कर्नाटक निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात धार्मिक ध्रुवीकरणावरच भर दिला जात आहे. राम, हनुमान, टिपू सुलतान, विविध मठ असे मतदारांना भावतील असे मुद्दे प्रचारात मांडले जात आहेत.

कोणतीही निवडणूक धार्मिक मुद्द्यावर तापवायची ही भाजपची गेल्या काही वर्षांतील रणनीती. कर्नाटक धार्मिक आधारावर मतांच्या ध्रुवीकरणातील महत्त्वाचे राज्य मानले जाते. काँग्रेसच्या जाहीरनाम्यामुळे भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मतांच्या ध्रुवीकरणाकरिता आयती संधीच मिळाली आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात धार्मिक उन्माद वाढविणाऱ्या बजरंग दल आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या हिंदू आणि मुस्लीम संघटनांवर बंदी लादण्याचे सुतोवाच करण्यात आले आहे. मंगलुरू, दक्षिण कन्नड आदी किनारपट्टी भागात बजरंग दलाची ताकद आहे. उडपीमधील हिजाबचा वाद पेटविण्यात बजरंग दलाची भूमिकाही महत्त्वाची होती. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या मुस्लीम संघटनेवर केंद्र सरकारने अलीकडेच कारवाई केली होती.

Vishwa Hindu Parishad on temple and mosque row
“…म्हणून मशिदीच्या जागेवरील दावे वाढत आहेत”, विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यानं सांगितलं कारण
IND vs AUS Usman Khawaja Reveals How He Stop Virat Kohli Sam Konstas Fight on Field Melbourne
IND vs AUS: “मी विराटला ओळखतो…,” कॉन्स्टास-कोहलीमध्ये मैदानात…
RSS chief Mohan Bhagwat statement regarding Ram temple
‘राम मंदिर निर्मिती झाली, म्हणून कोणी हिंदूंचा नेता होत नाही’; सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन
Kangana Ranaut rahul gandhi
Kangana Ranaut : “संसदेत जिम ट्रेनरप्रमाणे बायसेप्स दाखवत…”, कंगना रणौत यांचे राहुल गांधींवर गंभीर आरोप
Mohan Bhagwat inaugurated 463rd Sanjeevan Samadhi ceremony of Shri Morya Gosavi Maharaj
संघर्ष हा धर्म आहे, प्रत्येकाने धर्मासाठी योगदान दिले पाहिजे – सरसंघचालक मोहन भागवत
Sanjay Raut on Chhagan Bhujbal
“भुजबळांचा वापर करणाऱ्यांनीच आज त्यांना…”, मराठा आरक्षण विरोधी आंदोलनावरून संजय राऊत यांची खोचक टीका
devendra fadnavis on hanuman mandir dadar issue
Devendra Fadnavis: दादरमधील हनुमान मंदिराबाबत राज्य सरकारची नेमकी भूमिका काय? देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट!
dadar hanuman mandir
Dadar Hanuman Temple : दादरमधील हनुमान मंदिर हटवण्याच्या निर्णयाबाबत मोठी माहिती, मंगलप्रभात लोढा म्हणाले…

हेही वाचा – वर्धा : वाळू तस्करीला आळा बसणार! शासनमान्य ‘स्वस्त वाळूचे दुकान’ उघडणार, निविदांवर सर्वांचे लक्ष

बजरंग दलाच्या विरोधात कारवाईचे आश्वासन काँग्रेसच्या जाहीरनाम्यात देण्यात आल्याने भाजपने लगेचच तो मुद्दा तापविला. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी कर्नाटकात प्रचार दौऱ्यावर होते. त्यांनी तात्काळ या मुद्द्यावर भर दिला. राम मंदिरापाठोपाठ बजरंग बली म्हणजेच हनुमानाला बंद करण्याची भाषा काँग्रेस करीत असल्याचा मुद्दा मोदी यांनी मांडला. राम, हनुमान हे हिंदूच्या भावनेशी निगडीत असतात. वास्तविक बजरंग दलावर कारवाईचे काँग्रेसने आश्वासन दिले असले तरी बजरंग नाव असल्याने हनुमानाच्या विरोधात काँग्रेस असल्याचा प्रचारात मुद्दा मोदी यांनी तापविला. मतांच्या ध्रुवीकरणाकरिता भाजपला असे मुद्दे पुरेसे असतात.

सत्तेत येताच मुस्लिमांसाठी रद्द केलेले आरक्षण पुन्हा लागू करण्याचे आश्वासन काँग्रेस नेत्यांकडून देण्यात येत आहे. यावरूनही भाजपने काँग्रेसची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेस पक्ष मुस्लिमांचे लांगूनचालन करीत असल्याचा आरोप भाजपने सुरू केला आहे. मुस्लीम मतेही काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलात विभागली जातात. यातूनच मुस्लीम आरक्षणाचा मुद्दा अधिक तापावा, असा भाजपचा प्रयत्न आहे. यातून हिंदू मतांचे ध्रुवीकरण करणे सोपे जाते.

हेही वाचा – उन्हाळ्यात कोरडी राहणारी पूर्णा नदी मुसळधारेमुळे तुडुंब! ग्रामस्थ सुखावले

टिपू सुलतानला मारण्यात वोक्कलिंग समाजाच्या दोन शुरांचा समावेश होता असा प्रचार सुरू करून भाजपने वोक्कलिंग समाजाला जवळ करण्याचा प्रयत्न केला आहे. एकूणच भाजप किंवा काँग्रेसकडून धार्मिक आधारावर मतांचे ध्रुवीकरण कसे होईल यावर भर देण्यात येत आहे.

Story img Loader