नागपूर : भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी आणि राज्याच्या मुख्यमंत्रीपदी संघाचे स्वयंसेवक असलेले देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आल्याचे जाहीर होताच अनेक संघ स्वयंसेवकानी आनंद व्यक्त केला. भाजप आणि महायुतीला राज्यात प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड व्हावी अशी केवळ भाजप कार्यकर्त्याची नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही त्याच भूमिकेत होते..देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय नफ्या तोट्यासाठी कधीही स्वतः संघाचा स्वयसेवक असल्याचे लपविले नाही. आमदार ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या त्यांच्या राजकीय प्रवासात ते संघाच्या अनेक कार्यक्रमात झाले आहे. विशेष म्हणजे विजयादशमी उत्सवात ते गणवेशात सहभागी होतात. संघाच्या सर्वच पातळ्यांवर त्यांचा संघाच्या पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद नेहमीच राहिला आहे. २०१९ मध्ये युतीची सत्ता आल्यानंतर भाजपला बहुमत मिळाले मात्र त्यांची मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली नसल्यामुळे संघ स्वयंसेवकामध्ये त्यावेळी नाराजी होती. नुकत्याच लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या जोरदार झटक्यानंतर विधानसभा निवडणुकीत संघाने भाजपसाठी जोरदार प्रयत्न केले आणि त्यासाठी मतदारापर्यंत पोहचण्यासाठी संघाने व्युहरचना तयार केली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा