तृणमूल काँग्रेस पक्षाने राज्यसभेच्या निवडणुकीसाठी सहा उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. त्यापैकी तीन नवीन नावांचा उल्लेख आहे. तृणमूलचे काँग्रेसचे प्रवक्ते आणि ३५ वर्षीय साकेत गोखले यांच्याही नावाचा समावेश या यादीत करण्यात आला आहे. आरटीआय कार्यकर्ते आणि माजी पत्रकार असलेल्या साकेत गोखले यांनी काही दिवसांपूर्वीच राजकारणात प्रवेश केला होता. साकेत यांचे वडील माजी पोलिस अधिकारी आहेत. त्यांनी पत्रकारिता आणि माध्यम क्षेत्राचा अभ्यास केला आहे. चेक प्रजासत्ताकमधील शाळेत शिक्षक म्हणून २००८ साली त्यांनी आपल्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर एका इंग्रजी दैनिकासाठी पत्रकार म्हणून काम केले. युरोप आणि दक्षिण आशियाच्या बातम्या ते देत होते. काही भारतीय वर्तमानपत्रातही अगदी छोट्या कालावधीसाठी त्यांनी काम केले होते. त्यानंतर मात्र आरटीआय कार्यकर्ते म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा