Choudhary Family 4th Generation in Raver Assembly Constituency जळगाव – रावेर मतदारसंघातून काँग्रेसने आमदार शिरीष चौधरी यांच्याऐवजी त्यांचे पुत्र धनंजय चौधरी यांची उमेदवारी जाहीर केली आहे. यानिमित्ताने चौधरी परिवाराची चौथी पिढी रावेर तालुक्याच्या राजकारणात उतरली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
स्वातंत्र्य चळवळीला चालना देण्यासाठी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ५० वे ग्रामीण अधिवेशन डिसेंबर १९३६ मध्ये फैजपूर येथे आयोजित करण्यात आले होते. फैजपूर येथे अधिवेशनाचे आयोजन करण्यामागे स्वातंत्र्य चळवळीतील कार्यकर्ते धनाजी नाना चौधरी यांचा मोठा सहभाग होता. खिरोदा हे धनाजी चौधरींचे गाव. १९४२ च्या स्वातंत्र्य चळवळीत ‘भारत छोडो’ने संपूर्ण देशात जोर घेतल्यानंतर धनाजी चौधरी यांना अटक झाली होती. शाळेतील २५ विद्यार्थ्यांना कारागृहात डांबण्यात आले होते, त्यात धनाजी चौधरी यांचे पुत्र मधुकरराव चौधरी हेदेखील होते.
हेही वाचा >>>Kishor Jorgewar: राजकीय विश्वासार्हता गमावलेल्या किशोर जोरगेवारांची उमेदवारीसाठी भटकंती
वडिलांच्या निधनानंतर मधुकरराव चौधरी यांनी राजकारणात सहभाग घेणे सुरु केले. १९५७ मध्ये ते प्रथमच काँग्रेसचे रावेर मतदारसंघातील आमदार झाले. त्यानंतर तब्बल २४ वर्षे राज्याच्या राजकारणात ते सक्रिय राहिले. १९९० मध्ये ते विधानसभेचे अध्यक्षही झाले होते. राज्याच्या मंत्रिमंडळात १९५७ ते १९७८ या २१ वर्षांच्या कालावधीत मधुकरराव चौधरी यांनी १३ विभागाचे मंत्री म्हणून काम पाहिले. शिक्षण, अर्थ व नियोजन, महसूल, पाटबंधारे, ऊर्जा, आरोग्य, नगरविकास, सांस्कृतिक कार्य विभाग, वनविभाग आदी खात्यांची त्यांनी जबाबदारी पाहिली.रावेर तालुक्यातील खिरोदा येथील जनता शिक्षण मंडळाचे ते संस्थापक होते.
मधुकरराव चौधरी यांच्या पश्चात पाल येथील सातपुडा विकास मंडळासह खिरोदा, फैजपूर येथील शैक्षणिक संस्था आणि रावेर तालुक्याच्या राजकारणाची धुरा शिरीष चौधरी यांनी खांद्यावर घेतली. शिरीष चौधरी हे २००९ मध्ये रावेर मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून गेले. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी भाजपचे उमेदवार हरिभाऊ जावळे यांचा पराभव करून रावेर तालुक्यावरील चौधरी परिवाराचे वर्चस्व सिद्ध केले होते.
आगामी विधानसभा निवडणुकीत शिरीष चौधरी यांनी स्वत:ऐवजी पुत्र धनंजय चौधरी यांना राजकारणात आणले आहे. तसे बघता, गेल्या वर्षीच एनएसयुआयच्या प्रदेश सरचिटणीसपदी निवड झाल्यानंतर धनंजय चौधरी हे रावेरच्या राजकारणात सक्रिय झाले होते. काही महिन्यांपूर्वी दिवंगत मधुकरराव चौधरी यांच्या कृतज्ञता सोहळ्याच्या निमित्ताने आमदार शिरीष चौधरी यांनी काँग्रेसमध्ये धनंजय यांना पुढे आणले होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि सतेज पाटील हेही त्यावेळी उपस्थित होते. चौधरी परिवाराच्या चौथ्या पिढीची राजकारणातील सुरुवात कशी होते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.