Red Book Indian Constitution Devendra Fadnavis : लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सातत्याने सत्ताधारी भारतीय जनता पार्टीवर व त्यांच्या धोरणांवर टीका करत आहेत. भाजपा सरकारचा देशाच्या संविधानाला धोका असल्याचं राहुल गांधी सातत्याने सांगत आहेत. लोकसभा निवडणुकीतील प्रचारादरम्यान, राहुल गांधी यांनी भारतीय संविधानाची एक छोटी, लाल रंगाची प्रत दाखवली होती. हे संविधान आपल्याला वाचवायचं आहे असं राहुल गांधी सातत्याने जनतेला सांगत आहेत. भाजपा संविधान, लोकशाही व कायदा नष्ट करू पाहत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही राहुल गांधी संविधानाची ही प्रत घेऊन फिरत आहेत.

दरम्यान, यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला. राहुल गांधी लाल पुस्तक दाखवून शहरी नक्षलवाद्यांचा व अराजकता पसरवणाऱ्या संघटनांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे. तेव्हापासून हे लाल पुस्तक अधिक चर्चेत आलं आहे.

Ashok Pawar and Rushiraj Pawar
Ashok Pawar : आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण करून मारहाण केल्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Manoj Jarange Patil maulana sajjad nomani
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे आता दिल्ली हादरवणार? मुस्लीम, बौद्ध धर्मगुरुंची साथ? रणनिती तयार, हिंदीचा अडथळाही दूर
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?
US Presidential Election Results 2024 Live Updates in Marathi| Donald Trump vs Kamala Harris Live
US Election Results 2024 Updates: निवडून येताच डोनाल्ड ट्रम्प यांचं टीकाकारांना उत्तर; म्हणाले, “मी युद्ध घडवून आणणार नाही, तर…”
Narendra modi BHIM UPI Babasaheb Ambedkar
“BHIM UPI चं नाव बाबासाहेबांच्या नावावर”, मोदींचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेने खोडून काढला? पुरावा देत म्हणाले…
Ramesh Chennithala
Ramesh Chennithala : “हरियाणाच्या निवडणुकीतून खूप शिकायला मिळालं, त्यामुळे ८० टक्के बंडखोरांनी…”, रमेश चेन्निथला यांचं महाराष्ट्राच्या निवडणुकीबाबत मोठं भाष्य

हे ही वाचा >> Ramesh Chennithala : “हरियाणाच्या निवडणुकीतून खूप शिकायला मिळालं, त्यामुळे ८० टक्के बंडखोरांनी…”, रमेश चेन्निथला यांचं महाराष्ट्राच्या निवडणुकीबाबत मोठं भाष्य

ते लाल पुस्तक नेमकं कशाबद्दल आहे?

माओवादाचा जनक व १९४९ ते १९७६ पर्यंत चीनवर एकाधिकारशाही गाजवणाऱ्या माओ त्से-तुंग यांचं जगाला संदेश देणारं Quotations from Chairman Mao Tse-tung हे एक प्रसिद्ध पुस्तक आहे. यात माओवादाविषयीची सविस्तर माहिती आहे. फडणवीसांनी म्हटलं आहे की राहुल गांधींच्या हातात तेच पुस्तक आहे. राहुल गांधींच्या हातात भारतीय संविधानाची छोटी प्रत असल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात आलं आहे. तसेच राहुल गांधींच्या हातातील पुस्तकाच्या मुखपृष्ठावर Constitution of India (भारतीय संविधान) असं लिहिलेलं दिसतं असलं तरी त्यांच्या हातात माओचं पुस्तक असल्याची टीका भाजपाकडून चालू आहे. भाजपा ज्या पुस्तकाबद्दल बोलत आहे, त्या माओच्या पुस्तकाला ‘लिटिल रेड बूक’ देखील म्हटलं जातं.

हे ही वाचा >> मोदी, शहांकडून फडणवीस यांच्यावर कौतुकाची थाप! मुख्यमंत्री पदाचे संकेत

माओची विचारधारा जोपासणारं आणि ती प्रसारित करण्यासाठी जगभर या पुस्तकाची विक्री केली जाते. पीपल्स लिबरेशन आर्मीने सुरू केलेलं वृत्तपत्र पीपल्स लिबरेशन आर्मी डेलीने हे लिटिल रेड बूक प्रकाशित केलं होतं. जगभरात या पुस्तकाचा कित्येक भाषांमध्ये अनुवाद करण्यात आला आहे. आजवर या पुस्तकाच्या अब्जावधी प्रति विकल्या गेल्या आहेत, वाटण्यात आल्या आहेत. काही भारतीय भाषांमध्ये देखील हे पुस्तक अनुवादित करण्यात आलं आहे. १९६६ मध्ये या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित करण्यात आली होती. त्यामध्ये चीनचे तत्कालीन उप-पंतप्रधान बियाओ यांनी लिहिलं आहे की “कामगार, शेतकरी, सैनिक, क्रांतिकारक व बुद्धिजीवी लोकांनी माओ त्से-तुंग यांचे विचार आत्मसात केले पाहिजेत. त्यांचा अभ्यास केला पाहिजे. त्यांनी दाखवलेल्या वाटेवर चाललं पाहिजे आणि उत्तम लढवय्ये झालं पाहिजे”.

हे ही वाचा >> प्रचारातून विकासाचे मुद्दे हद्दपार, जातीय राजकारण, बंडखोरी व मतविभाजनाचे गणितच चर्चेत; सर्वसामान्यांचे जिव्हाळ्याच्या प्रश्नांना बगल

माओच्या लाल पुस्तकात काय आहे?

माओच्या लाल पुस्तकात त्याचे विचार, कम्युनिस्ट पक्ष, समाजातील वर्ग, त्या वर्गांमधील संघर्ष, युद्ध व शांतता, एकता यावर विस्तृत लिखाण केलेलं आहे. “आपल्या विचारांना पुढे नेणारा, सर्वांना मार्गदर्शन करणारा सेद्धांतिक आधार म्हणजे मार्क्सवाद व लेनिनवाद”. “बंदुकीच्या नळीतून राजकीय सत्ता निर्माण करता येते आणि हे सत्य कम्युनिस्टांनी समजून घेतलं पाहिजे”. “शस्त्राच्या जोरावर सत्ता काबीज केली पाहिजे”. “युद्ध अनेक समस्यांवर तोडगा काढू शकतं”, असे माओचे अनेक विचार या पुस्तकात आहेत.

हे ही वाचा >> महायुतीच्या लोकप्रिय आश्वासनांमुळे तिजोरीवर दीड ते दोन लाख कोटींचा अधिक आर्थिक भार ?

लाल पुस्तकाचा भारतातील नक्षल चळवळीशी काय संबंध आहे?

माओने लिहिलेल्या लिटिल रेड बूकमध्ये ‘अ ग्लोबल हिस्ट्री’ नावाचा मोठा धडा आहे. यामध्ये १९६७ साली नक्षलवादी चळवळीच्या उद्रेकाच्या वेळी या पुस्तकाला मोठी लोकप्रियता कशी काय मिळाली यावर सविस्तर माहिती देण्यात आली आहे. कम्युनिस्ट युनिटच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांच्या स्थानिक लोकांविरोधातील आंदोलनाने याची सुरुवात झाली. पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगमधील नक्षलबारी गावात सर्वप्रथम माओवादी विचारांचे लोक पाहायला मिळाले, जे शेतकऱ्यांसाठी आंदोलन करत होते. नक्षलबारी नेते चारू मुजुमदार म्हणाले होते की कॉम्रेड्सना माओचे विचार पटतात. अनेक कॉम्रेड्स हे चळवळीतील कार्यकर्त्यांना माओचं लिटिल रेड बूक स्वतःजवळ ठेवण्याचा व वाचण्याचा अग्रह करतात.

हे ही वाचा >> “सुप्रिया सुळे सत्ताधाऱ्यांवर टीका करतात तेव्हा त्यांचे पती सदानंद सुळेंना…”, शरद पवार यांचे धक्कादायक विधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

संविधानाच्या नावावर लाल पुस्तक छापणं आणि त्यात संविधानाचा एक शब्दही न लिहिणं हा संविधान संपवण्याचा प्रयत्न आहे. काँग्रेसला देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नव्हे तर स्वत:चं संविधान लागू करायचं आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नांदेडमधील सभेतून केली. “काँग्रेसचे लोक संविधानाच्या नावावर लाल पुस्तकांचे वाटप करत आहेत. त्यावर भारताचे संविधान असं लिहिलं आहे. मात्र, त्या पुस्तकाची पानं कोरी आहेत. निवडणुकीच्या प्रचारात खोट्या गोष्टी पसरवण्याचं काम काँग्रेस पक्ष करत आहे”.

Story img Loader