आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. ही बाब लक्षात घेता सर्वच पक्षांकडून तयारी केली जात आहे. जास्तीत जास्त लोकांशी संपर्क साधण्यासाठी वेगवेगळे पक्ष हरतऱ्हेने प्रयत्न करत आहेत. येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. हे औचित्य साधून भाजापाकडून हिंदू मतांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. २२ जानेवारीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा एखाद्या सणाप्रमाणे साजरा करा, असे आवाहन भाजपाकडून केले जात आहे. याच मोहिमेचा एक भाग म्हणून गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात वेगवेगळ्या ठिकाणी दौऱ्यावर जाताना तेथिल स्थानिक मंदिरांना भेट देत आहेत.

नरेंद्र मोदींकडून हिंदू मंदिरांना भेट

हिंदुत्त्वाचा पुरस्कार करणारा पक्ष अशी भाजपाची ओळख आहे. त्यामुळे हिंदू मतांसाठी प्रभू रामाच्या मंदिर उभारणीत आमचाच मोठा वाटा आहे, असे सांगण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जातोय. याच रणनीतीचा एक भाग म्हणून गेल्या काही दिवसांपासून नरेंद्र मोदी वेगवेगळ्या हिंदू मंदिरांना भेट देत आहेत. गेल्या आठवडाभरात मोदी देशातील वेगवेगळ्या राज्यांत गेले. आपल्या या दौऱ्यांदरम्यान त्यांनी अनेक विकासकामांचे उद्घाटन केले. तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले.

shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
What Nitesh Rane Said?
Ladki Bahin Yojana : “दोनपेक्षा जास्त मुलं असणाऱ्या मुस्लिम कुटुंबांना लाडकी बहीण योजनेतून वगळा”, आमदार नितेश राणेंची मागणी
sambhal and jaunpur mosque row
Mosque Row in UP: मशिदीच्या जागेवर हिंदूंचे दावे; २०२७ त्या उत्तर प्रदेश विधासनभा निवडणुकांची तयारी?
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Sanjay Raut
“…तर मोदींनी बांगलादेशमधील हिंदूंसाठी काहीतरी केलं असतं”, ठाकरेंच्या शिवसेनेची टीका
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!

कृष्ण मंदिरात जाऊन देवाचे दर्शन

मोदी काही दिवसांपूर्वी केरळमध्ये अभिनेता-राजकारणी सुरेश गोपी यांच्या मुलीच्या लग्नसमारंभासाठी गेले होते. याववेळी त्यांनी त्रिशूर जिल्ह्याच्या गुरुवायूर शहरातील भगवान कृष्ण मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतले.

त्रिप्रयार श्री रामास्वामी मंदिराची भेट

त्यानंतर ते त्रिशूर येथील करुवन्नूर नदीच्या काठावर असलेल्या त्रिप्रयार श्री रामास्वामी मंदिरात गेले. यावेळी त्यांनी नदीकिनारी मीन ओट्टू (माशांना खायला अन्न देणे) नावाचा विधी पार पाडला.

केरळमध्ये नलंबलम यात्रेवर भाष्य

मोदींची दोन आठवड्यांत केरळला दिलेली ती दुसरी भेट होती. आपल्या पहिल्या भेटीत मोदी यांनी केरळमधील नलंबलम यात्रेवर भाष्य केले होते. ही यात्रा प्रभू राम आणि त्यांचे भाऊ भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांची आठवण म्हणून त्रिप्रयार येथे आयोजित केली जाते.

लेपाक्षी शहरातील वीरभद्र मंदिराला भेट

नरेंद्र मोदी १६ जानेवारी रोजी आंध्र प्रदेशच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी श्री सत्यसाई जिल्ह्यातील लेपाक्षी शहरातील वीरभद्र मंदिराला भेट दिली. रावणाने जटायूवर याच लेपाक्षी येथे हल्ला केला होता, असे म्हटले जाते. श्री सत्यसाई जिल्ह्यात मोदी यांनी नॅशनल अॅकॅडमी ऑफ कस्टम्स, इनडायरेक्ट टॅक्सेस अँड नार्कोटिक्सच्या नवीन इमारतींचे उद्घाटन केले होते. यावेळीदेखील मोदींनी पुन्हा राम मंदिरावर भाष्य केले होते.

नाशिकच्या काळाराम मंदिराला भेट

मोदींनी १२ जानेवारी रोजी नाशिकच्या काळाराम मंदिराला भेट दिली होती. हे मंदिर नाशिकच्या पंचवटी परिसरात आहे. रामायणात या मंदिर परिसराला खूप महत्त्व आहे.

पंतप्रधान निवासस्थानी गाईंना दिला चारा

दरम्यान, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी ११ दिवस उपवास करणार आहेत. तसेत त्यांनी मकर संक्रांतीच्या दिवशी पंतप्रधान निवासस्थानी गाईंना चारा दिला होता. त्याचे फोटो समाजमाध्यमावर चांगलेच व्हायरल झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार आगामी काळात नरेंद्र मोदींच्या हिंदू धर्माशी निगडित ठिकाणांना भेटींमध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे आगामी काळात या रणनीतीचा भाजपाला फायदा होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader