बिहार विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाची तयारी सुरू असताना सीबीआयने “नोकऱ्यांसाठी जमीन” घोटाळा प्रकरणी राष्ट्रीय जनता दलाच्या चार नेत्यांची झाडाझडती घेतली. या चौघांमध्ये राज्यसभा खासदार अहमद अशफाक करीम आणि फैय्याज अहमद, विधान परिषद सदस्य सुनील कुमार सिंह तसेच माजी विधान परिषद सदस्य सुबोध राय यांचा समावेश आहे. हे चौघे पक्षाचे अर्थ पुरवठादार असल्याची माहिती समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बिहारच्या पटणा, कटियार आणि मधूबनीत २५ पेक्षा अधिक ठिकाणी धाडी घालण्यात आल्या. त्यानंतर महिन्याभरात सीबीआयने लालू प्रसाद रेल्वे मंत्री असताना ओएसडी असलेल्या भोला यादवला ताब्यात घेण्यात आले. त्याची सीबीआय चौकशी झाली. रेल्वेत नोकरीचे आमिष देऊन लालू आणि त्यांच्या कुटुंबियांनी पटणा येथे प्लॉट मिळवल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.  

अहमद अशफाक करीम (६०)

मार्च 2018 पासून राज्यसभा सदस्य असलेले करीम हे पूर्व बिहारमधील कटिहार येथील प्रभावशाली नेते आहेत. एक यशस्वी उद्योगपती, राजद नेता आणि शिक्षण क्षेत्रातील उद्योजक आहेत, सोबतच ते कटिहार मेडिकल कॉलेजचे मालकही आहेत.

फैयाज अहमद (५८)

मधुबनी येथील आरजेडी नेत्याने यंदा राज्यसभेत प्रवेश केला. करीमप्रमाणेच ते देखील खासगी वैद्यकीय महाविद्यालय मधुबनी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल’चे मालक आहेत.

अहमद यांनी २०१० आणि २०१५ च्या विधानसभा निवडणुका जिंकून मधुबनी जिल्ह्यातील बिस्फी मतदारसंघाचे दोनदा प्रतिनिधित्व केले. पक्षातील सूत्रांच्या मते, लालू प्रसाद यांच्याशी अहमद यांचा दीर्घकाळ संबंध. त्यांच्या उच्च प्रोफाइलमुळे राज्यसभेच्या उमेदवारीसाठी इतर दावेदार बाजूला सारले गेले.

सुनील कुमार सिंग (५३)

माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांना स्वत:ची बहीण मानणारे सारण येथील उच्चवर्णीय राजपूत नेते, राजद कोषाध्यक्ष हे मंत्रिपदासाठी प्रबळ दावेदार होते, परंतु सहकारी राजपूत नेते आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंग यांचा मुलगा सुधाकर सिंग यांच्याकडून पराभव पत्करावा लागला.

सुबोध राय (४०)

राजदच्या अंतर्गत सूत्रांनुसार राय हे लालू प्रसाद यांचे निकटवर्ती आहेत. त्यांनी रांची तुरुंगात असताना राजद प्रमुखांना मदत केली होती. बिहारमध्ये त्यांची पिठाची गिरणी आहे आणि झारखंडमधील दारूच्या व्यापारातही त्यांचा हिस्सा आहे. राय यांनी २०१६ दरम्यान विधान परिषदेत प्रवेश केला परंतु, वैशालीमधून राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवाराकडून पराभव पत्करावा लागला.