काँग्रेस पक्षाने २२ जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिर उदघाटनासाठी अयोध्येत येणार नसल्याचे जाहीर केले आहे. इंडिया आघाडीत राष्ट्रीय जनता दलाने (RJD) काँग्रेसच्या या निर्णयाला पाठिंबा दिल्यास आश्चर्य व्यक्त होणार नाही. कारण १९९० पासून म्हणजेच राम जन्मभूमी चळवळ सुरू झाली तेव्हापासून लालू प्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दलाने या विषयाचा जोरदार विरोध केलेला आहे. अयोध्येत होत असलेला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा हा राष्ट्रीय स्वयंसवेक संघ आणि भाजपाचा सोहळा असल्याचे सांगून काँग्रेसने त्यावर बहिष्कार टाकला. त्यानंतर लगेचच आरजेडीचे राष्ट्रीय प्रवक्ते सुबोध कुमार मेहता यांनी म्हटले की, काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेशी आम्ही सहमत असून हीच भूमिका आम्ही मांडत आलो आहोत.

लालू प्रसाद यादव यांच्यामुळे पडले जनता दलाचे सरकार

बिहारचे मुख्यमंत्री म्हणून लालू प्रसाद यादव यांची पहिलीच टर्म होती. ऑक्टोबर १९९० मध्ये त्यांनी भाजपा नेते लालकृष्ण आडवाणी यांचा रथ समस्तीपूर येथे अडविण्याचे आदेश पोलिसांना दिले. आडवाणी यांनी गुजरातच्या सोमनाथ येथून उत्तर प्रदेशच्या अयोध्यापर्यंत रथयात्रा काढली होती. या यात्रेदरम्यान अनेक ठिकाणी हिंसक घटना घडल्या होत्या. त्यावेळी केंद्रात व्ही. पी. सिंह यांच्या नेतृत्वाखालील जनता दलाचे सरकार सत्तेवर होते. भाजपाने त्यांना पाठिंबा दिलेला होता. लालू प्रसाद यादव यांनी रथयात्रा अडविल्यामुळे भाजपाने आपला पाठिंबा काढून घेतला आणि सरकार कोसळले. या एका घटनेमुळे लालू प्रसाद यादव यांच्याकडे यादव-मुस्लीम मतदारांची एकगठ्ठा मते गोळा झाली.

BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Mallikarjun kharge loksatta
धनखड सरकारचे प्रवक्ते! मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल; हा जाट समुदायाचा अपमान भाजपचे प्रत्युत्तर
nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
parliament congress protest
‘इंडिया’चा दबाव झुगारून काँग्रेसचे आंदोलन
MIM In Delhi Election 2025.
Delhi Election : दिल्लीतील २०२० च्या दंगलीतील आरोपी लढवणार विधानसभा, ओवैसींच्या पक्षाने दिली उमेदवारी
bjp sujay patki
पहिली बाजू : आता महाराष्ट्र थांबणार नाही!
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान

Uma Bharti: “मी अयोध्येत भाषणाला उभी राहिले आणि समोर बाबरी मशिदीवर…”, उमा भारतींनी सांगितला ६ डिसेंबर १९९२ चा तो प्रसंग!

बिहारमध्ये मुख्यमंत्री सत्येंद्र नारायण सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार असताना भागलपूरमध्ये दंगली झाल्या होत्या. त्यामुळे मुस्लीम मतदार काँग्रेसवर नाराज होते. त्यांना लालू प्रसाद यादव यांच्या रूपाने नवा नेता मिळाला. १९९० साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत लालू प्रसाद यादव यांना मुस्लीम मतदारांचा मोठा पाठिंबा मिळाला. काँग्रेसची मतपेटी अलगदपणे यादव यांच्या ताब्यात गेली. तेव्हापासून यादव आणि आरजेडी पक्षाचे राजकारण सामाजिक न्याय आणि धर्मनिरपेक्षता या विचारांभोवती घुटमळत राहिले. सध्या बिहारचे उपमुख्यमंत्री असलेल्या तेजस्वी यादव यांनी त्यात ‘आर्थिक न्याय’ या विचाराचीही भर घातली आहे. २०२० च्या निवडणुकीत तेजस्वी यादव यांनी १० लाख रोजगार देण्याचे आश्वासन दिले. तरीही आरजेडी पक्ष आपल्या मूळ विचारधारेपासून दूर गेला नाही. आता राम मंदिराचे लोकार्पण होत असतानाही आरजेडी आपल्या विचारांवर कायम आहे.

राम मंदिराचे लोकार्पण होत असताना आरजेडी पक्षाचे प्रमुख लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव मात्र या विषयापासून दूर राहिले आहेत. मात्र, पक्षाचे दुसऱ्या फळीतील नेते या विरोधात बोलताना दिसत आहेत. राज्याचे शिक्षण मंत्री चंद्रशेखर यांच्या एका वक्तव्यामुळे २०२२ साली रामचरितमानसचा वाद उफाळून आला होता. चंद्रशेखर यांनी यावेळी आपले सहकारी आमदार फतेह बहादूर सिंह यांच्या एका विधानाला पाठिंबा दिला आहे. ओबीसीमधील कुशवाहा समाजाचे नेते फतेह बहादूर म्हणाले की, मंदिर हे गुलाम मानसिकतेचे लक्षण आहे. तसेच चंद्रशेखर यांनीही राम मंदिराच्या विरोधात प्रतिक्रिया देताना म्हटले की, राम मंदिर ही शोषण करणारी जागा असून खिसेभरू लोकांना त्याचा लाभ होणार आहे. तसेच प्रभू राम हे आपल्या प्रत्येकामध्ये आहेत, त्यासाठी कोणत्याही मंदिरात जाण्याची गरज नाही.

तेजस्वी यादव यांना मागील आठवड्यात राम मंदिराबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. तेजस्वी यादव म्हणाले की, माध्यमे फक्त राम मंदिराचीच चर्चा का करत आहे? आम्ही मोठ्या प्रमाणावर नोकरभरती राबविली आहे. रोजगार निर्मितीवर चर्चा व्हायला हवी. मंदिराबाबत बोलायचे झाल्यास, मी तिरुपती बालाजी मंदिरात नुकतेच जाऊन आलो आहे. आमच्या घरीही एक छोटेसे मंदिर आहे. राष्ट्रीय जनता दल पक्ष मुस्लीम समाजाचे तुष्टीकरण करतो, असा आरोप भाजपाकडून वारंवार होत असल्यामुळे लालू प्रसाद यादव यांनीही गेल्या काही महिन्यांमध्ये बिहार आणि झारखंडमधील मंदिरांना भेटी दिलेल्या आहेत.

आरजेडीचे प्रवक्ते मेहता यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले की, आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो आणि आम्हाला भाजपाकडून श्रद्धेबाबतचे प्रमाणपत्र नको आहे. राम मंदिराचे लोकार्पण होत असताना एवढा गाजावाजा करून भाजपाला काय साधायचे आहे, हे प्रत्येकाला माहीत आहेच. यानिमित्ताने निवडणुकीआधी त्यांना धार्मिक विषयावर समाजात ध्रुवीकरण करायचे आहे. आम्ही आणि इंडिया आघाडीतील पक्ष हे मंदिराच्या विरोधात नाही, तर मंदिराच्या नावाने चाललेल्या राजकारणाला आमचा विरोध आहे.

भाजपाचे प्रवक्ते नीरज कुमार यांनी आरजेडीवर टीका करताना सांगितले की, काँग्रेसने राम मंदिर लोकर्पण सोहळ्यावर बहिष्कार टाकला आणि या कृतीचे आरजेडीकडून समर्थन करण्यात येत आहे. त्यामुळे त्यांनी सनातन धर्माचा अपमान केला आहे. आरजेडीचे नेते देवांच्या विरोधात बोलतात. जर आरजेडीचे नेते सनातन धर्म आणि प्रभू रामाचा आदर करत असतील तर त्यांनी मंदिराला गुलामीचे प्रतीक म्हणणाऱ्या नेत्यांचा निषेध का नाही नोंदविला? लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांकडे कोणतेही ठोस मुद्दे उरलेले नाहीत, त्यामुळेच त्यांनी प्रभू रामावर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे, असेही नीरज कुमार म्हणाले.

Story img Loader