Maharashtra Assembly Election 2024 How many rebels Contesting Election : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी ७,९९५ इच्छुक उमेदवारांनी १०,९०५ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यात विविध पक्षांचे बंडखोर उमेदवारही होते. गेल्या काही दिवसांमध्ये वेगवेगळ्या पक्षातील वरिष्ठांनी बंडखोरांची समजूत काढली. यापैकी अनेक बंडखोरांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. तर, काही इच्छुकांचा निवडणूक लढवण्याचा विचार बदलल्याने त्यांनी देखील उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. निवडणूक आयोगाने सोमवारी (४ नोव्हेंबर) दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत दिली होती. त्यानुसार काल दुपारी तीन वाजेपर्यंत शेकडो इच्छुकांनी त्यांचे अर्ज मागे घेतले. मतांची विभागणी टाळण्यासाठी सर्व पक्षांमधील वरिष्ठ नेत्यांनी या बंडखोरांशी चर्चा करून अधिकृत उमेदवाराला मिळणाऱ्या मतांची विभागणी रोखण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला. त्यामध्ये नेत्यांना काही प्रमाणात यश आलं असलं तरी काही बंडखोरांनी माघार घेतली नाही.
काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) व शिवसेना (ठाकरे) हे तीन पक्ष प्रमुख असलेल्या महाविकास आघाडीमध्ये डावे व समाजवादी असे सहा छोटे पक्ष असून विरोधकांच्या या आघाडीत विधानसभा मतदारसंघाच्या वाटाघाटीतून उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी तोडगा निघू शकला नाही. परिणामी, आघाडीतील पाच छोट्या पक्षांनी तब्बल १५ मतदारसंघांत बंडखोरी कायम ठेवली आहे.
हे ही वाचा >> Kolhapur North Vidhan Sabha Constituency : शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता ?
शेवटच्या तासापर्यंत ‘हायव्होल्टेज ड्रामा’
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निधला, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांनी वेगवेगळ्या मतदारसंघातील बंडखोरांशी चर्चा केली आणि अनेक बंडखोरांना अर्ज मागे घेण्यास राजी केलं. तर, सत्ताधारी महायुतीत ही जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पार पाडली. भाजपाने विदर्भ, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील आडमुठ्या नेत्यांचं मन वळवण्यात यश मिळवलं आहे. तर, शिंदेंच्या शिवसेनेने देखील अनेक बंडखोरांना माघार घ्यायला लावली. माहीम मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपेपर्यंत हायव्होल्टेज ड्रामा चालू होता. मात्र, शिंदेंचे उमेदवार सदा सरवणकर यांनी माघार घेतली नाही.
हे ही वाचा >> बालेकिल्ला राखण्याचे भाजपपुढे कडवे आव्हान, अकोला पश्चिममध्ये हिंदू मतांच्या ध्रुवीकरणामुळे मोठी अडचण
एकनाथ शिंदे, अजित पवारांच्या प्रयत्नांना काही प्रमाणात यश
शिवसेनेतील (शिंदे) एका नेत्याने सांगितलं की आमच्या नेत्यांनी सर्व बंडखोरांशी संवाद साधला. सर्वांचीच मनधरणी केली. मात्र काही बंडखोर माघार घेण्यास तयार नाहीत. जसे की मुंबई उपनगरमधील मानखुर्द शिवाजीनगरमधील आमचा उमेदवार माघार घेण्यास तयार नाही. या मतदारसंघात आमचा मित्रपक्ष राष्ट्रवादीने (अजित पवार) नवाब मलिकांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीमधील (अजित पवार) सूत्रांनी सांगितलं की दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी दिंडोरी व देवळालीमधील बंडखोरांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला.
काँग्रेस, राष्ट्रवादीने (शरद पवार) अनेक बंडखोरांना माघार घ्यायला लावली
काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितलं की अंधेरी पश्चिममधून मोहसीन हैदर, भायखळ्यामधून मधू चव्हाण आणि सांगलीतून जयश्री पाटील या बंडखोरांना उमेदवारी मागे घ्यायला राजी करण्यात आम्ही यशस्वी ठरलो. तर राष्ट्रवादीचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं की आमच्या आमच्यात (मविआमध्ये) मैत्रीपूर्ण लढती होऊ नयेत यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केले. यामध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणात यश आलं आहे. सर्व बंडखोर माघार घेतील याची आम्ही सर्वच नेते खात्री करू.
हे ही वाचा >> उमरखेडमध्ये दोन माजी आमदारांचे नवख्यांना आव्हान; दिग्रस, राळेगावमध्ये आज-माजी मंत्र्यांची शक्ती पणाला
निवडणूक सत्ताधारी विरुद्ध विरोधक अशीच होईल : शिवसेना (ठाकरे)
शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत म्हणाले, “काही ठिकाणी गैरसमजातून काही घटना घडल्या आहेत. अनेकांची समजूत काढून आम्ही त्यांना माघार घ्यायला लावली आहे. अजूनही आम्ही अनेकांशी चर्चा करत असून इतर मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. ही निवडणूक सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातच होईल याची आम्ही काळजी घेऊ. महाविकास आघाडीत आपसांत संघर्ष होणार नाही याची आम्ही काळजी घेतली आहे.
महायुतीचे ३६ तर मविआचे १४ बंडखोर
एकूण ५० मतदारसंघांमध्ये बंडखोर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. महायुतीला बंडखोरीचा मोठा फटका बसेल असं दिसतं होतं. कारण, ३६ मतदारसंघांमध्ये महायुतीचे दोन-दोन उमेदवार आमने सामने होते. भाजपाचे १९ बंडखोर निवडणुकीच्या रिंगणात होते, तर शिवसेनेच्या (शिंदे) १६ बंडखोरांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अजित पवारांच्या पक्षातील अनेकांनी बंडखोरी केली होती. मविआसमोरचं आव्हान तुलनेने फार मोठं नव्हतं. महाविकास आघाडीत काँग्रेसचे सर्वाधिक बंडखोर निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापाठोपाठ शिवसेना (ठाकरे) व राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) काही इच्छुकांनी बंडाचं निशाण फडकावलं होतं.
हे ही वाचा >> ‘मनोज जरांगे यांचा चेहरा उघड, आता लोकांचा त्यांना पाठिंबा नाही’, चंद्रशेखर बावनकुळे यांची रोखठोक भूमिका
हे बंडखोर निवडणुकीच्या रिंगणात
समीर भुजबळ (नांदगाव), हिना गावित (अक्कलकुवाः, गीता जैन (मीरा रोड), गायत्री शिंगणे (सिंदखेड राजा), ज्योती मेटे (बीड), तौफिक शेख (सोलापूर शहर मध्य), राजा ठाकूर (श्रीवर्धन), अमोल देशमुख (सावनेर), याज्ञवल्क्य जिचकार (काटोल), चंद्रपाल चौकसे (रामटेक), प्रमोद घरडे (उमरेड), नरेंद्र जिचकार (नागपूर पश्चिम), शोभा बनशेट्टी (सोलापूर शहर उत्तर) या बंडखोरांची बंडखोरी मोडून काढण्यात त्यांच्या पक्षांचे नेते अपयशी ठरले आहेत.