सौरभ कुलश्रेष्ठ
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे दुसरे आणि महाविकास आघाडीचे चौथे उमेदवार संजय पवार यांना पहिल्या पसंतीची ३३ मते मिळाल्याने महाविकास आघाडीचे संख्याबळ घटल्याचे स्पष्ट झाले आहे. याचा सरकारच्या बहुमतावर परिणाम होणार नसला तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उमेदवार विरोधी पक्षनेते देवेेंद्र फडणवीस यांच्या गनिमी काव्यामुळे चितपट झाल्याचा संदेश गेल्याने सरकारच्या प्रतिमेवर आणि स्थैर्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
विश्वासमत जिंकले तेव्हा महाविकास आघाडीच्या बाजूला १७० आमदार होते. त्यापैकी नवाब मलिक, अनिल देशमुख हे राष्ट्रवादीचे दोन आमदार सध्या तुरुंगात आहेत. तर शिवसेनेचे रमेश लटके यांचे निधन झाले. याशिवाय पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपचा विजय झाला. त्यामुळे २०१९ च्या विश्वासदर्शक ठरावाच्या तुलनेत महाविकास आघाडीकडे १६६ आमदार आहेत असे कागदावरील समीकरण होते. तर २०१९ मध्ये तटस्ठ राहणाऱ्या एमआयएम व माकपने महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे महाविकास आघाडीला पहिल्या पसंतीची १६९ मते मिळायला हवी होती. पण शिवसेनेच्या एका आमदाराचे मत बाद ठरल्याने किमान १६८ मते मिळायला हवी होती. पण प्रत्यक्षात १६१ मते मिळाली आहेत.
२०१९ मधील विश्वासदर्शक ठरावावेळी एमआयएमचे दोन, मनसेचा एक व माकपचा एक असे चार आमदार तटस्थ राहिल्यानंतर २८८ पैकी १७० आमदार महाविकास आघाडी सरकारकडे होते. याचाच अर्थ ११४ सदस्य भाजपच्या बाजूने होते. त्यात भाजपच्या चिन्हावर निवडून आलेले १०५ तर ९ इतर आमदार होते. मधल्या काळात पंढरपूरची पोटनिवडणूक भाजपने जिंकल्याने भाजपचे संख्याबळ १०६ अधिक ९ असे ११५ झाले. तर राज्यसभा निवडणुकीत मनसेच्या एका आमदाराने भाजपला पाठिंबा दिल्याने ते संख्याबळ ११६ झाले. म्हणजेच भाजपच्या तीन उमेदवारांना मिळून पहिल्या पसंतीची ११६ मते मिळायला हवी होती. प्रत्यक्षात अनिल बोंडे व पीयुष गोयल यांना प्रत्येकी ४८ व धनंजय महाडिक यांना २७ अशी १२३ मिळाली. म्हणजेच महाविकास आघाडीकडील ७ मते वजा होऊन ती भाजपच्या उमेदवाराकडे गेली असे आकडेवारीतून स्पष्ट होते.
पक्षाच्या चिन्हावर निवडून येणाऱ्या आमदारांशिवाय छोटे पक्ष व अपक्ष आमदारांना राज्यसभेच्या खुल्या मतदानातही कोणाला मतपत्रिका दाखवण्याची गरज नसते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रक्रियेचा चाणाक्षपणे वापर करत गनिमा काव्याने महाविकास आघाडीकडील छोटे पक्ष व अपक्षांची मते फोडली. आता नेमकी कोणाची मते फुटली याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. त्याचबरोबर आधी महाविकास आघाडीविरोधात नाराजी व्यक्त करणाऱ्या व नंतर मतदान सुरू झाल्यावर महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर करणाऱ्या कोणत्या छोट्या पक्षांनी आपली मते प्रत्यक्षात कोणाच्या पारड्यात टाकली याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.