Haryana Rajya Sabha Election 2024 BJP Candidate: महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने हरियाणातील राज्यसभा पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे. येत्या २० डिसेंबर रोजी हरियाणात राज्यसभेच्या एका रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. यासाठी अर्ज ३ डिसेंबरपासून अर्जप्रक्रियेस सुरुवात होणार असून १० डिसेंबर २०२४ रोजी अर्ज करण्याची शेवटची मुदत आहे. या निवडणुकीचे तिकीट मिळवण्यासाठी भाजपा नेत्यांमध्ये चांगलीच चढाओढ सुरू आहे. राज्यसभेवर आपली वर्णी लागावी, यासाठी दिग्गज नेते दिल्लीवारी करीत आहेत. त्यामुळे नेमकं कुणाला तिकीट मिळणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अगदी महिनाभरापूर्वी हरियाणात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने राजकीय विश्लेषकांची भाकीतं खोटी ठरवत विजय मिळवला. नायब सिंह सैनी यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेच्या ९० जागांपैकी तब्बल ४८ जागा जिंकत भाजपाने बहुमताचा आकडा पार केला. दरम्यान, या निवडणुकीचा गुलालाचा रंग फिका होण्याआधीच हरियाणात राज्यसभेच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. ही निवडणूक विधानसभेवर निवडून गेलेले आणि केंद्रात मंत्रीपदी विराजमान झालेले कृष्णलाल पनवार यांच्या राजीनाम्यामुळे होत आहे. राज्यसभेच्या एका तिकिटासाठी भाजपाच्या तब्बल ६ नेत्यांमध्ये चुरस पाहायला मिळते आहे. यामध्ये भिवानी आणि हिसार लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार कुलदीप बिश्नोई, भाजपाचे प्रदेश अध्यक्ष मोहनलाल बडोली, माजी खासदार संजय भाटिया, माजी राज्य कॅबिनेट मंत्री ओम प्रकाश धनखर आणि माजी खासदार सुनीता दुग्गल यांचा समावेश आहे.
तिकीटासाठी भाजप नेत्यांची दिल्लीवारी
दरम्यान, तीनवेळा आमदार आणि दोनदा लोकसभा खासदार राहिलेल्या कुलदीप बिश्नोई यांनी बुधवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. भाजपातील सूत्रांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, बिश्नोई यांना खासदार किरण चौधरी यांच्याप्रमाणेच संसदेच्या सभागृहात जायचे आहे. किरण चौधरी यांनी जूनमध्ये काँग्रेसला रामराम ठोकत भाजपात प्रवेश केला होता. यानंतर ३ महिन्यांनी त्या राज्यसभेवर निवडून गेल्या. काँग्रेसचे दीपेंद्र हुड्डा रोहतकमधून लोकसभेवर निवडून आल्यानंतर राज्यसभेची जागा रिक्त झाली होती. हरियाणात अपुऱ्या संख्याबळामुळे काँग्रेसने या जागेवर उमेदवार दिला नाही. परिणामी भाजपाच्या किरण चौधरी बिनविरोध निवड झाली होती. यावेळीही भाजपाचा उमेदवार राज्यसभेवर बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे.
हरियाणात भाजपाकडे बहुमतासह अपक्षांचा पाठिंबा
हरियाणात भाजपाकडे बहुमत असून त्यांचे ४८ आमदार निवडून आलेले आहेत. याशिवाय भाजपाला ३ अपक्ष आमदारांचा पाठिंबा देखील आहे. दुसरीकडे काँग्रेसकडे ३७ आणि इंडियन नॅशनल लोकदल पक्षाकडे फक्त दोनच आमदार आहेत. भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, “कुलदीप बिश्नोई यांना कुठल्याही परिस्थितीत ही संधी गमावायची नसून यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. परंतु, राज्यसभेवर कोणाची निवड करायची हे पक्षाचे केंद्रीय नेतृत्व ठरवणार आहे. प्रत्येकजण पक्षाच्या कारभारावर खूश असून निर्णयाचे पालन केलं जाईल.”
भाजपाच्या सूत्रांनुसार, कुलदीप बिश्नोई यांना सप्टेंबरमध्ये झालेल्या राज्यसभा पोटनिवडणुकही रस होता. तेव्हा दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांसोबतच अनेकांची भेट घेतली. मात्र, केंद्रीय नेतृत्वाने अखेर किरण चौधरी यांना संसदेत पाठवण्याचा निर्णय घेतला. यावेळीही बिश्नोई यांना राज्यसभेचं तिकीट मिळण्याची कमी शक्यता आहे. कारण, त्यांचे पुत्र आणि माजी आमदार भव्य बिश्नोई यांचा पहिल्यांदाच आदमपूर विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला आहे. या निकालानंतर, बिश्नोई कुटुंबीय भाजपाच्या कार्यक्रमात दिसले नाहीत. २५ नोव्हेंबर रोजी हिसार येथील मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमालाही पिता-पुत्रांनी पाठ फिरवली. भाजप नेत्यांनी सांगितले की, “बिश्नोई यांना राज्य व्यवस्थापन युनिटमध्ये महत्त्व न देण्यात आल्याने ते नाराज होते.”
हेही वाचा : Sharad Pawar: आता निवृत्ती नव्हे, शरद पवार पुन्हा कंबर कसून तयार; कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागणार?
एका तिकीटासाठी भाजपाच्या ६ नेत्यांमध्ये चढाओढ
राज्यसभेसाठी इतर दावेदारांमध्ये भाजपाचे प्रदेश अध्यक्ष मोहनलाल बडोली यांचा देखील समावेश आहे. लोकसभा निवडणुकीत सोनीपत येथून बडोली यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. कर्नाल लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार संजय भाटिया हे देखील राज्यसभेवर जाण्यासाठी आहेत. भाटिया यांनी मनोहर लाल खट्टर यांच्यासाठी लोकसभेची जागा सोडली होती. पक्षासोबत एकनिष्ठ राहून मोठेपणा दाखवल्याने भाटिया यांची नियुक्ती भाजपाच्या निवडणूक व्यवस्थापन समितीवर करण्यात आली. राज्यसभेच्या तिकीटाची आस लावून बसलेले माजी राज्य कॅबिनेट मंत्री ओम प्रकाश धनखर आणि माजी खासदार सुनीता दुग्गल यांचा देखील विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. त्यामुळे दोघांचाही राज्यसभेवर जाणाचा मार्ग तुलनेने इतका सोपा नाही.
भाजपा राज्यसभेचं तिकीट कुणाला देणार?
भाजपाच्या एका नेत्याने सांगितले की, “माजी खासदार संजय भाटिया यांना त्यांच्या कामगिरीबद्दल बक्षीस देऊन राज्यसभेवर नियुक्त केले पाहिजे. त्यांना लोकसभेचाही चांगला अनुभव आहे, पक्षाने भाटिया यांच्या नावाचा राज्यसभेवर विचार केल्यास चांगले होईल. लोकसभा निवडणुकीदरम्यान संजय भाटिया हे पश्चिम उत्तर प्रदेशात भाजपाचे सहप्रभारी होते. ते मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचे निष्ठावंत मानले जातात. २०२० मध्ये कृष्णा पनवार हे राज्यसभेवर निवडून आले होते. लोकसभेत विजय मिळवल्यानंतर त्यांनी ऑक्टोबरमध्ये राजीनामा दिला. आता राज्यसभेवर जे निवडून येतील, त्यांना २ वर्षांचा कालावधी मिळेल”, असंही भाजपाचे नेते म्हणाले.