बाळासाहेब जवळकर

पिंपरी : पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात उलथापालथ घडवून आणणाऱ्या ज्या काही मोजक्या घटना गेल्या ३० वर्षात घडल्या असतील, त्यात १९९५ च्या गाजलेल्या विधानसभा निवडणुकीचा संदर्भ हमखास दिला जातो. त्यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार रामकृष्ण मोरे यांचा पक्षातील बंडखोरीमुळे पराभव झाला होता. त्या बंडखोरीला ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे पाठबळ असल्याची चर्चा तेव्हाही होती आणि आजही आहे.

BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
When and where will flood-affected Ektanagari residents be relocated
पूरग्रस्त एकतानगरीचे होणार स्थलांतर नक्की कधी आणि कुठे?
nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
account wise inquiry started against clerk in case of corruption in Jijamata Hospital of Municipal Corporation in Pimpri
पिंपरी : जिजामाता रुग्णालयातील रकमेचा अपहार; लिपिकाची खातेनिहाय चौकशी
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
Rock dove bird pune, Rock dove, Municipal Corporation pune, pune,
पुणे : पारव्यांना खाद्य टाकताय सावधान…! महापालिका वसूल करणार ‘एवढा’ दंड

सुमारे २७ वर्षापूर्वी लढल्या गेलेल्या या निवडणुकीचे स्मरण होण्याचे कारण म्हणजे, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापनेला नुकतीच ४० वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने शहराचे प्रथम महापौर व प्रथम आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली लांडगे यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम चिंचवडला झाला. १९९५ च्या विधानसभा निवडणुकीच्या केंद्रस्थानी हेच लांडगे होते. या मुलाखतीच्या माध्यमातून लांडगे यांनी, या निवडणुकीतील काही घडामोडींवर नव्याने प्रकाश टाकला.

हेही वाचा… मुख्यमंत्र्यांच्या नंदुरबार दौऱ्यात शिंदे गट आणि भाजप यांच्यातील विसंवादाचे दर्शन

भोसरीचे सरपंचपद व त्यानंतर पिंपरी महापालिकेचे नगरसेवकपद भूषवणारे ज्ञानेश्वर लांडगे १९८६ ला शहराचे पहिले महापौर ठरले होते. १९९० च्या विधानसभा निवडणुकीत कामगार नेते राजन नायर यांचा पराभव करून ते हवेलीतून विजयी झाले. याच हवेलीतून १९९५ मध्ये त्यांना पुन्हा उमेदवारी हवी होती. मात्र, खासदारकी भूषवून झालेले रामकृष्ण मोरे विधानसभेसाठी इच्छुक होते. काँग्रेसमधील गटबाजीचे राजकारण तेव्हा शिगेला पोहोचले होते. स्थानिक पातळीवर लांडगे यांना पाठिंबा होता, तसाच रामकृष्ण मोरे यांनाही होता. उमेदवारीवर अंतिम शिक्कामोर्तब दिल्लीत होणार होते. मोरे यांनी स्वतःचे राजकीय वजन वापरून हुशारीने उमेदवारी मिळवली. त्यामुळे लांडगे समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली. प्रचाराच्या दृष्टीने मोरे यांनी गाठीभेठी सुरू केल्या. लांडगे यांना मात्र ते भेटले नाही. दापोडीत हमरस्त्यालगत लांडगे यांचे निवासस्थान होते. त्यांच्या घरावरून मोरे यांचे जाणे-येणे होत होते. मात्र, मोरे यांनी लांडगे यांच्याशी भेट टाळली होती. ‘हे आताच आपल्याला विचारत नाहीत. निवडून आल्यानंतर काय करतील’, अशी धास्ती तेव्हा लांडगे समर्थकांकडून व्यक्त करण्यात येत होती. अशा तापलेल्या वातावरणातच लांडगे यांनी बंडखोरीच्या हेतूने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. या बंडखोरीला नंतर अनेकांनी हवा दिली. त्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांचेही नाव घेतले जाते. निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात रामकृष्ण मोरे यांच्या प्रचारासाठी भोसरीत काँग्रेसची सभा होती. त्या सभेत बोलताना पवारांनी रामकृष्ण मोरे यांचे भरपूर कौतुक केले. त्याचवेळी, ‘माऊली आपलाच आहे’, असे सूचक विधानही त्यांनी केले.

हेही वाचा… सीपीआय (एम) नेत्यांवरील लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर केरळमध्ये काँग्रेस आक्रमक, मुख्यमंत्री विजयन यांच्यावर टीका

सभेला जमलेल्या हजारोंच्या संख्येने उपस्थित नागरिकांना याचा नेमका अर्थ लगेच उमगला नाही. मात्र, पवारांचा लांडगे यांना छुपा पाठिंबा आहे, अशी हूल सभेत उठली व नंतर त्याचा वेगाने प्रसार झाला. अपक्ष असूनही लांडगे यांना ४८ हजार मते मिळाली. तीच मते निकालाच्या दृष्टीने निर्णायक ठरली. रामकृष्ण मोरे यांना एक लाख २ हजार मते मिळाली आणि गजानन बाबर एक लाख १० हजार मते मिळाली. दिग्गजांच्या या लढतीत बाबरांची लॉटरी लागली. ८ हजारांच्या फरकाने ते विजयी झाले. स्थानिकांचा प्रभाव असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये सातारची पार्श्वभूमी असलेल्या गजानन बाबर यांच्या नेतृत्वाचा उदय झाला. काँग्रेस पक्षातील गटबाजी, त्यामुळे पडलेली उभी फूट, विद्यमान आमदाराने केलेली बंडखोरी, गावागावातून बंडखोरीला मिळालेले पाठबळ, अनपेक्षित निकाल अशा सर्व गोष्टी अजूनही शहरवासियांच्या स्मरणात आहे. त्याचपध्दतीने ‘माऊली आपलाच आहे’, हे पवारांचे गाजलेले विधानही सर्वांच्या विशेषत: भोसरीकरांच्या चांगलेच लक्षात आहे.

Story img Loader