Raju Patil in Kalyan Assembly Constituency : कल्याण लोकसभा निवडणुकीत मनसेचे प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी शिवसेनेचे उमेदवार खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या विजयासाठी जोरदार प्रयत्न केले होते. त्याची परतफेड विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून केली जाईल, अशी चर्चा सुरू असतानाच उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात शिंदे शिवसेनेने कल्याण ग्रामीण मतदारसंघात शहरप्रमुख राजेश मोरे यांची उमेदवारी जाहीर करून मनसेच्या राजू पाटील यांच्या समोर आव्हान उभे केले आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला मनसेची साथ होती. त्यामुळे कल्याण ग्रामीण मतदारसंघात मनसेचे आमदार राजू पाटील यांनी कल्याण लोकसभेतील शिवसेनेचे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्याशी असलेले विकास कामांविषयीचे जुने सर्व वाद विसरून त्यांच्या मोठ्या मताधिक्य आणि विजयासाठी अथक प्रयत्न केले होते. कल्याण ग्रामीणमधील डाॅ. शिंदे यांच्या १ लाख ५१ हजार मतांमध्ये महायुतीच्या मतदारांबरोबर राजू पाटील यांचाही तितकाच मोलाचा वाटा होता. कल्याण ग्रामीणमध्ये लोकसभा निवडणूक काळात पहिल्या टप्प्यात शिवसेनेला अनुकूल वातावरण नव्हते. पण शेवटच्या टप्प्यात शिंदे शिवसेनेने या भागातील बडे म्होरके शिंदे शिवसेनेत घेतले. त्यामुळे वातावरण फिरले. आणि या म्होरक्यांबरोबर मनसेच्या तगड्या कार्यकर्त्यांनी हात राखून न ठेवता खासदार शिंदे यांच्यासाठी काम केले.

Former CM Devendra Fadnavis of the BJP and Sena leader Sanjay Raut Meet
Meeting of Devendra Fadnavis and Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या ‘फोटो ऑफ द डे’ ची इनसाईड स्टोरी काय?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
BJP Narendra Mehata in Mira Bhayander Assembly Constituency
Mira Bhayandar Vidhan Sabha Constituency : मीरा-भाईंदरची भाजपाची उमेदवारी अखेर नरेंद्र मेहतांनाच, मुख्यमंत्र्यांच्या सहयोगी आमदार गीता जैन एकाकी
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Sharad Pawar
Sharad Pawar : “मला दिवसभर उभं करून…”, शरद पवारांनी सांगितलं पक्षफुटीनंतर सर्वोच्च न्यायालयात काय घडलेलं?
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
Maharashtra assembly election 2024 Sharad Pawar NCP releases fifth list of 5 candidates
Sharad Pawar NCP 5th Candidate List : मोठी बातमी! शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पाचवी यादी जाहीर; माढा मतदारसंघात दिली ‘या’ नेत्याला उमेदवारी
devendra fadnavis on amit thackeray
अमित ठाकरेंच्या उमेदवारीवर देवेंद्र फडणवीस म्हणतात, “राज ठाकरेंनी या एका जागेवर…”

हेही वाचा – माघार घेणाऱ्या तनवाणींचा बोलविता धनी वेगळाच

विधानसभेसाठी शिवसेना, मनसेची युती नसली तरी समझोत्याने शिवसेना कल्याण ग्रामीणमध्ये मनसेला साथ देईल, असे चित्र होते. शेवटच्या क्षणी शिंदे शिवसेनेने राजेश मोरे यांची कल्याण ग्रामीणमध्ये उमेदवारी जाहीर केली. मोरे हे डोंबिवली किंवा ग्रामीणमधून निवडणूक लढविण्यासाठी मागील दोन सत्रापासून इच्छुक आहेत. त्यांची इच्छा यावेळी शिवसेनेने पूर्ण केली आहे.

हेही वाचा – पुण्यातील दोन मतदारसंघांत महायुतीत बेबनाव

मोरे यांच्या उमेदवारीमुळे कल्याण ग्रामीणमध्ये उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुभाष भोईर, मनसेचे राजू पाटील आणि शिंदे शिवसेनेचे राजेश मोरे यांच्यात तिरंगी लढत होईल. यापूर्वीच्या निवडणुकीत डोंबिवलीतील शिवसेनेचे रमेश सुकऱ्या म्हात्रे यांचा कल्याण ग्रामीणमध्ये पराभव झाला होता. त्यामुळे मोरे यांना कल्याण ग्रामीणमध्ये कसा प्रतिसाद मिळतो यावर त्यांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. भोईर, पाटील हे स्थानिक आहेत. शिंदे शिवसेनेचा स्थानिक शिवसैनिक काय भूमिका घेतो यावरही या भागातील राजकीय गणिते अवलंबून आहेत.

शिंदे शिवसेनेची साथ मिळेल या आशेवर असलेल्या मनसेला कल्याण ग्रामीणमध्ये आता प्रचारासाठी जीवतोड मेहनत करावी लागणार आहे. मोरे यांच्यासाठी शिवसेनेकडून किती रसद पुरवली जाते, कार्यकर्त्यांना किती कामाला लावले जाते यावर मोरे यांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. लोकसभेसाठी मदत करूनही विधानसभेसाठी शिवसेनेने उमदेवार दिल्याने मनसेच्या मनात हा सल यापुढे कायम राहणार आहे

Story img Loader