महेश सरलष्कर, टोंक (राजस्थान)

दिल्लीतील भाजपचे खासदार रमेश बिधुरी यांनी टोंकमध्ये लाहोर-कराची, पाकिस्तानचा उल्लेख करून काँग्रेसचे उमेदवार सचिन पायलट यांच्याविरोधात मतांच्या ध्रुवीकरणाचा प्रयत्न केला आहे. बिधुरींच्या वाचाळपणामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्येही मतभेद निर्माण झाले असून काहींनी बिधुरींवर नाराजी व्यक्त केली.

Udayanraje Bhosale criticism of Sharad Pawar candidate
पाडा पाडा म्हणणाऱ्या पवारांचे उमेदवारच लोक पाडतील; उदयनराजे यांचे टीकास्त्र
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Kangana Ranaut criticism that Priyanka Gandhi has no respect for democracy
प्रियंका गांधीना लोकशाहीचा आदर नाही,कंगना रानौतची टीका..
Rajnath Singh, Shivajinagar candidate Siddharth Shirole,
महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षांना घेऊन काँग्रेस बुडणार, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची टीका
maharashtra assembly polls 2024 state economy in decline during bjp rule says chidambaram
भाजपच्या सत्ताकाळात महाराष्ट्राची पीछेहाट; माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची टीका
BJP leader Navneet Rana launched open campaign against mahayuti in Daryapur heating up atmosphere
कमळ म्हणजेच पाना…नवनीत राणाच्या नवीन डावाने महायुतीत ठिणगी…,
jharkhand assembly election 2024 amit shah attack at rahul gandhi
झारखंडमध्ये ‘राहुल विमान’ कोसळणार! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका
Nitin Gadkari Umarkhed, Nitin Gadkari Kisan Wankhade,
“काँग्रेसने जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच विष कालवले,” नितीन गडकरी यांची यवतमाळात टीका

टोंक जिल्ह्यामध्ये गुर्जरांची आणि मुस्लिम मतदारांची संख्या तुलनेत जास्त आहे. रमेश बिधुरी हे गुर्जर असल्यामुळे भाजपने त्यांना टोंक जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी केले. बिधुरी यांनी टोंकमधील काँग्रेसचे उमेदवार सचिन पायलट यांच्याविरोधातील लढाईला हिंदू-मुस्लिम रंग दिला आहे. इथे भाजपचे उमेदवार अजितसिंह मेहता यांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये बिधुरी यांनी, राजस्थानच्या निवडणुकीवर लाहोरची नजर असल्याचे विधान केले. उदयपूरमध्ये कन्हय्यालालची हत्या, जयपूरमध्ये अपघातात मुस्लिम तरुणाच्या मृत्यूनंतर गेहलोत सरकारने मृत तरुणाच्या कुटुंबियांना केलेली आर्थिक मदत अशा मुद्द्यांचा उल्लेख करत मुस्लिमविरोधी आक्रमक भाषण केले. या भाषणाची चित्रफीत व्हायरल झाल्यामुळे बिधुरी पुन्हा वादग्रस्त ठरले आहेत.

आणखी वाचा-‘मांझी यांना मुख्यमंत्री करणे माझा मूर्खपणा’, नितीश कुमार यांच्या वक्तव्यानंतर महादलित मतपेटी हिसकावण्याचा मांझींचा प्रयत्न

पण, भाजपचे उमेदवार अजितसिंह मेहता यांच्या निवडणूक कार्यालयातील काही कार्यकर्त्यांनी बिधुरींच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. ‘बिधुरींच्या या भूमिकेमुळे मेहतांचे नुकसान होऊ शकते. मेहता स्थानिक उमेदवार असून २०१३मध्ये ते विजयी झाले होते. त्यामुळे आम्हाला विचारून बिधुरींनी बोलायला हवे होते’, असे कार्यकर्त्याचे म्हणणे होते. ‘बिधुरींना इथे पाठवू नका, त्यांनी जयपूरमध्ये राहावे, असे आम्ही कळवले आहे’, असा दावा अन्य एका कार्यकर्त्याने केला. काही कार्यकर्त्यांनी मात्र बिधुरींचे समर्थन केले. ‘टोंकमध्ये भाजपची लढाई ६० हजारांपासून होते. त्यामुळे इथे हिंदू-मुस्लिम अशीच लढाई होणार!’, असे अन्य कार्यकर्त्याचे म्हणणे होते. ‘टोंक विधानसभा मतदारसंघामध्ये ६० हजारांहून अधिक मुस्लिम मतदार असून ते सचिन पायलट यांना एकगठ्ठा मतदान करतील. त्यामुळे भाजपच्या उमेदवाराला जिंकण्यासाठी हिंदू ध्रुव्वीकरणाशिवाय पर्याय नाही’, असे मत भाजपच्या कार्यकर्त्याने मांडले.

२०१३ मध्ये संघ प्रचारक व भाजपचे उमेदवार अजित सिंह मेहता ६६ हजार ८४५ मते मिळवून विजयी झाले होते. अपक्ष सऊद सईदी यांना ३६ हजार ५०२ तर, काँग्रेसच्या झाकिया यांना २१ हजार ६४५ मते मिळाली होती. २०१८ मध्ये मेहता यांना भाजपने डावलून युनुस खान यांना सचिन पायलट यांच्याविरोधात उमेदवारी दिली होती. पायलट यांना मुस्लिम, गुर्जर, माळी, दलितांची मत मिळाल्यामुळे खान यांचा पराभव झाला. २०१८ मध्ये सचिन पायलट यांना १ लाख ९ हजार ४० तर भाजपचे युनूस खान यांना ५४ हजार ८६१ मते मिळाली होती.

आणखी वाचा-विदर्भातील नेते प्रचारात; शेतकरी संकटात, व्यापाऱ्यांकडून लूट

टोंकमध्ये सर्वाधिक मुस्लिम मतदार असून ३५ हजार गुर्जर, दलित ४५ हजार, माळी १६ हजार, ब्राह्मण १५ हजार, जाट १२ हजार, राजपूत ५ हजार असे सुमारे २.४५ लाख मतदार आहेत. रमेश बिधुरी आणि सचिन पायलट हे गुर्जर आहेत. इथे बिधुरी गुर्जर आणि मुस्लिम मतांचे विभाजन करण्याचा प्रयत्न करत आहेत. टोंक जिल्ह्यांतील टोंक, निवई, देवळी-उनियारा या तीनही मतदारसंघांमध्ये मुस्लिम मतदार निर्णायक आहेत. मुस्लिमविरोधी आक्रमक भूमिका घेतल्यास हिंदू मतांचा भाजपला लाभ मिळेल असे गणित बिधुरी यांनी मांडलेले आहे.

सचिन पायलट यांची टोंकमधील गैरहजेरी हा भाजपचा प्रचाराचा प्रमुख मुद्दा केला आहे. मेहता स्थानिक असून तेच इथल्या रहिवाशांच्या मदतीला धावतात. पायलट पाच वर्षांमध्ये इथे फिरकलेले नाहीत. गेल्यावेळी ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते. त्यामुळे सर्व समाजातील मते त्यांना मिळाली, असा दावा भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला. मात्र, ‘बसप’चे उमेदवार अशोक बैरवा यांनी सचिन पायलट यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे मुस्लिम, गुर्जर यांच्यासह दलितांचीही मते पायलट यांना मिळू शकतील.

आणखी वाचा-Chhattisgarh : ४० हजार कोटींची कर्जमाफी, मोफत वीज, शिक्षण व आरोग्य सुविधा; राजकीय आश्वासनांचा तिजोरीवर भार

भाजपचे खासदार रमेश बिधुरी यांनी संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये ‘बसप’चे खासदार दानिश अली यांच्यावर जातीवाचक आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. अली यांनी लोकसभाध्यक्षांकडे तक्रार केली असली तरी बिधुरी यांच्याविरोधात कारवाई झालेली नाही. या वादग्रस्त प्रकरणानंतर भाजपने बिधुरी यांच्याकडे टोंक जिल्ह्याची जबाबदारी दिली होती. टोंकसह राजस्थानमध्ये ९ टक्के मुस्लिम असून ३० हून अधिक मतदारसंघांमध्ये मुस्लिम मतदार निर्णायक ठरतात.

अमित शहांचा काढता पाय

टोंक जिल्ह्यातील देवळी-उनियारा मतदारसंघामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची गुरुवारी प्रचारसभा आयोजित केली होती. पण, गर्दी नसल्याने शहांनी काढता पाय घेतला. शहांनी सभेला उपस्थित न राहता केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांना पाठवले होते. जयपूरमधील भाजप नेत्यांची मोठी सभाही रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.