बाळासाहेब जवळकर

पिंपरी : रिपब्लिकन पक्षाने पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी (राखीव) विधानसभा मतदारसंघावर पूर्णपणे लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे पिंपरीतील दौरे वाढले आहेत. संघटनात्मक कार्यक्रमासाठी गेल्याच आठवड्यात ते शहरात येऊन गेले आणि पुन्हा एकदा पिंपरी विधानसभेच्या दावेदारीवरून चर्चा सुरू झाली आहे.

Nuclear power plants offsite emergency drill creates fear among citizens
अणुऊर्जा केंद्राच्या ऑफसाइट आपत्कालीन कवायत अभ्यासामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
When and where will flood-affected Ektanagari residents be relocated
पूरग्रस्त एकतानगरीचे होणार स्थलांतर नक्की कधी आणि कुठे?
nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
Panvel Municipal Commissioner decision to build infectious disease hospital in Kalamboli
कळंबोलीत साथरोग रुग्णालय; पनवेल महापालिका आयुक्तांचा निर्णय, २७ कोटींचा खर्च अपेक्षित
Bhajepar gram panchayat won over 1 crore in prizes under various government schemes
गावकऱ्यांच्या परिश्रमाने ग्रामपंचायत झाली कोट्यधीश…
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?

हेही वाचा… Maharashtra News Live : ‘भारत जोडो’ यात्रा आज राज्यात; महाराष्ट्राशी संबंधित विविध घडामोडींची माहिती एका क्लिकवर…

मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर शहरात पिंपरी, चिंचवड व भोसरी असे तीन विधानसभा मतदारसंघ तयार झाले. त्यातील पिंपरी हा मतदारसंघ मागासवर्गीयांसाठी राखीव आहे. २००९ मध्ये नव्या रचनेनुसार झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे निवडून आले. त्यांनी भाजपचे उमेदवार अमर साबळे यांचा पराभव केला होता. या कालावधीत रिपब्लिकन पक्षाचा पिंपरीविषयी फारसा काही आग्रह असण्याचे कारण नव्हते.

हेही वाचा… लातूरमधील भाजप नेत्यांना पालकमंत्री गिरीश महाजन यांचे एकीच्या बळाचे धडे

भाजपने २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ रिपब्लिकन पक्षासाठी सोडला. तेव्हा झालेल्या लढतीत शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार ५१ हजार ९६ मते मिळवून विजयी ठरले. राष्ट्रवादीचे बनसोडे ४८ हजार ७६१ मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर राहिले. तर, तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या चंद्रकांता सोनकांबळे यांना आश्चर्यकारकरित्या ४७ हजार २८८ मते मिळाली. इतक्या मोठ्या प्रमाणात पक्षाला मतदान झाले, तेव्हापासून रिपब्लिकन पक्षाच्या पिंपरीत आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, रिपब्लिकन पक्षाला पुन्हा संधी मिळू शकली नाही.

हेही वाचा… ‘भारत जोडो’ स्वागतासाठी ८० किलोमीटरचा परिसर सजला; तिरंगा, राहुल गांधींची हसरी प्रतिमा आणि अशोकराव चव्हाण यांच्या मुलीचेही फलक

२०१९ मध्ये भाजप-शिवसेनेची युती होती. रामदास आठवले यांनी पिंपरी मतदारसंघ मिळावा, यासाठी बरेच प्रयत्न केले. मात्र, जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाटणीला गेला. त्यामुळे सेनेचे चाबुकस्वार आणि राष्ट्रवादीचे बनसोडे यांच्यात पुन्हा लढत झाली. बनसोडे यांनी जवळपास २० हजार मतांनी चाबुकस्वारांचा पराभव केला. आता भाजप-शिवसेनेचा काडीमोड झाला आहे. आता कोणत्याही परिस्थितीत पिंपरी मतदारसंघ रिपब्लिकन पक्षाला हवा आहे. स्थानिक नेत्यांनी त्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. आठवले यांचीही आतापासूनच व्यूहरचना सुरू आहे. मात्र, भाजपकडून विधानसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांची पिंपरीसाठी पक्षाकडेच मोर्चेबांधणी सुरू आहे. रिपब्लिकन पक्षापेक्षा भाजपला विजयाची संधी जास्त आहे, असे गणित मांडले जात आहे. एकेका आमदाराचे महत्त्व किती आहे, हे सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून लक्षात येते. त्यामुळे पिंपरी विधानसभेच्या जागेवरून भाजप-रिपब्लिकन पक्षातील संघर्ष अटळ आहे, हेच सध्याच्या घडामोडींवरून दिसून येते.

Story img Loader