यवतमाळ: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपाइंचे नेते तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यात नवा ‘फॉर्म्युला’ तयार करण्याचा प्रयत्न चालवला आहे. आठवले यांनी पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांना सोबत येण्याचे आवाहन केले आहे. आंबेडकर आपल्यासोबत आल्यास देशाच्या राजकारणात दोघांची एकत्रित ताकद निर्माण होईल, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला आहे. मात्र, ही आठवलेंचीच भूमिका आहे की यामागे आणखी कोणाचा (भाजप) हात आहे, याबाबत राजकीय वर्तुळात विविध तर्क लावले जात आहे.

समता परिषदेनिमित्त आठवले नुकतेच यवतमाळ येथे आले होते. यावेळी त्यांनी आंबेडकर यांनी आपल्यासोबत यावे, या आपल्या आवाहनाचा पुनरुच्चार केला. यापूर्वीही आठवले यांनी असे आवाहन केले आहे. रिपाइं आणि वंचित बहुजन आघाडी या दोन्ही पक्षांची ताकद सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनाही माहिती असल्याने हे दोन्ही नेते नेहमीच चर्चेत असतात. आठवले हे कायम सत्तेच्या बाजूने उभे असतात. त्याचा लाभही त्यांना वेळोवेळी मिळतो. तर, वंचितचे नेते आंबेडकर हे तळ्यात-मळ्यात, अशा अवस्थेत राहत असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आठवले यांच्या भूमिकेबाबत राजकीय पटलावर विविध चर्चेला पेव फुटले आहे. आंबेडकर यांनी सोबत यावे, अशी आठवले यांचीच भूमिका आहे की, या भूमिकेमागे भाजपच्या नेत्यांची व्यूहरचना आहे, याबाबत वंचित आणि रिपाइं या दोन्ही गटांत मंथन सुरू झाले आहे.

rohit pawar on ajit pawar confession
Rohit Pawar : “ज्या पक्षाने कुटुंब फोडलं, त्यांना…”; अजित पवारांच्या ‘त्या’ कबुलीनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया!
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Ajit pawar and jitendra awhad
Jitendra Awhad : “एवढाच पश्चाताप होतोय तर…”, अजित पवारांच्या त्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांचं आव्हान, म्हणाले…
Where are the modern Indian political thinkers says Yogendra Yadav
आधुनिक भारतीय राजकीय विचारवंत आहेत कुठे?
pm narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली जाहीर माफी, शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी खेद व्यक्त करताना म्हणाले…
kangana Ranaut and simranjit singh mann
Kangana Ranaut : “कंगना रणौत यांना बलात्काराचा खूप अनुभव”, माजी खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य
Congress is involve in dispute between two factions of BJP Nagpur news
भाजपच्या दोन गटातील वादात काँग्रेसची उडी, काय आहे प्रकार
jitendra awhad replied to raj thackeray
Jitendra Awhad : “राज ठाकरे फक्त बडबड करतात, त्यांना…”; शरद पवारांवरील ‘त्या’ टीकेला जितेंद्र आव्हाडांचे प्रत्युत्तर

हेही वाचा… पालघर शहरातील ठाकरे गटाची पकड झाली सैल

दुसरीकडे, केंद्रात व राज्यात भाजपच्या जागा वाढण्यात रिपाइंचा मोठा वाटा असला तरी महायुती सरकारमध्ये या पक्षाचे नाव घेतले जात नाही. राज्य मंत्रिमंडळ विस्तारात रिपाइंला मंत्रिपदाचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु, मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार गटालाच प्राधान्य देण्यात आले, अशी खंत आठवले यांची आहे. देशाचे संविधान बदलण्याचा प्रयत्न झाल्यास केंद्र सरकारला आपला पाठिंबा राहणार नाही. सरकारमधून आपण बाहेर पडू, असा इशाराही आठवले यांनी दिला आहे. आठवले यांची ही सर्व वक्तव्ये आणि प्रकाश आंबेडकर यांना सोबत येण्याचा आग्रह, या भूमिकेमागे नवीन राजकीय पर्याय निर्माण करण्याची आठवले यांची खेळी तर नाही ना, याबाबतही तर्क लावले जात आहे.

आठवले प्रकाश आंबेडकर यांना सोबत येण्याबाबत वारंवार आवाहन करत असले तरी याबाबत आंबेडकर यांनी अद्याप आपले पत्ते खुले केलेले नाहीत. ‘इंडिया’ आघाडीचा जागा वाटपाचा ‘फॉर्म्युला’ ठरल्यानंतर कदाचित याबाबत आंबेडकर आपली भूमिका स्पष्ट करतील, अशी चर्चा आहे.