अलिबाग- रायगड जिल्ह्यात कर्जत आणि अलिबाग विधानसभा मतदारसंघात भाजपमध्ये बंडखोरी उफाळून आली आहे. कर्जतमधून विधानसभा संघटक किरण ठाकरे यांनी तर अलिबागमधून उपाध्यक्ष दिलीप भोईर यांनी बंडखोरी करत शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांविरोधात बंडाचे निशाण फडकावले आहे. आता या दोन्ही बंडखोरांना थोपविण्याचे मोठे आव्हान महायुतीसमोर असणार आहे.

अलिबाग आणि कर्जत या दोन्ही मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत. त्यामुळे दोन्ही जागा महायुतीच्या जागा वाटपात शिवसेना शिंदे गटासाठी सोडण्यात आल्या आहेत. मात्र या निर्णयामुळे भाजपमधील इच्छुकांचा भ्रमनिरास झाला. त्यामुळे पक्षाच्या निर्णयाविरोधात जाऊन त्यांनी दोन्ही मतदारसंघात बंड पुकारले. कर्जतमधून शिवसेनेचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. पण त्यांच्या विरोधात भाजपचे किरण ठाकरे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या सुधाकर घारे थोरवे यांना बंडखोरी आव्हान दिले आहे. त्यामुळे थोरवे यांची निवडणुकीआधीच चौफेर कोंडी झाल्याचे दिसून येत आहे.

Kishanchand Tanwani, Shivsena Uddhav Thackeray party, Kishanchand Tanwani news, Kishanchand Tanwani latest news, Kishanchand Tanwani marathi news,
माघार घेणाऱ्या तनवाणींचा बोलविता धनी वेगळाच
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Sangli Assembly Constituency, Sangli Vidhan Sabha Constituency,
Sangli Assembly Constituency : सांगलीत अजून एका घराण्यात दुहीची बिजे
Shaina NC vs Atul Shah
Shaina NC vs Atul Shah: ‘निवडणूक म्हणजे संगीत खुर्ची आहे का?’, शायना एनसींना उमेदवारी मिळताच भाजपाचे ज्येष्ठ नेत्याचे बंड; अपक्ष उमेदवारी दाखल करणार
What Gopal Shetty Said?
Gopal Shetty : भाजपात बंडखोरी! गोपाळ शेट्टींकडून अपक्ष अर्ज दाखल, म्हणाले; “बोरीवली काय धर्मशाळा…”
BJP Narendra Mehata in Mira Bhayander Assembly Constituency
Mira Bhayandar Vidhan Sabha Constituency : मीरा-भाईंदरची भाजपाची उमेदवारी अखेर नरेंद्र मेहतांनाच, मुख्यमंत्र्यांच्या सहयोगी आमदार गीता जैन एकाकी
ubt shiv sena ex city chief amar qatari slap bjp city chief shri ram ganpule in sangamner
शिवसेनेच्या माजी शहर प्रमुखांनी भाजपा शहर प्रमुखाच्या श्रीमुखात भडकावली; नेमके काय घडले ?

हेही वाचा – ‘कमळा’ची लढत ‘मशाल’ टाळून, मराठवाड्यात भाजपला ठाकरे गटाचे आव्हान कमी; दोनच जागांचा अपवाद

अलिबाग विधानसभा मतदारसंघातील परिस्थिती फारशी वेगळी नाही. अलिबागमधून महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून शिवसेना शिंदे गटाच्या महेंद्र दळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पण भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भोईर यांनी बंडखोरी केली आहे. आज अपक्ष उमेदवार म्हणून ते उमेदवारी अर्ज भरणार आहेत. भोईर यांनी शेकापमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांना पक्षाने विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांना मतदारसंघात संघटनात्मक बांधणी करण्याचे निर्देश दिले होते. गेल्या वर्षभरात त्यांनी पक्षाच्या वॉर रुमच्या माध्यमातून निवडणुकीची पायाभरणी केली होती. आता मात्र उमेदवारी मिळत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी अपक्ष अथवा उपलब्ध पर्यायाचा वापर करून निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. दिलीप भोईर हे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे अत्यंत जवळचे सहकारी आहेत. मात्र पर्याय उपलब्ध न झाल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. दिलीप भोईर यांच्या बंडखोरीमुळे महायुतीचे उमेदवार महेंद्र दळवी यांच्या अडचणी वाढणार आहेत.

दोन्ही मतदारसंघातील या बंडखोरीमुळे महायुतीमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. बंडखोरांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र एकूण परिस्थिती लक्षात घेता, तीनही बंडखोर उमेदवार माघार घेण्याच्या मानसिकतेत नाहीत. ही बंडखोरी थोपवली गेली नाही तर महायुतीमधील मतविभाजनाचा फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना होऊ शकणार आहे.

हेही वाचा – Gopal Shetty : मुंबई भाजपमध्ये असंतोष; गोपाळ शेट्टी, अतुल शहा आदींचे अपक्ष अर्ज

२०१९ च्या उरण पॅटर्नची चर्चा….

२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या महेश बालदी यांनी शिवसेनेच्या मनोहर भोईर यांच्या विरोधात बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती. युती असूनही शिवसेनेच्या मनोहर भोईर यांना भाजपकडून मदत झाली नाही. त्यावेळी भजपची संपूर्ण संघटना बालदी यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली होती. त्यामुळे मनोहर भोईर यांचा निवडणुकीत पराभव झाला होता. तर अपक्ष महेश बालदी निवडून आले होते. निवडून आल्यावर लगेचच त्यांनी भाजपला पाठींबा देत असल्याचे जाहीर केले होते. या निवडणुकीत उरण मतदारसंघातून भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत. २०१९ मधील निवडणुकीचा हाच पॅटर्न अलिबाग आणि कर्जत मतदारसंघात भाजपकडून वापरला जात असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे. भोईर यांच्या उमेदवारीमुळे भाजपच्या संघटनेत अलिबागमध्ये दोन गट पडल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

Story img Loader