक व्यक्ती त्यांच्या मागून पुढे येतो आणि त्यांचा हात धरून सोबत नेतो, ज्याने शर्मादेखील आश्चर्यचकित होतात.

या घटनेच्या पुढच्या तासाभरातच शर्मा यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाली. यासह त्यांना सोबत घेऊन जाणाऱ्या व्यक्तीची ओळखदेखील स्पष्ट झाली. ते दुसरे तिसरे कुणी नसून भाजपाचे राजस्थान प्रदेश सरचिटणीस ऑपरेटर चंद्रशेखर होते.

१५ जानेवारी रोजी राजस्थानमध्ये सुरू असणाऱ्या कॅम्पेनमध्ये चंद्रशेखर यांनी नवीन पिढीतील नेत्यांकडे अनेक जबाबदाऱ्या सोपवल्या. यानंतर चंद्रशेखर यांना संघ आणि भाजपाने तेलंगणामध्ये पाठवले. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत तेलंगणा राज्यात भाजपा अपयशी ठरले, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.

उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेले चंद्रशेखर भाजपामध्ये प्रवेश करण्यापूर्वी आरएसएसमध्ये विभाग प्रचारक होते. सक्षम संघटक म्हणून रात्रंदिवस काम करून त्यांनी आपला ठसा उमटवला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ते काशी प्रदेशसाठी भाजपाचे सरचिटणीस होते. हीच ती महत्त्वपूर्ण निवडणूक होती, ज्यात नरेंद्र मोदी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून लढले आणि पंतप्रधान झाले.

ऑगस्ट २०१७ मध्ये जेव्हा त्यांची राजस्थानमध्ये नियुक्ती करण्यात आली, तेव्हा ते उत्तर प्रदेश भाजपाचे सरचिटणीस (संघटन-पश्चिम क्षेत्र) होते. विद्यमान मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि संघ यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी, सरकार आणि पक्षाचे कार्य मजबूत करण्यासाठी त्यांची निवड करण्यात आली. चंद्रशेखर यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी वसुंधरा राजे आणि संघ यांच्यातील वाईट संबंधांमुळे हे पद सुमारे आठ वर्षे रिक्त होते.

चंद्रशेखर यांना राजस्थानला हलवण्यात आले तेव्हा भजनलाल हे राज्य भाजपाचे सरचिटणीसही होते. याच पदामुळे ते दोघे अनेकदा एकत्र दिसले.

उदाहरणार्थ, फेब्रुवारी २०१८ मध्ये जयपूर येथे “संकल्प से सिद्धी” कार्यशाळेत चंद्रशेखर आणि शर्मा हे दोघे प्रमुख वक्ते होते. त्यानंतर १६ ऑगस्ट २०१८ रोजी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन झाले, तेव्हा ते दोघे अधिकृतपणे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मदन लाल सैनी यांच्यासह पक्षाच्या राज्य युनिटच्या वतीने आदरांजली वाहण्यासाठी जयपूरला गेले.

त्याच वर्षाच्या उत्तरार्धात राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाचा पराभव झाला. परंतु, २०१४ च्या आकडेवारीची पुनरावृत्ती करत २०१९ मध्ये राजस्थानमधील सर्व २५ लोकसभा जागा भाजपाने जिंकल्या.

२०१८ ते २०२३ या कालावधीत भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाला राज्य पातळीवर अधिक मजबूत करण्यास मदत करणारे चंद्रशेखर हे प्रमुख नेते होते. सतीश पुनिया यांच्या जागी सी. पी. जोशी यांना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बनवण्यामागे चंद्रशेखर यांचा हात असल्याचे सांगितले जाते. यासह त्यांनी शर्मा यांना मुख्यमंत्री म्हणून पाठिंबा दिल्याचेही मानले जाते.

यादरम्यान गेल्या सहा वर्षांत चंद्रशेखर यांनी राजस्थानमध्ये प्रदेश सरचिटणीसपद सांभाळताना पक्षात अनेक विरोधकही तयार झाले. गेल्यावर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत विरोधकांच्या संख्येत आणखी वाढ झाली. चंद्रशेखर यांच्यावर मतदानादरम्यान अयोग्य वागणूक आणि कामात अनियमितता असल्याचा आरोप करण्यात आला. पक्षाच्या एका नेत्याने सांगितले, “पक्षाला चांगल्या निकालांची आशा होती, परंतु तिकीट वाटप व्यवस्थित न झाल्यामुळे आम्ही केवळ ११५ जागांवर पोहोचू शकलो.”

त्यामुळे जेव्हा चंद्रशेखर यांच्या तेलंगणात स्थलांतराची बातमी आली, तेव्हा राजस्थान भाजपामध्ये काही चेहरे आनंदी दिसले.

परंतु, काही नेत्यांनुसार त्यांची भूमिका महत्त्वाची, राज्यातील पक्ष मजबूत करणारी आणि मोठा बदल घडवून आणणारी होती. “अलीकडील निवडणुकांमध्ये पक्ष तिसऱ्या क्रमांकावर होता. मात्र, त्यांनी आपली क्षमता सिद्ध केली आणि म्हणूनच त्यांना तेलंगणाला पाठवले जात आहे. जिथे त्यांच्यासाठी मोठे आव्हान आहे”, असे पक्षाच्या एका नेत्याने सांगितले.

हेही वाचा : AI : ‘एआय’ तुमचे हुबेहूब हस्ताक्षर काढू शकते, तुमच्यासाठी हे धोकादायक ठरू शकते का? वाचा..

राजस्थानमध्ये भारतीय जनता पक्षाला एका नवीन उंचीवर आणि मजबूत बनवल्यानंतर त्यांना इतर राज्यातील काही भागांतील विरोधकांचीही माहिती आहे. यामुळेच चंद्रशेखर यांनी स्वत: नवीन असाइनमेंट मागितले असल्याचेही बोलले जात आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajsthan bjp general secretary moved to telangana reason rac
Show comments