अकोला : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केलेल्या पहिल्याच यादीत आमदार रणधीर सावरकर यांना मानाचे स्थान देऊन अकोला पूर्वमधून सलग तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली. अकोला पश्चिम, अकोट, मूर्तिजापूरमध्ये भाजप उमेदवाराची प्रतीक्षा कायम आहे. महायुतीमध्ये बाळापूर भाजप लढणार की मित्रपक्षांना सोडणार हे देखील अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

हेही वाचा >>> वाशीम जिल्ह्याला भाजपच्या पहिल्या यादीत स्थानच नाही; इच्छुकांसह विद्यमान आमदारांची धाकधुक वाढली

Caste politics Akola East, Akola East, BJP Akola East,
‘अकोला पूर्व’मध्ये जातीय राजकारण निर्णायक, भाजपपुढे शिवसेना ठाकरे गट व वंचितचे आव्हान; तिरंगी लढत कुणाच्या पथ्यावर?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Congress Candidates List Nana Patole
Maharashtra Assembly Election 2024 : काँग्रेसची पाचवी यादी जाहीर, कोल्हापूरचा उमेदवार बदलला! आतापर्यंत ‘इतके’ शिलेदार निवडणुकीच्या रिंगणात
congress candidate sajid khan in akola west constituency for Assembly Election 2024
अकोला : काँग्रेसने साजिद खान यांच्यावरच दाखवला विश्वास, नाराज नेत्याने धरली ‘वंचित’ची वाट
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Congress, Vanchit, Muslims, Akola,
अकोल्यात मुस्लिमांच्या मतांवर काँग्रेस व वंचितचा डोळा
maharashtra assembly election 2024 bjp strategy for deoli assembly constituency
Deoli Assembly Constituency : देवळीच्या जागेबाबत भाजप अधिक दक्ष
maharashtra vidhan sabha election 2024 tought contest in five assembly constituencies in akola district
अकोला जिल्ह्यात तुल्यबळ लढतींची रंगत; जातीय राजकारण व मतविभाजन निर्णायक ठरणार

भाजपने ९९ उमेदवारांची पहिली यादी रविवारी दुपारी जाहीर केली. या यादीमध्ये अकोला पूर्व मतदारसंघातून भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा विद्यमान आमदार रणधीर सावरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अकोला पूर्व मतदारसंघ पूर्वी युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला होता. २०१४ मध्ये युती तुटल्यानंतर भाजपने प्रथमच लढत रणधीर सावरकर यांना उमेदवारी दिली होती. ऐनवेळी उमेदवारी मिळाल्यानंतरही रणधीर सावरकर यांनी तिरंगी लढतीत विजय मिळवला. त्यानंतर २०१९ मध्ये देखील २४ हजार ७५२ मतांनी रणधीर सावरकर यांनी बाजी मारली. अकोला पूर्व मतदारसंघात गेल्या १० वर्षांपासून प्रतिनिधित्व करतांना त्यांनी कोट्यवधींचा निधी आणून विकासात्मक कार्य प्राधान्याने पूर्ण केली. प्रकृती अस्वस्थामुळे माजी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे सक्रिय राजकारणापासून दूर झाल्यानंतर आमदार रणधीर सावरकर यांनी जिल्ह्यात एकहाती किल्ला लढवत पक्षाचे नेतृत्व केले. संघटनात्मक वाढ करून जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व कायम ठेवले. जिल्ह्यात पक्षांतर्गत त्यांचा शब्द अंतिम मानला जातो. भाजपने नेते देवेंद्र फडणवीस यांचे ते निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. वरिष्ठ नेतृत्वाने पहिल्याच यादीत रधणीर सावरकर यांना स्थान देऊन त्यांच्यावर मोठा विश्वास दाखवला आहे.

हेही वाचा >>> मराठवाड्यातील सर्व विद्यमान आमदारांना भाजपची उमेदवारी; श्रीजया अशोक चव्हाण, अनुराधा चव्हाण नवे चेहरे

भाजपने अकोला पूर्व वगळता जिल्ह्यातील अकोला पश्चिम, अकोट, मूर्तिजापूर व बाळापूर मतदारसंघात उमेदवार जाहीर केलेला नाही. भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकोला पश्चिमची जागा दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनामुळे रिक्त आहे. सलग २९ वर्ष त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. आता या मतदारसंघातून लढण्यासाठी भाजपमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी आहे. अकोटमध्ये प्रकाश भारसाकळे व मूर्तिजापूरमध्ये हरीश पिंपळे भाजपचे विद्यमान आमदार असतांनाही त्यांना उमेदवारांच्या पहिल्या यादीत स्थान देण्यात आलेले नाही. या दोन्ही मतदारसंघात उमेदवार बदलण्याची मागणी होत असून अनेकांनी भाजपकडून लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. बाळापूरवर शिवसेना शिंदे गटाने दावा केला. मात्र, महायुतीमध्ये बाळापुरातून कुठला पक्ष लढणार, हे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे येथेही उमेदवार देण्याचे भाजपने टाळले आहे.

गेल्या १० वर्षांत अकोला पूर्व मतदारसंघात कोट्यवधींचे विकास कामे केली आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न, समस्या सोडविण्याचे पूर्ण प्रयत्न केले असून त्याच बळावर आगामी निवडणूक लढणार आहे. – आमदार रणधीर सावरकर, सरचिटणीस, भाजप.

Story img Loader