डोंबिवली : डोंबिवली विधानसभा निवडणुकीतील शिवसेना ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार दीपेश म्हात्रे यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे १० व्हीव्हीपॅट यंत्रातील मते पुन्हा मोजणीसाठी अर्ज केला आहे. या प्रक्रियेसाठी लागणारी चार लाख ७२ हजार रुपयांची रक्कम उमेदवार म्हात्रे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे भरणा केली आहे. त्याचबरोबर ठाकरे गटाने डोंबिवलीत ‘ईव्हीएम’ विरुध्द आंदोलन सुरू केले असून, त्या आंदोलनाचा भाग म्हणून शहरात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे.

विधानसभा निवडणुकीत प्रत्यक्ष झालेले मतदान आणि मतदानाच्या दिवशी बाहेर आलेले आकडे पाहता, त्यात तफावत दिसून आली आहे. त्यामुळे आपण १० व्हीव्हीपॅट यंत्रांमधील मते पुनर्मोजणीची मागणी केली आहे. त्यासाठी लागणारे शुल्क जिल्हाधिकारी कार्यालयाकडे भरणा केले आहे, असे म्हात्रे यांनी स्पष्ट केले. या प्रक्रियेमुळे पुढील आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून व्हीव्हीपॅट यंत्रातील मते मोजणीसाठी ठिकाण आणि तारीख निश्चित केली जाईल, असे ते म्हणाले. या मतमोजणी प्रक्रियेवरून डोंबिवलीत ठाकरे गट आणि भाजपमधील धुसफूस पुन्हा वाढण्याची चिन्हे आहेत.

Budget New Income Tax Act for tax reforms
कर सुधारणांसाठी नवीन प्राप्तिकर कायदा
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Budget 2025 News Tax regime slabs
१ हजार रुपये अधिक उत्पन्नामुळे ६० हजारांचा फटका, टॅक्सच्या भितीने नोकरदारांवर पगार कमी करून घेण्याची वेळ
New Tax Slab
१२ लाखांहून कमी उत्पन्न असणाऱ्यांसाठीही टॅक्स स्लॅब, त्याचा नेमका अर्थ काय?
Budget 2025 Cancer drugs to get cheaper as govt announces major healthcare reforms
Union Budget 2025 : कॅन्सरग्रस्त रुग्णांना दिलासा; औषधं होणार स्वस्त, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची घोषणा
ST seeks UPI solution to holiday money dispute Mumbai news
सुट्या पैशांच्या वादावर एसटीकडून ‘यूपीआय’चा तोडगा; प्रतिसादामुळे उत्पन्नात दुप्पट वाढ
Without internet recharge plans Airtel Jio Vi launches voice and sms only recharge plans cheapest prepaid recharge plans
घरात वायफाय असणाऱ्यांसाठी Airtel-Jio-Vi चा जबरदस्त प्लॅन! दिवसाला फक्त ५ रुपये खर्च, जाणून घ्या किंमत किती
Narendra Modi JP Nadda
भाजपावर मतदारांसह देणगीदारांचीही कृपा, वर्षभरात तब्बल ३,९६७ कोटींच्या देणग्या, ८७ टक्के वाढ

हेही वाचा >>>काँग्रेसचा ईव्हीएमवरील राग अनाठायी; पराभव होणार हे अंतर्गत सर्वेक्षणातून झालं होतं स्पष्ट

मतदान प्रक्रियेत गडबड होत असल्याचे पुरावे बाहेर आले आहेत. लोकशाही टिकविण्यासाठी आणि जनतेच्या विश्वासाला धक्का लागणार नाही, यासाठी आम्ही हा लढा देत आहोत.- दीपेश म्हात्रे, उमेदवारशिवसेना ठाकरे गट

Story img Loader