गुजरात भाजपामध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र समोर येत आहे. भाजपाचे प्रदेश महासचिव आणि पक्ष संघटनेतील मातब्बर नेते म्हणून ज्यांचा उल्लेख केला जात होता, त्या प्रदीप सिंह वाघेला यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊ केला आहे. पक्षाने शनिवारी त्यांचा राजीनामा स्वीकारला असल्याचे जाहीर केले. गुजरातचे अध्यक्ष सी. आर. पाटील यांचे विश्वासू सहकारी आणि संघटनेतील उच्चपदस्थ असलेल्या वाघेला यांनी अचानक राजीनामा दिल्यामुळे सत्ताधारी पक्षात एकच खळबळ उडाली आहे. वाघेला यांच्या अचानक राजीनामा दिल्याने त्यांचे पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी बिनसले असल्याची चर्चा आहे. वाघेला यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत असल्याचे पक्षाने सांगितले; तर द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना वाघेला म्हणाले की, त्यांना २९ जुलै रोजीच राजीनामा देण्यास सांगितले गेले होते.
कोण आहेत प्रदीप सिंह वाघेला?
दोन दशकांपूर्वी वाघेला यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमधून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. अहमदाबादमधील बाकराना गावातून येणारे ४२ वर्षीय वाघेला क्षत्रिय नेते म्हणून ओळखले जातात. विद्यार्थी चळवळीपासून राजकीय जीवनाची सुरुवात केल्यानंतर मागच्या दोन दशकात त्यांनी भाजपामध्ये वेगात पण भक्कम असा राजकीय प्रवास केला. २००३ साली वाघेला यांची पहिल्यांदा गुजरात विद्यापीठात सिनेट सदस्य म्हणून निवड झाली. त्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाच्या (BJYM) प्रदेश अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. वाघेला यांनी सलग दोन वेळा हे पद स्वतःकडे ठेवले. त्यानंतर भाजपाच्या प्रदेश अध्यक्षपदी जितू वघानी यांची नियुक्ती झाल्यानंतर वाघेला यांना पक्षाच्या सचिव पदावर बढती देण्यात आली. त्यानंतर केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या नेहरू युवा केंद्र संघटनेच्या उपाध्यक्ष पदावरही त्यांची वर्णी लागली होती.
महासचिवपदी लागली वर्णी
जुलै २०२० मध्ये सी. आर. पाटील जेव्हा प्रदेशाध्यक्ष झाले, तेव्हा वाघेला यांना मुख्य प्रवाहात येऊन राजकारण करण्याची मोठी संधी मिळाली. भाजपामध्ये प्रदेश अध्यक्षानंतर महासचिव हे सर्वात मोठे पद मानले जाते. पाटील प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी रजनी पटेल, भार्गव भट, विनोद छावडा आणि वाघेला या चार नेत्यांना महासचिवपदी निवडले. त्यापैकी वाघेला हे पक्ष संघटनेतील शक्तीशाली नेते म्हणून पुढे आले. अहमदाबाद शहर आणि जिल्ह्यासह दक्षिण गुजरातची जबाबदारी आणि पक्षाचे प्रदेश मुख्यालय असलेल्या ‘श्री कमलम’ कार्यालयाचे प्रभारीपदही वाघेला यांच्याकडे होते. सानंद प्रदेशातील भाजपाचे महत्त्वाचे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. पक्षात महत्त्वाची जबाबदारी असल्यामुळे राज्याच्या प्रशासनातही त्यांच्या शब्दाला चांगलीच किंमत होती, अशी माहिती सूत्रांकडून मिळते.
वाघेला यांचा चढता आलेख पाहता त्यांनी अचानक राजीनामा देण्याचे कारण गुलदस्त्यात आहे. त्यांच्याविरोधात कोणतीही तक्रार नसल्याचे भाजपाने जाहीर केले आहे; तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षांतर्गत झालेल्या कुरबुरीमुळे त्यांना पदावरून बाजूला केले गेले आहे. सी. आर. पाटील यांचा उत्तराधिकारी म्हणून वाघेला यांच्याकडे पाहिले जात असल्याचे अनेक नेत्यांचे म्हणणे आहे. काही दिवसांपूर्वी एक निनावी पत्रक पक्षाच्या वर्तुळात फिरत होते. या पत्रकात वाघेला यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते, ज्यामुळे त्यांना पदावरून दूर करण्यात आले. पण, या प्रकरणातील खरी माहिती अद्याप बाहेर आलेली नाही.
भाजपाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले, “अतिशय कमी वयात वाघेला यांनी पक्षातील महत्त्वाचे पद भूषविले आहे. राजकारणात मोठे होण्यासाठी लागणारे नेतृत्वगुण आणि सामर्थ्य वाघेला यांच्याकडे आहे. वाघेला यांचे वय फक्त ४० वर्ष असून एवढ्या कमी वयात पक्षाचे महासचिवपद भूषविणे, ही मोठी गोष्ट आहे. त्यांनी याआधी ज्या पदावर काम केले, तीदेखील महत्त्वाची पदे होती. महासचिव सारख्या पदावर त्यांची वर्णी लागली म्हणजे त्यांच्या पाठीशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या दोन्ही नेत्यांचा आशीर्वाद आहे, हे स्पष्ट होते.”
आणखी एका नेत्याने सांगितले, “वाघेला यांना पक्षाने राजीनामा देण्यास का सांगितले, याबाबत आम्हालाही स्पष्टता मिळालेली नाही. पण, वाघेला यांचे मोठे होणे पक्षात कुणाला तरी रुचलेले नाही असे दिसते. यातून निर्माण झालेल्या कलहातून त्यांनी राजीनामा दिलेला असावा.” अहमदाबादमधील एका आमदाराने सांगितले की, वाघेला यांना नेमक्या कोणत्या कारणामुळे राजीनामा देण्यास सांगितले हे अद्याप स्पष्ट नसले तरी काहीतरी मोठे कारण असणार हे नक्की. त्याशिवाय वाघेला यांना दूर केले जाणार नाही.