RJD Congress राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी इंडिया आघाडीचं आणि पर्यायाने काँग्रेसचं टेन्शन वाढवलं आहे. कारण त्यांनी बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना पाठिंबा जाहीर केला आहे. इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे असं ममता बॅनर्जी काही दिवसांपूर्वी म्हणाल्या होत्या. त्याबाबत लालूप्रसाद यादव यांना विचारलं असता त्यांनी ममता बॅनर्जींकडे नेतृत्व देण्यास सहमती दर्शवली आहे. त्यामुळे साहजिकच इंडिया आघाडीचं टेन्शन वाढलं आहे.

लालूप्रसाद यादव यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी

लालूप्रसाद यादव यांनी ममता बॅनर्जींना पाठिंबा दिल्याने काँग्रेसमध्ये ( RJD Congress ) नाराजीचं वातावरण आहे. शाहनवाज आलम यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राजदकडून याआधीही अशा प्रकारे वक्तव्यं झाली आहेत. लालूप्रसाद यादव यांच्या पक्षाला दोन उपमुख्यमंत्री हवे आहेत आणि त्यातला एक चेहरा मुस्लिम असला पाहिजे असंही त्यांना वाटतं आहे. २०२५ च्या विधानसभा निवडणुकी जिंकून आमचं सरकार येईल असं काँग्रेसने RJD- Congress म्हटलं आहे. असं असलं तरीही लालूप्रसाद यादव यांचा पक्ष येत्या निवडणुकीत महाआघाडी दरम्यान काँग्रेसला जास्त जागा देईल असं वाटत नाही अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. २०२० च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ७० जागांवर निवडणूक लढवली होती. त्यापैकी १९ जागा काँग्रेसने जिंकल्या. महाआघाडीला बिहारमध्ये २४३ पैकी ११२ जागा जिंकता आल्या होत्या. राजदने उत्तम कामगिरी करत ७५ जागा जिंकल्या होत्या. ही सगळी पार्श्वभूमी पाहता यावेळी राजद काँग्रेससाठी जास्त जागा सोडेल अशी स्थिती नाही. लालूप्रसाद यादव यांनी ममता बॅनर्जींना दिलेला पाठिंबा हेच सूचित करुन जातो आहे.

Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Sharad Pawar News
Uday Samant : “शरद पवारांचं इंडिया आघाडीबाबतचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे काँग्रेसचा अपमान, राहुल गांधीचं नेतृत्व..” उदय सामंत काय म्हणाले?
Image of Vice-President Jagdeep Dhankhar or Rajya Sabha proceedings
No Confidence Motion : भारताच्या संसदीय इतिहासातील सर्वात मोठी घटना, राज्यसभा सभापतींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव
BJP leader and MLA Rahul Narvekar elected unopposed as the Speaker of the Legislative Assembly
Rahul Narwekar : नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी फेरनिवड; मंत्रीपदाचे स्वप्न भंगले
Sharad Pawar On Mamata Banerjee
Sharad Pawar : ‘ममता बॅनर्जींकडे इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याची क्षमता’; शरद पवारांचं मोठं विधान
Mamata Banerjee
“इंडिया आघाडी मी बनवलीय, संधी मिळाल्यास…”, ममता बॅनर्जी यांचं मोठं वक्तव्य; मित्रपक्षांच्या सावध प्रतिक्रिया
Harshvarrdhan Patil Meets Devendra Fadnavis
Harshvarrdhan Patil: शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन; चर्चांना उधाण

सुबोध कुमार मेहता काय म्हणाले?

राजदचे प्रवक्ते सुबोध कुमार मेहता यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं की, काँग्रेसने बिहारमध्ये इतक्या जागा लढवूनही ते अपयशी का ठरले याबाबत आत्मपरीक्षण केलं पाहिजे. राजदने त्यांचे कच्चे दुवे शोधून त्यावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. भाजपाला टक्कर द्यायचं असेल तर इंडिया आघाडीचं नेतृत्व तसंच हवं. लालूप्रसाद यादव (RJD Congress ) यांनी ममता बॅनर्जींना पाठिंबा दिला आहे. कारण विरोधक भाजपाच्या विरोधात तसे सक्षमच असले पाहिजेत असं पक्षाला वाटतं आहे.

राजद नेत्याची काँग्रेसवर टीका

दुसऱ्या एका राजद नेत्याने सांगितलं की बिहार येथील काँग्रेसचं मुख्यालय म्हणजे सदाकत आश्रम. या टिकाणी १९९० मध्ये राजकीय चळवळी चालत होत्या. आता त्या सगळ्या चळवळी थंडावल्या आहेत. फक्त कुणाची जयंती-पुण्यतिथी असेल तर काँग्रेसचे ( RJD Congress ) लोक तिथे येतात. काँग्रेस पक्षाने काही कुटुंबाना या जागेमध्ये राहण्याची संमती दिली आहे. ती दिली नसती तर हे मुख्यालय म्हणजे एक निर्जन वास्तू झालं असतं. काँग्रेसने आपल्या पक्षाची बिहारमध्ये पुनर्बांधणी केली पाहिजे असं मत या नेत्याने व्यक्त केलं.

काँग्रेसचे नेते ग्यानराजन गुप्ता काय म्हणाले?

राजदने ही टीका केल्यानंतर काँग्रेसचे ( RJD Congress ) नेते ग्यानराजन गुप्ता यांनी राजदला उत्तर दिलं आहे. काँग्रेस हा देशव्यापी पक्ष आहे. आम्ही राज्यातील २४३ मतदारसंघांमध्ये तयारी सुरु केली आहे. जानेवारी महिन्याच्या मध्यापासूनच आम्ही निवडणुकीच्या तयारीला लागलो आहोत. प्रत्येक पक्षाला त्यांच्या परिने मोठं होण्याचा अधिकर आहे. मात्र जागावाटप, आघाडी धर्म या सगळ्या गोष्टी आपसांत चर्चा करण्याच्या आहेत त्याबाबत लोकांमध्ये जाऊन किंवा माध्यमांशी चर्चा करण्यात काहीही हशील नाही.

बिहारमध्ये काँग्रेस आणि राजद या दोन्ही पक्षांमध्ये मतभेद ( RJD Congress ) आणि दिलजमाई यांचा सिलसिला अनेक दशकांपासून सुरु आहे. काँग्रेसने बिहारवर १९९० पर्यंत राज्य केलं. १९६७ ते १९७२, १९७७ ते १९९० अशाही कालावधीत काँग्रेसची सत्ता होती. १९९० मध्ये काँग्रेसचा पराभव झाला. जनता दल विजयी झालं ज्याचे प्रमुख लालूप्रसाद यादव होते. त्यानंतरच कधी टोकाचे मतभेद तर कधी दिलजमाई हे पाहण्यास मिळालं आहेच.

Story img Loader