पुणे : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी पुण्यात काँग्रेसच्या इच्छुकांनी उमेदवारीसाठी राज्यातील नेत्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या असताना, कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी थेट दिल्लीवारी करत प्रतिस्पर्धी उमेदवारांना धक्का दिला आहे. धंगेकर यांनी दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींची भेट घेतल्याने काँग्रेसच्या इच्छुकांमध्ये अस्वस्थता, तर धंगेकर उमेदवार असल्यास निवडणुकीची लढाई कठीण होण्याच्या भीतीने भाजपमध्ये धाकधूक वाढली आहे. धंगेकरांना उमेदवारी देऊन काँग्रेसने कसब्याची पुनरावृत्ती करण्याचा डावपेच आखल्यास काय करायचे, याबाबत भाजपमध्ये चिंता आणि चिंतन सुरू झाले आहे.

आमदार धंगेकर कसब्यातून विजयी झाल्यानंतर कसब्याबरोबर शहरातील अन्य विधानसभा मतदार संघांतही मतदारांच्या संपर्कात आहेत. वेगेवेगळे विषय हाती घेऊन ते कायम चर्चेत रहात आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी धंगेकर यांनी आता नवीन खेळी सुरू केली आहे. अयोध्या येथील प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापनेचे निमंत्रण काँग्रेसने नाकारले असताना धंगेकर यांनी मात्र ‘जय श्रीरामा’चा नारा दिला आहे. ‘आपल्या प्रभू श्रीरामांसाठी एक दिवा लावूया, आनंदोत्सव साजरा करूया’ अशी घोषणा देत त्यांनी मतदारांना दिवे वाटप सुरू केले आहे. त्यामुळे यांच्या या उपक्रमाची चर्चा सुरू झाली आहे. कसब्याबेराबरच कोथरुड, पर्वती, हे भाजपचे मतदार आहेत. त्यांना खुश करण्यासाठी आमदार धंगकर यांनी राजकीय गणिते जुळविण्यास सुरुवात केली आहे.

भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत?
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
shivsena marathi news
पुण्यात भाजपच्या खेळीने शिवसेनेच्या दोन्ही गटांत अस्वस्थता
Ravindra Chavan responsibility BJP state president post
भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाण यांना प्रतीक्षा
bjp and ajit pawar ncp political conflict over allegations against dhananjay munde
धनंजय मुंडे यांच्या विरोधात भाजपचे सुरेश धस, चित्रा वाघ यांचा बोलविता धनी कोण ?
bjp devendra fadnavis stand on dhananjay munde resignation as minister post
धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद भाजपवर अवलंबून
Congress President slams PM says BJP has vested interests in Manipur instability
मणिपूर अस्थिरतेत भाजपचे हितसंबंध! काँग्रेस अध्यक्षांचे पंतप्रधानांवर शरसंधान
bjp workers demand police security for mla Pravin Tayade over threat from Bachchu Kadu activists
भाजप आमदाराच्या जिवाला बच्चू कडूंच्या कार्यकर्त्यांकडून धोका, सुरक्षा पुरवण्‍याची मागणी

हेही वाचा…नगरमध्ये भाजपमधूनच विखे-पाटील यांच्या कार्यपद्धतीवर नापसंती

काँग्रेसच्या इच्छुकांमध्ये चलबिचल

धंगेकर हे मतदार संघात मतदारांशी संपर्क वाढवित असताना आता त्यांनी उमेदवारी मिळविण्यासाठी गाठीभेटी सुरू केल्या आहेत. त्यासाठी गेल्या आठवड्यात त्यांनी थेट दिल्ली गाठली. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यापासून ते अन्य महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेतली. आमदार धंगेकर यांच्या दिल्लीवारीनंतर काँग्रेसच्या इच्छुकांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. नुकतेच काँग्रेसने इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज मागविले होते. त्यामध्ये २० अर्ज आले आहेत. त्यापैकी माजी आमदार मोहन जोशी हे प्रबळ दावेदार मानले जातात. त्यांच्याशिवाय माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी शहराध्यक्ष अभय छाजेड, प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, यांनीही उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे या इच्छुकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. धंगेकर यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांच्या इच्छेवर पाणी फेरले जाणार आहे.

हेही वाचा…मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – हितेंद्र ठाकूर यांचे सूर जुळले !

भाजपपुढे उमेदवार निवडीचे आव्हान

काँग्रेसने आमदार धंगेकर यांना उमेदवारी दिल्यास भाजपपुढे उमेदवार निवडीचे आव्हान उभे राहणार आहे. भाजपकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक सुनील देवधर यांच्यासह माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक हे इच्छुक उमेदवार आहेत. देवधर यांना उमेदवारी दिली आणि धंगेकर हे काँग्रेसचे उमेदवार असतील, तर पुन्हा एकदा कसब्याची पुनरावृत्ती होण्याची भीती भाजपला आहे. देवधर यांच्यापेक्षा मतदारांना धंगेकर हे जास्त परिचित असल्याने भाजपवर दुसरा पर्याय शोधण्याची वेळ येण्याची चर्चा सुरू झाली आहे. कसब्याप्रमाणे ब्राह्मण-ब्राह्मणेतर असा प्रचार झाल्यास दगाफटका होण्याची शक्यता असल्याने भाजपने सावध पवित्रा स्वीकारला आहे. त्यामुळे उमेदवारी निवडीबाबत जाहीर वाच्यता करणे, सर्व पातळ्यांवर टाळण्यात येत आहे.

हेही वाचा…सांगलीत तिरंगी लढतीचा फायदा पुन्हा भाजपलाच ? खासदार संजयकाका पाटील यांच्या विरोधात भाजपमध्येच दुफळी

प्रभू श्रीरामांसाठी एक दिवा घरोघरी

आमदार धंगेकर यांनी अयोध्या येथील प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापनेचे निमित्त साधत घरोघरी संपर्क साधण्यास प्रारंभ केला आहे. त्यासाठी त्यांनी पितळी दिवे मतदारांना देण्यास सुरुवात केली आहे. प्रभू श्रीरामांसाठी एक दिवा घरोघरी देऊन मतदारांना खुश करण्याचा डाव खुबीने आखला आहे. त्याद्वारे भाजपच्या मतदारांची सहानूभूती आमदार धंगेकर हे मिळवित आहेत. त्यामुळे भाजपपुढे धंगेकरांना रोखण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

Story img Loader