नागपूर : भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी आणि राज्याच्या मुख्यमंत्रीपदी संघाचे स्वयंसेवक असलेले देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आल्याचे जाहीर होताच अनेक संघ स्वयंसेवकानी आनंद व्यक्त केला. भाजप आणि महायुतीला राज्यात प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड व्हावी अशी केवळ भाजप कार्यकर्त्याची नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही त्याच भूमिकेत होते..देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय नफ्या तोट्यासाठी कधीही स्वतः संघाचा स्वयसेवक असल्याचे लपविले नाही. आमदार ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या त्यांच्या राजकीय प्रवासात ते संघाच्या अनेक कार्यक्रमात झाले आहे. विशेष म्हणजे विजयादशमी उत्सवात ते गणवेशात सहभागी होतात. संघाच्या सर्वच पातळ्यांवर त्यांचा संघाच्या पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद नेहमीच राहिला आहे. २०१९ मध्ये युतीची सत्ता आल्यानंतर भाजपला बहुमत मिळाले मात्र त्यांची मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली नसल्यामुळे संघ स्वयंसेवकामध्ये त्यावेळी नाराजी होती. नुकत्याच लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या जोरदार झटक्यानंतर विधानसभा निवडणुकीत संघाने भाजपसाठी जोरदार प्रयत्न केले आणि त्यासाठी मतदारापर्यंत पोहचण्यासाठी संघाने व्युहरचना तयार केली होती.

देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून बाहेर पडून संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती.त्यावेळी संघाचे सहसरकार्यवाह अतुल लिमये इतर पदाधिकाऱ्यांसह नागपुरात धरमपेठ परिसरातील देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी पोहोचले होते आणि फडणवीसांशी त्यांनी तासभर चर्चा केली होती आणि त्यानंतर अवघ्या काही तासात फडणवीस हे त्यांच्या पदावर कायम राहतील, ते राजीनामा देऊन सरकारमधून बाहेर पडणार नसल्याचे भाजपकडून स्पष्ट करण्यात आले होते हे विशेष. लोकसभा निवडणुकीनंतर संघाने विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने अनेकदा समन्वय बैठका घेऊन संघाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपसह संघाशी संबंधीत संस्थाना मार्गदर्शन केले आहे. यावेळी काही स्वंयेसवकांशी संवाद साधला असताना मुकुंद बापट म्हणाले, संघाचा स्वयंसेवक असलेले देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होत आहे याचा आम्हाला आनंद आहे. राज्याच्या विकासात त्याचे योगदान असताना आता त्यांच्या कार्यकाळात आणखी विकास होईल. मयुर अयाचित म्हणाले. फडणवीस यांची मुख्यमंत्री म्हणून निवड होणार असल्यामुळे संघाचा स्वयंसेवक राज्याचा मुख्यमंत्री होत आहे याचा आनंद आहे. मदन जोशी, रवी पुराणिक, चंद्रशेखर बमनोटे, विजय तुलडे, रवी चिंंचाळकर आणि ज्येष्ठ स्वयंसेवक अरुण बक्षी यांनी आनंद व्यक्त केला.

Eknath Shinde News
Eknath Shinde : एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार का? उदय सामंत यांनी दिलं उत्तर; म्हणाले, “त्यांनी…”
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
Devendra Fadnavis EKnath shinde ajit Pawar
VIDEO : “शिंदेंचं माहित नाही, मी तर उद्या शपथ घेणार”, अजित पवारांचं मिश्कील वक्तव्य, तर शिंदेंनीही घेतली फिरकी
Sachin Tendulkar Meets Vinod Kambli
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli : सचिन भेटायला आला पण विनोद कांबळीला उभंही राहता आलं नाही, मैत्रीतला ‘तो’ क्षण राज ठाकरेही पाहातच राहिले!
'आप' पक्षाने काँग्रेसबरोबर युती करण्यास का दिला नकार? (फोटो सौजन्य पीटीआय)
Delhi Elections 2025 : आम आदमी पक्षाने काँग्रेसबरोबर युती करण्यास का दिला नकार? काय आहेत कारणे?
Girgaon Marathi Marwari Conflict
“इथे मराठीत न बोलता..”, गिरगावमध्ये मराठी भाषेच्या गळचेपीवर भाजपा आमदार मंगल प्रभात लोढांची मोठी प्रतिक्रिया
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?

हेही वाचा : ‘फेईंगल’ चक्रीवादळाचा महाराष्ट्रावरही परिणाम…या भागाला तर थेट सतर्कतेचा इशाराच…

विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची धामधूम आटोपल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याच दिवशी सायंकाळी संघ मुख्यालयात पोहचले. त्यांनी मतदान आटोपल्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेऊन जवळपास २० मिनिटे चर्चा करुन त्यांचा आशीर्वाद घेतला होता. देवेंद्र फडणवीस यांची राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून शपथविधी सोहळा आटोपल्यानंतर ते संघ मुख्यालयात भेट देणार का याकडे आता लक्ष लागले आहे.

Story img Loader