Ramtek Vidhan Sabha Election 2024 : महाविकास आघाडीत रामटेकची जागा शिवसेनेला (ठाकरे) सुटल्यावर बुधवारी शिवसेनेने अधिकृतपणे रामटेकच्या उमेदवाराची घोषणा केली. मात्र अजूनही काँग्रेसने या जागेवरील हक्क सोडला नाही. यादीत शेवटच्या क्षणी बदल होऊ शकतो का याबाबत काँग्रस नेते गुरुवारी उद्धव ठाकरे यांना भेटले व त्यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे.

महाविकास आघाडीत नागपूरच्या दोन जागांमुळे वाद निर्माण झाला होता. त्यात एक रामटेकची होती. दोन्ही पक्षाच्या बैठकीनंतर रामटेकची जागा शिवसेनेला देण्याचा निर्णय झाला आणि त्यांनी विशाल बरबटे यांच्या उमेदवारीची घोषणा केली. त्यावर एक दिवस उलटत नाही तोच काँग्रेस नेत्यांनी पुन्हा रामटेकच्या जागेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. रामटेक लोकसभा जिंकल्यावर काँग्रेसमध्ये उत्साह आहे. या मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आघाडीवर आहे. त्याचबरोबर रामटेकमध्ये काँग्रेस नेते राजेंद्र मुळक मागील चार वर्षांपासून निवडणुकीची तयारी करीत आहे. ही जागा काँग्रेसलाच मिळणार हा विश्वास काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीसुद्धा मुळक यांना दिला होता. त्यामुळेच काँग्रेस रामटेकवरचा हक्क सोडायला तयार नव्हती. पण शिवसेनाही माघार घेत नव्हती. अखेरच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हस्तक्षेप करून सेनेला रामटेक, काँग्रेसला दक्षिण नागपूर हा पर्याय सुचवला व तो मान्य करण्यात आला. पत्रकार परिषदेत तशी घोषणाही करण्यात आली. मात्र काँग्रेसला हा निर्णय पचनी पडण्याचे दिसून येत नाही. रामटेकसाठी आमचे प्रयत्न सुरूच आहे, असे या पक्षातील ज्येष्ठ नेत्याने सांगितले.

BJP has announced the candidature of Umred in West Nagpur and Rural
भाजपचे अखेर ठरले, पश्चिम- सुधाकर कोहळे, उमरेडमधून सुधीर पारवे लढणार
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Ramtek Assembly Constituency Assembly Election 2024 District President of Congress and former Minister of State for Finance Rajendra Mulak rebelled
रामटेकात आक्रीतच घडलं; जागा शिवसेनेची, बंडखोर काँग्रेसचा अन् सोबतीला विद्यमान खासदार व माजी मंत्री
Congress Candidates List Nana Patole
Maharashtra Assembly Election 2024 : काँग्रेसची पाचवी यादी जाहीर, कोल्हापूरचा उमेदवार बदलला! आतापर्यंत ‘इतके’ शिलेदार निवडणुकीच्या रिंगणात
Congress Leaders Demands in Nagpur Vidhan Sabha Constituency
Nagpur Assembly Constituency : नागपूर, रामटेकवरील दावा कायम; काँग्रेस नेत्यांची पुन्हा दिल्लीकडे धाव
Congress Candidate 2nd List
Congress Candidate 2nd List: मोठी बातमी! काँग्रेसची २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; कोणाला मिळाली संधी?
vidarbh election
विदर्भात लोकसभा निकालाची पुनरावृत्ती की महायुतीला कौल? 
Anees Ahmed Congress, Anees Ahmed, Congress,
काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा बंडाचा झेंडा? पक्षाच्या जातीय गणितावर थेट टीका, म्हणाले…

हेही वाचा – Congress NCP Nomination Applications : यादी जाहीर होण्याआधीच काँग्रेस, राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज

हेही वाचा – Badnera Vidhan Sabha Constituency : बडनेरा मतदारसंघात उमेदवारी नाकारल्‍याने प्रीती बंड यांचे समर्थक आक्रमक

दरम्यान गुरुवारी काँग्रेस नेते सुनील केदार यांच्यासह इतर काही नेत्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. रामटेकच्या जागेचा मुद्या यावेळी चर्चेत होता असे समजते. काँग्रेसने अद्याप यादी जाहीर केली नाही. मात्र काही मतदारसंघात पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. पक्षाची अधिकृत यादी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख यांना दाखवून ती पक्षश्रेष्ठींकडे पाठवली जाईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. असे असले तरी काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची घेतलेल्या भेटीमुळे रामटेकचा मुद्या गुरुवारी पुन्हा चर्चेत आला. दरम्यान शिवसेनेने हट्ट सोडला नाही तर काँग्रेस या मतदारसंघात वेगळी भूमिका घेण्याची शक्यता गुरुवारी दिवसभर घडलेल्या घडामोडींमधून मिळाली. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांनी ठाकरेंची घेतलेली भेट महत्वपूर्ण ठरते.

Story img Loader